बेळगाव : काँग्रेस निवडणुकीसाठी उभा राहिला आहे. निवडणुकीत आपल्या विरोधात करण्यात येणारे डावपेच त्यांच्यावरच उलटवणार असा दावा विधान परिषद सदस्य अरुण शहापूर यांनी केला. बेळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना अरुण शहापूर म्हणाले, काँग्रेस निवडणुकीसाठी उभा आहे. आपल्या विरोधात त्यांना जे काही करायचे आहे ते करत आहेत. त्यांच्याविरोधात आपल्याला आपण काय करायचे आहे हे माहीत आहे. यामुळे काँग्रेसला जे करायचे ते त्यांना करू द्या भाजपमधून आपल्याला जे करायचे आहे ते आपण करू. शिक्षकांच्या समस्यांसह या भागातील सर्व समस्या सोडविण्यासाठी आपण कार्य करत आहोत. अनेकांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत असे अरुण शहापूर म्हणाले. काँग्रेस नेत्यांकडून भाजप नेत्यांचा संपर्क साधला जात असल्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना अरुण शहापूर म्हणाले, काँग्रेस नेत्यांना काँग्रेसवर विश्वास आहे कि नाही ते प्रसारमाध्यमांनीच त्यांना विचारावे. काँग्रेस नेत्यांचा भाजप नेत्यांशी समजूतदारीचे नाते आहे, असे प्रसारमाध्यमच सांगत आहेत. यामुळे काँग्रेसची हि एक प्रकारची रणनीती असू शकेल, असेही ते म्हणाले. भाजपमध्ये असलेल्या असमाधानासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना अरुण शहापूर म्हणाले, भाजप हे आपल्याला घराप्रमाणे आहे. प्रत्येकाच्या घरात असे प्रकार होतच असतात. आपण एक सामान्य कार्यकर्ता आहे. पक्षाने आपल्याला दोनवेळा निवडणूक लढविण्याची संधी दिली आहे. आता पुन्हा तिसऱ्या वेळीही निवडणूक लढविण्यासाठी ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळत असल्याचे अरुण शहापूर म्हणाले.
यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पुट्टना, भाजप उमेदवार अरुण शहापूर, माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, बेळगाव ग्रामीण भाजप अध्यक्ष संजय पाटील, शहर भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, प्रधान सचिव मुरुघेद्रागौडा पाटील आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta