बेळगाव : बेळगावमधील शैक्षणिक संस्थानांनी कर्नाटकाचे शिक्षण मंत्री माननीय श्री. बी. सी. नागेश यांच्याशी भेट घेतली व काही शैक्षणिक अडचणीबाबत चर्चा करण्यात आली व निवेदन देण्यात आले.
यावेळी श्री. बी. सी. नागेश यांनी बोलताना म्हणाले, अडचणींचा पाठपुरावा घेऊन त्या तात्काळ सोडवू व लवकरात लवकर सुधारणा घडवून आणू. यावेळी बेळगाव कर्नाटक ओबीसी मोर्चाचे सचिव व मराठा समाजाचे संयोजक श्री. किरण जाधव, प्रोफेसर गाडगीळ, मुक्तार पठाण यावेळी उपस्थित होते.