बेळगाव : संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत हौतात्म्य प्राप्त झालेल्या हुतात्म्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. मंगळवार दिनांक 17 जानेवारी 2023 रोजी सकाळी ठीक 9=30 वाजता हुतात्मा चौक रामदेव गल्ली किर्लोस्कर रोड कॉर्नर बेळगाव येथे नागरिक, युवक मंडळे कार्यकर्ते, महिला यांनी वेळेवर हजर राहावे असे आवाहन अध्यक्ष श्री. दीपक दळवी यांनी केले आहे.
नामदेव गल्ली, खडेबाजार, गणपत गल्ली मारुती गल्लीतून फिरुन अनसूरकर गल्लीत मधू बांदेकर तर किर्लोस्कर रोड येथे महादेव बारीगडी व लक्ष्मण गावडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल.