बंगळूर : कर्नाटक काँग्रेसने विधानसभा निवडणुकीपूर्वी तिसरी ‘हमी’ योजना जाहीर केली, अन्न भाग्य योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) कुटुंबातील प्रत्येकसदस्याला दरमहा दहा किलो मोफत तांदूळ देण्याचे आश्वासन दिले.
शुक्रवारी (ता. २४) बंगळुर येथे एका एका पत्रकार परिषदेत बोलताना प्रद्श कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी जाहीर केले, की पक्षाच्या चालू असलेल्या प्रजाध्वनी यात्रेदरम्यान लोकांची ही मोठी मागणी होती.
ते म्हणाले, काँग्रेसचे सरकार असताना देण्यात येणारा मोफत तांदूळ सात किलोवरून पाच किलोपर्यंत खाली आणल्याबद्दल लोक भाजप सरकारवर नाराज आहेत. काँग्रेस जर पक्षाने जर राज्यात सत्ता स्थापन केली तर, प्रत्येक घरातील एका महिलेला दर महिन्याला दोन हजार रुपये आणि कर्नाटकातील सर्व घरांना २०० युनिट मोफत वीज देण्याचे याआधी आश्वासन दिले होते.
काँग्रेसने त्यांच्या निवडणूक आश्वासनांबद्दल घरोघरी ‘गॅरंटी कार्ड’ पोहोचवण्याची मोहीम सुरू केली आहे. शिवकुमार म्हणाले की, लोकांचा राजकीय पक्षांच्या आश्वासनांवरचा विश्वास उडाला असल्याने हे आवश्यक आहे.
अन्न ही मूलभूत गरज आहे जी लोकांना मोफत पुरवली जावी, असे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले. “आम्ही पालन करता येईल अशी श्रेणीबद्ध आश्वासने देऊ इच्छितो. २०१३ मध्ये मुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर श्री सिद्धरामय्या यांनी अन्न भाग्य योजना ही पहिली घोषणा केली होती.
रामनगरममध्ये राम मंदिर बांधण्याच्या अर्थसंकल्पीय आश्वासनावर तिरकसपणे टीका करत श्री. शिवकुमार म्हणाले की, काँग्रेस अशा उपक्रमांद्वारे जीवनमान मजबूत करण्यावर विश्वास ठेवते आणि ‘लोकांच्या भावनांशी राजकारण करत नाही’. “मंदिर आणि मशिदी ट्रस्ट किंवा लोक बांधू शकतात. हे सरकारकडून हाती घ्यायचे काम नाही, असे ते म्हणाले.
Belgaum Varta Belgaum Varta