बेळगाव : बेळगाव येथील मारुती नगर येथील महावीर कॉलनीमध्ये अचानक सिलिंडरचा स्फोट होऊन संपूर्ण घर जळून खाक झाले.
मजूर म्हणून काम करणाऱ्या व शेडमध्ये राहणारे चन्नाप्पा विठ्ठल लमाणी यांच्या घरात रात्री उशिरा अचानक सिलेंडरचा स्फोट होऊन संपूर्ण घर जळून खाक झाले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र विठ्ठल लमाणी यांनी जमा केलेले 1.80 हजार रोख व 35 ग्रॅम सोने जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली. माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत सदर घटना घडली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta