
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सिमाभाग यांच्या वतीने जिल्हाधिकारी बेळगाव यांना निवेदन देण्यात आले कन्नड मराठी भाषिक वादाच्या पार्श्वभूमीवर सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. यावर प्रतिबंध तसेच भाषिक अल्पसंख्यांक आयोगाच्या सुचनेचे पालन करणे बाबत हे निवेदन देण्यात आले
वरील विषयास अनुसरुन मागील आठवड्यात बेळगाव तालुक्यातील अनेक बस कंडक्टर व प्रवाशात झालेल्या वादावादीला भाषिक रंग देऊन वातावरण गढूळ करण्यात आले.आणी त्यानंतर चित्रदुर्ग येथे महाराष्ट्रच्या बसला तसेच वाहक व चालकाला काळे फासण्यात आले त्याचे, पडसाद महाराष्ट्रातही उमटले सीमेलगतच्या दोन्ही राज्यांच्या बस वर हल्ला चढविण्यात आला आणी यामध्ये परिवहन मंडळाचे नुकसान झाले. अशा अनेक घटना घडत असतात त्यानंतर आम्ही महाराष्ट्र समिती म्हणून सामाजिक दृष्ट्या व्यक्त झालो तर उलट प्रशासन इथं आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल करतय, या सर्व घडामोडीनंतर आपण माननीय बेळगावचे जिल्हाधिकारी व माननीय कोल्हापूरचे जिल्हाधिकारी कॉन्फरन्सद्वारे एक बैठक घेऊन त्यावर तोडगा काढला, यावेळी दोन्ही राज्याचे पोलीस अधिकारीही उपस्थित होते. व त्यानंतर दोन्ही बाजुचे वातावरण शांत झाले असे वाटत असतानाच काल- परवा कलबुर्गी (गुलबर्गा) येथे पुन्हा काही तथाकथित काही संघटनांनी महाराष्ट्र बसला काळे फासून त्यावर लाल पिवळा झेंडा लावून ती बस महाराष्ट्रात पाठवून देण्यात आली व वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे पुन्हा वातावरणात असंतता निर्माण झाली तरी आपण यावर लक्ष घालून त्वरित कारवाई करावी व अशा संघटनांना प्रतिबंध लावावा.
हेच मागील दोन आठवड्या पूर्वी केंद्रीय भाषिक अल्पसंख्यांक आयोगाचे उपायुक्त यशस्वी कुमार ही बेळगावात भाषिक अल्पसंख्यांकाच्या भेटी गाठी घेण्यासाठी आले होते त्यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा समिती सीमाभागचे शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन त्यांना आमच्या मागण्याचं निवेदन दिलं होते. त्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीचे शिष्टमंडळ व उपायुक्त एस शिवकुमार व आपण माननीय बेळगाव जिल्हाधिकारी यांची संयुक्त बैठक झाली, यावेळी अल्पसंख्यांक भाषिकांचे हक्क अबाधित रहावेत म्हणून काही सूचना एस शिवकुमार यांनी प्रशासनाला केल्या व त आपणही वेळेत पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले.
कृपया आपण त्या सर्व सूचनेचे पालन करून त्याची अंमलबजावणी करावी व मराठी भाषिकांना न्याय द्यावा अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा सिमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंदरे, खजिनदार शिवाजी मंडोळकर, उपाध्यक्ष विजय जाधव, प्रविण रेडेकर, नारायण मुंचडीकर, अशोक घगवे, राजू पाटील, जोतिबा यळ्ळूरकर, सुरज जाधव, आनंद तुप्पट, अभि कारेकर, मोतेश बार्देशकर आदी उपस्थित होते
Belgaum Varta Belgaum Varta