बेळगाव : श्री. मिहीर अनिलराव पोतदार यांची बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेच्या गौरव अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या वैयक्तिक कारकिर्दी विषयी घेतलेला थोडासा आढावा.
श्री. मिहीर पोतदार हे बेळगाव मधील नामवंत उद्योजक, थोर समाजसेवक, तसेच काँग्रेस पक्षाचे नेते श्री. अनिलराव मोहनराव पोतदार यांचे चिरंजीव. श्री. मिहीर अनिलराव पोतदार यांचा जन्म 17 फेब्रुवारी 1987 रोजी मुंबई येथे झाला.
त्यांचे शालेय शिक्षण बेळगाव मधील सेन्टपॉल हायस्कूल येथे झाले व महाविद्यालयीन शिक्षण आर एल एस कॉलेज येथे झाले. त्यानंतर त्यांनी भरतेश कॉलेज येथून बीबीएची पदवी संपादन केली. व त्यानंतर त्यांनी उच्च शिक्षणासाठी परदेशात जाऊन एमबीएची पदवी मिळवली.
लहानपणापासून मिहिर यांना क्रीडा प्रकारात विशेष रस होता. क्रिकेट या खेळात त्यांनी शालेय व महाविद्यालयीन काळात कर्णधार पद भूषवित आपल्या शाळा व महाविद्यालयाला अनेक स्पर्धातून विजय संपादन करून दिला.
त्याचबरोबर मिहीर एक उत्कृष्ट राज्यस्तरीय जलतरणपटूही आहेत.
इतकंच नाही तर संपूर्ण जगात शिस्तबद्ध पद्धतीने खेळला जाणारा व एक सर्वोच्च दर्जेदार खेळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोल्फ या खेळात श्री. मिहिर यांनी नेत्र दीपक कामगिरी करत दैदिप्यमान यश संपादन केले. या खेळात त्यांनी नामवंत चषक, MLIRC Cup (मराठा चषक), The Infantry Cup, The Patrons Cup अशा नामवंत चषकांवर आपले नाव कोरले.
त्याचप्रमाणे त्यांना व्यायामाचीही विशेष आवड आहे आपल्या घरातूनच त्यांना व्यायामाचा वारसा मिळाला त्यांचे वडील श्री. अनिलराव मोहनराव पोतदार हे एक नावाजलेले कुस्तीपटू वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मिहीर यांनी आपल्या घरातच व्यायाम शाळा बनवली व सरावाला सुरुवात केली त्यांना क्रीडा व शारीरिक कसरतीचे बाळकडू जणू आपल्या घरातूनच मिळाले असे म्हणायला हरकत नाही.
अशा सर्व मैदानी व मर्दानी खेळांची आवड व ओढ त्यांना शरीरसौष्ठव क्रीडाप्रकाराकडे वळायला कारणीभूत ठरली, व्यायाम करत असताना त्यांच्या संपर्कात काही होतकरु व्यायामपटू आले ज्यांना स्पर्धांमधून भाग घेण्याची प्रबळ इच्छा होती परंतु घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना पुढे जाण्यास अडथळे निर्माण होत होते अशा काही व्यायामपटूंना मिहीर यांनी मैत्रीबरोबरच मदतीचाही हात पुढे केला. मिहीर यांच्याकडून मिळालेल्या पाठबळामुळे बॉडी बिल्डिंग क्षेत्रात ते व्यायामपटू चमकदार कामगिरी करू शकेल यांचे यश पाहून मिहीर यांनी विचार केला की त्यांच्याप्रमाणे इतरही चांगले शरीरसौष्ठव पटू असतील ज्यांना आपण आधार देण्याची गरज आहे असा विचार करून त्यांनी बेळगाव जिल्हा बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना व क्रीडा या संघटनेला हाताशी धरून शरीरसौष्ठवपटूंना पुढे आणण्यासाठी जय गणेश श्री 2025 या जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करून ही स्पर्धा यशस्वी करून दाखवली.
ग्रामीण भागातील गरीब व होतकरू शेतकऱ्यांच्या घरातील व्यायामाची आवड असणाऱ्या व्यायामपटूंच्या व बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशन अँड स्पोर्ट्स संघटनेच्या पाठीशी नाही तर बरोबर राहून बेळगावच्या क्रीडापटूंना पुढे आणण्यासाठी आपण सदैव तत्पर राहू असा विडा त्यांनी उचलला तसेच यापुढेही सर्व स्तरातील खेळाडूंच्या पाठीशी राहून आणि बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशन अँड स्पोर्ट्स या संघटनेच्या सदैव बरोबर राहून मोठ्या स्पर्धा यशस्वी करू व बेळगाव मधील सर्व स्तरातील क्रीडापटूंना पुढे आणू असे मिहिर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले तसेच या संघटनेच्या गौरवअध्यक्षपदी निवड केल्याबद्दल श्री. मिहीर अनिलराव पोतदार यांनी बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशन अँड स्पोर्ट्स संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.
इतक्या मोठ्या मनाच्या अशा या तरुण, तडफदार, हरहुन्नरी व्यक्तिमत्वाच्या कार्याला आमचा मानाचा मुजरा.
Belgaum Varta Belgaum Varta