Thursday , March 5 2026
Breaking News

संघटित शक्तीद्वारे समाजाची सर्वांगीण उन्नती : डॉ. एच. आय. तिम्मापुर

Spread the love

 

बेळगाव : आधुनिक काळातील बदलत्या जगातील आव्हाने स्वीकारताना चर्मकार समाजाला जागृत राहावे लागेल. संघटित शक्तीद्वारे समाजाची सर्वांगीण उन्नती होत असते याचे सर्वांनी भान राखावे, असे आवाहन डॉ. एच. आय. तिम्मापुर यांनी बोलताना केले.
जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कारक शरण मादर चन्नय्या, मादर पोळय्या, ढोहर कक्कया, समगार हरळ्ळया जयंती कार्यक्रमाचे आयोजन येथील कुमार गंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला एच आय तिम्मापुर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्याचबरोबर निवासी जिल्हाधिकारी विजय होनकेरी, पोलीस निरीक्षक कालिमिरची, चर्मकार समाजाचे राज्याध्यक्ष भीमराव पवार, सामाजिक कार्यकर्ते मल्लेश चौगुले, संजय लोकापूर, संतोष होनगल आदी मान्यवर कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उपस्थित होते.
या कार्यक्रमात युनिव्हर्सल कंपनी वतीने विवेक श्रेयकर यांनी पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी टिफिन बॉक्स बॅगचे वितरण केले. याचवेळी चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थिनी श्रुती नितीन चौगुले, प्राजक्ता रुपेश चव्हाण, आरुषी लखन माने, तनिष्का गजानन माणगावकर आदींचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला विठ्ठल पोळ, करेप्पा गुडगेणावर, प्रभाकर पोळ अश्विनी श्रेयकर, हिरालाल चव्हाण, यांच्यासह मोठ्या संख्येने मान्यवर आणि चर्मकार समाजातील बांधव उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मनपाचे ‘ऑपरेशन लायसन्स’; नियम धाब्यावर बसवणाऱ्या बड्या शोरूम्सना दणका

Spread the love  बेळगाव : बेळगाव महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानंतर आता शहरभर आरोग्य निरीक्षकांचे पथक मैदानात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *