काँग्रेसची १७ उमेदवारांची यादी जाहीर बंगळूर : पुढील लोकसभा निवडणुकीसाठी प्रदेश काँग्रेसची दुसरी यादी जाहीर झाली आहे. एकूण १७ मतदारसंघांसाठी उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. बेळगाव लोकसभा मतदारसंघातून मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पुत्र मृणाल हेब्बाळकर, कारवारमधून माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर तर चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातून पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची कन्या …
Read More »बेपत्ता युवकाचा मृतदेह जळगे- कारलगा जंगलात आढळला
खानापूर : दोन महिन्यापूर्वी जळगे येथून बेपत्ता असलेल्या तरुणाचा जळगे-कारलगा जंगलात झाडाला लटकलेल्या व गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. याबाबत माहिती अशी की, जळगे येथील युवक जोतिबा जयदेव गुरव (वय 24) हा गेल्या दोन महिन्यापूर्वी घरातील लोकांशी किरकोळ वाद झाल्याने न सांगता निघून गेला होता. त्यानंतर त्याच्या घरच्या …
Read More »कोगनोळी टोलनाक्यावर 14 लाख रुपयांची रोकड जप्त
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वरील कोगनोळी टोलनाक्यावर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या सीमा तपासणी नाक्यावर 14 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना देण्यासाठी भेटवस्तू, रोकड आदीसह अन्य वस्तूंची वाहतूक रोखण्यासाठी कर्नाटक प्रशासनाने तपासणी नाका उभा केला आहे. …
Read More »अबकी बार कारवार लोकसभा मतदार संघातून समिती उमेदवार….
खानापूर : राष्ट्रीय पक्षानी सातत्याने मराठी भाषिक आणि मराठा समाजाच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले आहे त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीने कारवार लोकसभा निवडणूक लढविण्याचा घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे त्यामुळे शिवस्वराज्य जनकल्याण फाऊंडेशनतर्फे समितीच्या निर्णयाला जाहीर पाठींबा व्यक्त करण्यात आला असून समितीने उमेदवार जाहीर करण्यास विलंब करू नये अशी मागणी करण्यात …
Read More »हायकोर्टाने बोर्ड परीक्षांबाबत निर्णय ठेवला राखून
५ वी, ८ वी, ९ वी, ११ वीच्या परीक्षेबाबत अनिश्चितता, शिक्षक गोंधळात बंगळूर : कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्य परीक्षा मंडळाशी संलग्न असलेल्या शाळांच्या इयत्ता ५ वी, ८ वी, ९ वी आणि ११ वीच्या बोर्डाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय रद्द करणाऱ्या एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाच्या आदेशाला आव्हान दिलेल्या राज्य सरकारच्या याचिकेवरील निकाल …
Read More »कॉंग्रेस उमेदवारांची दुसरी यादी आज शक्य; बेळगावातून मृणाल, चिक्कोडीतून प्रियांका तर कारवारमधून अंजली निंबाळकर
१७ उमेदवार निश्चित, चार मतदारसंघात पेच बंगळूर : लोकसभा निवडणुकीसाठी प्रलंबित असलेल्या मतदारसंघांसाठी उमेदवारांच्या निवडीबाबत काँग्रेस नेत्यांनी दिल्लीत बैठकांची मालिका सुरूच ठेवली आहे. १७ उमेदवारांची नावे निश्चित झाली असून राज्यातील चार मतदारसंघाचा पेच अजूनही कायम आहे. आज रात्री उशीरा किंवा उद्या (ता. २१) उमेदवारांची घोषणा करण्यात येणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष …
Read More »कोगनोळी तपास नाक्याला तहसिलदारांची भेट; अवैध वाहतुकीवर नजर
कोगनोळी : 16 मार्चपासून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर तालुका प्रशासन अलर्ट झाले आहे. निवडणुक काळातील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने कोगनोळी, आप्पाचीवाडी, मांगूर, बोरगाव, कोडणी आदी आंतरराज्य सीमेवर तपास नाके उभारले आहेत. यामध्ये पोलीस खाते, अबकारी खाते, महसूल विभाग व ग्रामपंचायत प्रशासन आदींचा समावेश आहे. तपासणी नाके मतदान होईपर्यंत म्हणजे …
Read More »अंतिम टप्प्यात ऊसतोडणी रेंगाळली
हंगाम लांबल्यामुळे शेतकऱ्यांसह साखर कारखानेही कोंडीत कोगनोळी : कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असतानाच मजुर टंचाई, गावागावातील म्हाई, यात्रांचा हंगाम व वाढलेल्या उन्हाच्या झळा यामुळे ऊसतोडणी कमालीची रेंगाळली आहे. तोडणी लांबल्यामुळे शेतकऱ्यांसह साखर कारखानेही कोंडीत सापडले आहेत. गेल्या काही वर्षात ऊसाखालील क्षेत्रात कमालीची वाढ झाली …
Read More »४ लाख रुपये किमतीचे चंदन जप्त; दोघांवर गुन्हा दाखल
हुक्केरी : तालुक्यातील गुडस गावात असलेल्या लक्ष्मी मंदिराजवळ चंदनाची अवैध वाहतुक करणाऱ्यांवर वनविभागाच्या पथकाने छापा टाकून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. रायबाग तालुक्यातील खनदाळ गावातील पुंडलिक बजंत्री आणि परसप्पा बजंत्री यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंदनाच्या तुकड्यांची वाहतुक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावर सोमवारी सायंकाळी वनविभागाचे अधिकारी व …
Read More »कॅनरा लोकसभा मतदारसंघातून डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब
खानापूर : कारवार (कॅनरा) लोकसभा मतदारसंघातून माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या उमेदवारीवर काँग्रेसने शिक्कामोर्तब केले आहे. याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येणार आहे. मंगळवारी दिल्लीत काँग्रेस श्रेष्ठींशी बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. या चर्चेत डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. …
Read More »