Sunday , December 22 2024
Breaking News

कर्नाटक

खानापूरातील हायटेक बस स्थानक, रुग्णालय लोकार्पण सोहळा लांबणीवर!

  खानापूर : खानापूर तालुक्याच्या ठिकाणी नव्याने बांधण्यात आलेल्या हायटेक बस स्थानक इमारत तसेच माता आणि शिशु हॉस्पिटल इमारतसह हेस्कॉम कार्यालयाच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा लांबणीवर पडला आहे. येत्या शुक्रवार दि. १२ जुलै रोजी सदर तिन्ही शासकीय इमारतींचा उद्घाटन समारंभ मंत्री तसेच जिल्ह्यातील आमदार, खासदार यांच्या उपस्थितीमध्ये नियोजित झाला होता. …

Read More »

निपाणी नगरपालिकेतील सीसीटीव्ही कॅमेरे बंदच

  दोन महिन्याचा उलटला काळ‌; पूर्वीप्रमाणे कॅमेरे लावण्याची मागणी निपणी (वार्ता) : नगरपालिकेतील कारभार पारदर्शक व्हावा, अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यावर नियंत्रण राहावे, यासाठी नगरपालिकेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पण लोकसभा निवडणुकीत मतदाना दिवशी कार्यालयातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले पण मतदान होऊन दोन महिन्याचा काळ उलटला तरीही कॅमेरे बंदच असल्याने नागरिकातून …

Read More »

सीमाभागातील आधारवड हरपला

  मान्यवरांच्या भावना ; निपाणी फाउंडेशनतर्फे आदरांजली निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील सहकारत्न रावसाहेब दादा पाटील हे गांधीवादी विचारसरणीचे होते. त्यांनी शेतकरी, कष्टकरी, बहुजन समाजातील सर्वसामान्य लोकांना अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून अनेक कुटुंबाला उभे केले. सामान्य माणसाला स्वाभिमानाने जगता आले पाहिजे, याचा पाठपुरावा त्यांनी आयुष्यभर केला. त्यांच्या निधनाने सीमाभागातील आधारस्तंभ …

Read More »

डीएमएस पीयु कॉलेज नंदगडमध्ये विद्यार्थी प्रतिनिधींची निवड

  खानापूर : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगाव संचलित डीएमएस पीयु कॉलेजमध्ये शैक्षणिक वर्ष 2024 25 सालाच्या विद्यार्थी प्रतिनिधींची निवड करण्यात आली. पदवी पूर्व विभागाच्या आदेशानुसार कॉलेजमध्ये मतदार साक्षरता संघ स्थापन करण्यात आला असून या संघाच्या माध्यमातून मतदानाचे महत्त्व आणि योग्य उमेदवार निवडीचे ज्ञान उपलब्ध करून दिले जाणार आहे, असे …

Read More »

सातव्या वेतन आयोग अंमलबजावणी विलंबाबाबत उद्या निवेदन सादर करणार

  खानापूर : खानापूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेची मासिक सभा सोमवार दिनांक ८ जुलै रोजी पार पडली. खानापूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या बैठकीतील ठराव व निर्णयानुसार उद्या बुधवार दि. १० जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता खानापूर तहसीलदारमार्फत कर्नाटक राज्य माननीय मुख्यमंत्री यांना कर्नाटक राज्य नोकरांच्या सातव्या वेतन आयोग अंमलबजावणी विलंबाबाबत …

Read More »

महाराज असल्याच्या भावनेतून जनसेवा शक्य नाही

  मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली ताकीद; डीसी, सीईओंच्या बैठकीत सक्त सूचना बंगळूर : जिल्हाधिकारी हे महाराज नसून लोकसेवक आहेत. महाराजांची भावना असेल तर विकास आणि प्रगती होणार नाही. राजकारणी आणि अधिकारी या दोघांनीही आपण जनतेचे सेवक आहोत हे लक्षात ठेवावे आणि जनतेची सेवा करावी, असे निर्देश मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले. विधानसौधच्या …

Read More »

सार्वजनिक आस्थापनांवर मराठी भाषेत नामफलक लावा अन्यथा तीव्र आंदोलन

  खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचा इशारा खानापूर : राज्य सरकारने शासकीय तथा निमशासकीय इमारतींवर त्रिसूत्रीय धोरणानुसार मराठीत नामफलक लावणे बंधनकारक आहे. कर्नाटक शासनाने देखील व्यावसायिक आस्थापनावर ६० टक्के कन्नड तर ४० टक्के स्थानिक भाषेत नामफलक लावण्याचे निर्देश दिले आहेत असे असताना खानापूर शहरात नव्याने होत असलेल्या हायटेक बस स्थानक …

Read More »

भिवशी येथे मोहरम सणास प्रारंभ

  सौंदलगा : परंपरेनुसार रविवार ७ रोजी रात्री ८ वाजता कुदळ मारण्याचा विधी पार पडल्यानंतर मोहरम सणास मोठ्या उत्साहास प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर शुक्रवार १२ रोजी रात्री ९ वाजता मोहरम सणानिमित्त पीरपंजे व ताबूत बसवणे, अभिषेक व नैवेद्य अर्पण करणे, असे धार्मिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. १४ जुलै दिवशी मोहरम …

Read More »

पंढरपूर यात्रेसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या गाड्यांना गणेबैल नाक्यावर टोल माफी द्या

  खानापूर ब्लॉक काँग्रेसची मागणी खानापूर : पंढरपूर यात्रेसाठी जाणाऱ्या वारकत्यांच्या गाड्यांना टोल माफी देण्यात यावी, यासाठी गणेबैल टोल नाक्यावर खानापूर ब्लॉक काँग्रेसतर्फे निवेदन देण्यात आले. महाराष्ट्रात वारकऱ्यांना वारीसाठी जाता-येता संपूर्ण टोलमाफी आहे त्याच धर्तीवर गणेबैल टोल नाक्यावर सुद्धा वारकऱ्यांना माफी द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यासंदर्भात टोल नाक्याचे …

Read More »

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची अक्कोळला भेट

  निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची श्री. दत्त संस्थानचे बाळेकुंद्री ट्रस्टी व अक्कोळ येथे तीन पिढ्या वैद्यकीय क्षेत्रात सेवा करणारे डॉ. संजय पंतबाळेकुंद्री, अकोळ यांच्या निवासस्थानासह हॉस्पिटलला भेट दिली. यावेळी त्यांनी पंत बाळेकुंद्री महाराजांच्या प्रतिमेचे दर्शन व आशीर्वाद घेतला. अक्कोळ हे …

Read More »