Tuesday , December 16 2025
Breaking News

कर्नाटक

शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : राजू पोवार

बंबलवाड येथे शाखेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : शेतकरी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी रयत संघटना कटिबद्ध आहे. सरकार कुणाचेही असो शेतकरी बांधवांच्या समस्या कायम आहेत. शेतकऱ्यांचे नावे घेऊन सत्तेवर यायचे आणि शेतकऱ्यांच्या विरोधी धोरणे राबवायची असे सरकारचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव देण्यास सरकार असमर्थ ठरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रगती खुंटते …

Read More »

कथालेखन माणसांच्या वेदनावरील वास्तव असावे

चंद्रकांत निकाडे : कुर्ली हायस्कूलमध्ये कथालेखन कार्यशाळा निपाणी (वार्ता) : समाज जो जगतो त्याचे प्रतिनिधीक साहित्यातून पुढे येत असते. सध्याच्या धावपळीच्या काळात वाचन व लेखन याकडे दुर्लक्ष होत आहे. कथा लेखकांनी माणसांच्या वेदनावर वास्तव लिहिले पाहिजे. यासाठी आपल्या लेखणीतून माणसाच्या काळजाला भिडणारे कथालेखन निर्माण करावे, असे मत ज्येष्ठ बाल साहित्यीक …

Read More »

तालुका, जिल्हा पंचायत निवडणुका पुन्हा लांबणीवर शक्य

परिसीमन आयोगाची मुदत सहा महिन्यांनी वाढवली बंगळूर : जिल्हा आणि तालुका पंचायतींच्या सीमांच्या पुनर्रचनेची प्रक्रिया अद्याप पूर्ण व्हायची आहे. त्यामुळे राज्य सरकारने पंचायत राज परिसीमन आयोगाची मुदत सहा महिन्यांनी वाढवली आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्य सरकारला निवडणुका लवकरात लवकर घेण्याच्या सूचना केल्या असल्या तरी, सरकारच्या या निर्णयामुळे पंचायत निवडणुकांना विलंब …

Read More »

खानापूर समितीच्या वतीने २७ जूनच्या मोर्चाची गर्लगुंजी, इदलहोंड, निडगल, सिंगिनकोप भागात जनजागृती

खानापूर : मराठी कागदपत्रांसाठी २७ रोजी होणाऱ्या महामोर्चात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती खानापूर यांच्या वतीने जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. शनिवारी गर्लगुंजी, इदलहोंड, निडगल, सिंगिनकोप येथे मोर्च्यात सहभागी होण्यासाठी पत्रके वाटण्यात आली. खानापूर तालुका म. ए. समितीच्या वतीने गर्लगुंजी, इदलहोंड, निडगल, सिंगिनकोप या भागात माजी आमदार दिगंबरराव पाटील …

Read More »

यडोगा येथे विठ्ठल रूक्मिणी व हनुमान मंदीराचे भूमिपूजन

खानापूर : खानापूरच्या आमदार डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांचे हस्ते आज यडोगा येथे विठ्ठल रूक्मिणी व हनुमान मंदीराचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष रामचंद्र खामले होते. आमदार अंजलीताई निंबाळकर यांच्या हस्ते विधीवत पूजा व मंदीराचे भूमिपूजन झाले. त्यानंतर अंजलीताई निंबाळकर, महादेव कोळी, वासुदेव नांदूरकर, अजित पाटील, नागराज येळ्ळूरकर व …

Read More »

चौपदरी रस्ता कामाची रमेश कत्ती यांचेकडून पहाणी

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर राणी चन्नम्मा सर्कल ते डॉ. हावळ इस्पितळापर्यंतचा जुना पुणे-बेंगळूर रस्ता चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. नुकतीच माजी खासदार रमेश कत्ती यांनी चौपदरी रस्ता कामाची पहाणी करुन रस्ता शेजारच्या गटारीचे काम व्यवस्थित करण्याचा आदेश रस्ता निर्माण ठेकेदाराला दिला. रस्त्यावर कसलेच अतिक्रमण असता कामा नये असे त्यांनी बजावून …

Read More »

खानापूर समितीकडून तालुक्यात ‘एक सीमावासी लाख सीमावासी’ मोर्चाची जोरदार जनजागृती

खानापूर : तालुका खानापूर समितीकडून तालुक्यात ‘एक सीमावासी लाख सीमावासी’ मोर्चाची जोरदार जनजागृती- खानापूर अध्यक्ष गोपाळ देसाई, देवाप्पना गुरव, गोपाळ पाटील, निरंजन सरदेसाई आणि युवा समिती अध्यक्ष धनंजय पाटील, दत्तू कुट्रे, राजू पाटील, राजाराम देसाई, किशोर हेब्बाळकर यांनी घेतली जनजागृती मोहिमेत आघाडी घेऊन संपूर्ण तालुका 27 जूनच्या महामोर्चासाठी पिंजून काढला. …

Read More »

संकेश्वरात संजय थोरवत याचा विहिरीत बुडून मृत्यू

संकेश्वर (प्रतिनिधी) : निडसोसी रस्ता येथील रहिवासी संजय वेंकटेश थोरवत (वय ५५) याचा विहिरीत पडून बुडून मृत्यू झाल्याची घटना आज उघडकीस आली आहे. याविषयी समजलेली माहिती अशी संजय थोरवत हा व्यसनाधीन होता. काल रात्री तो निडसोसी रस्ता लगत असलेल्या जाधव यांच्या विहिरीच्या कट्ट्यावर बसलेला असताना कलंडून पाण्यात पडून बुडून मृत्यू …

Read More »

केएलईच्या नेत्रतपासणी शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

१०२ रुग्णांची तपासणी : सोमवारी मेंदू, मणक्यांसाठी शिबिर निपाणी (वार्ता) : केएलई संस्थेचे संस्थापक डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पीटल मेडिकल रिसर्च सेंटर, बेळगाव, केएलई आरोग्य सेवा केंद्र आणि रोटरी क्लब निपाणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत आरोग्य तपासणी शिबीरास रूग्णांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रोटरी क्लबच्या इमारतीत पार पडलेल्या मोफत नेत्र तपासणी …

Read More »

पेरणीसाठी बैलांची ॲडव्हान्स बुकींग…

संकेश्वर (महंमद मोमीन) : आर्द्रा नक्षत्र काळात बरसणारा पाऊस खरीप पेरणीला पोषक ठरलेला दिसतो आहे. गेल्या दोन दिवसांपासून शेतकऱ्यांची खरीप पेरणीसाठी धांदल उडालेली दिसत आहे. शेतीच्या कामांसाठी ट्रॅक्टरचा वापर अधिक होत गेला तशी बैलांची संख्या बऱ्याच प्रमाणात घटलेली दिसत आहे. त्यामुळे उपलब्ध बैल जोडीला पेरणीसाठी मोठी मागणी दिसत आहे. मृग …

Read More »