Monday , December 15 2025
Breaking News

कर्नाटक

बंगळुरूमध्ये शेतकरी नेते राकेश टिकेत यांच्यावर शाईफेक; कार्यक्रमात गोंधळ

बेंगळुरू : भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकेत यांच्यावर आज शाईफेक करण्यात आली. बेंगळुरूमधील पत्रकार परिषदे दरम्यान ही घटना घडली. पोलिसांनी शाईफेक करणार्‍याला ताब्यात घेतले आहे. या शाईफेकीमुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. शाईफेक करणार्‍यांना टिकेत यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली असल्याचे वृत्त आहे. गांधी भवनमध्ये शेतकरी नेते राकेश टिकेत आणि युद्धवीर …

Read More »

व्हिडीओ चुकीचा असल्याची देवाप्पा गुरव यांची स्पष्टोक्ती

खानापूर : रविवार दि. 29 रोजी दुपारी खानापूर तालुका समितीला कांहीं कार्यकर्त्यांनी मला जबरदस्तीने नेऊन खोटेनाटे सांगून खानापूर समितीच्या एकीच्या प्रक्रियेत बाधा आणण्याच्या हेतूने माझ्याकडून त्यांनी लिहिलेले वाचून घेतले. त्या दरम्यान त्यांनी जाणीवपूर्वक माझा व्हिडीओ काढला आणि तो समाज माध्यमांवर प्रसारित केला. त्यामुळे तालुक्यातील समिती कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण झाला. त्याकरिता …

Read More »

भोगावती नदीत बुडून शाळकरी मुलीचा मृत्यू

कोगनोळी : राधानगरी धरणातून भोगावती नदीतील पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्यामुळे पोहायला गेलेल्या एका शाळकरी मुलीचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्घटना सोन्याची शिरोली (तालुका राधानगरी) येथे घडली. सई नामदेव चौगुले (वय 10) असे या मुलीचे नाव असून, ती गावातील प्राथमिक शाळेत तिसरीमध्ये शिकत होती. दरम्यान, नदीच्या काठावर कपडे धुण्यासाठी आलेल्या महिलांनी …

Read More »

कर्नाटकातून सितारामन, अभिनेता जग्गेश यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी

बंगळूर : कर्नाटक विधानसभेतून निवडून द्यावयाच्या राज्यसभेच्या चारपैकी दोन जागांसाठी भाजपने रविवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन व अभिनेते आणि राजकारणी जग्गेश यांना उमेदवारांची घोषणा केली. ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून भाजपमध्ये प्रवेश केलेले तिरुवेकेरेचे माजी आमदार जग्गेश यांची विधानसभा सदस्य म्हणूनही निवड झाली आहे. आता भाजपने आश्चर्यकारकरित्या त्यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली. …

Read More »

ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र हजारे आंतरराज्य विशेष पत्रकार पुरस्काराने सन्मानित

निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र राज्य युवा पत्रकार संघाचा १३ वा वर्धापनदिन रविवारी (ता. २९) उत्साहात पार पडला. त्यानिमित पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. त्यामध्ये निपाणी येथील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र हजारे यांना आंतरराज्य विशेष पत्रकार पुरस्कार महाराष्ट्र युवा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूर उत्तरच्या पहिल्या महिला …

Read More »

कर्नाटकहून अयोध्येला जाणाऱ्या मिनी बसचा भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत 7 ठार

नानपारा : लखीमपूर महामार्गावर नैनिहाजवळ रविवारी पहाटे एका वेगवान ट्रक आणि ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक झाली. या अपघातात ट्रॅव्हल्समधील तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला. मृतांमध्ये चार पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. नऊ प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मोतीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील …

Read More »

कोगनोळी येथील गटारी पावसाळ्यापूर्वी साफ करा

ग्राम पंचायत सदस्या मनीषा परिट : ग्रामपंचायतीने लक्ष देण्याची मागणी कोगनोळी : येथील ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील प्रभाग क्रमांक 1 ते 10 पर्यंतच्या गावातील गटारीमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचून मोठी दुर्गंधी निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामपंचायतीने पावसाळ्यापूर्वी गावातील सर्व गटारी स्वच्छ करून घ्यावेत, अशी मागणी उत्तम पाटील …

Read More »

निपाणीतील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र हजारे यांना आंतरराज्य विशेष पत्रकार पुरस्कार

निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र १३ व्या राज्य युवा पत्रकार संघाच्या वर्धापनदिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आज, रविवारी (ता. २९) कोल्हापुरात होत आहे. त्यात ‘सकाळ’चे येथील बातमीदार राजेंद्र हजारे यांना आंतरराज्य विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. युवा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे यांनी या पुरस्काराची घोषणा केली. भाजपचे प्रवक्ता, माजी …

Read More »

“…..आर्य कि द्रविड” वरून मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेत्यात जुंपली

हेडगेवारांच्या अभ्यासक्रमाला विरोध, पाठ्यक्रमाच्या वादावर लवकरच तोडगा बंगळूर : विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी आरएसएसच्या मूळतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शनिवारी सिध्दरामय्या यांना, ‘तुम्ही द्रविड किंवा आर्य’ ते स्पष्ट करा असे आवाहन केले. अभ्यासक्रमाच्या वादावर लवकरच तोडगा काढण्याची त्यांनी ग्वाही दिली. मला सिद्धरामय्या यांना विचारायचे आहे, ते कुठून …

Read More »

खानापूर तालुका समितीची महत्वपूर्ण बैठक सोमवारी

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक सोमवार दि. 30 मे रोजी राजा शिवस्मारक येथे बोलाविण्यात अली आहे. या बैठकीत 1 जून रोजी होणाऱ्या हुतात्मा दिन गांभीर्याने पाळणे, आगामी तालुका व जिल्हा पंचायत निवडणूका संदर्भात चर्चा करणे, महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची सीमाप्रश्न उच्चधिकार समितीच्या अध्यक्षपदी निवड …

Read More »