संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरातील श्री शंकरलिंग समुदाय भवन येथे रविवारी दि. ६ मार्च २०२२ रोजी महिला दिनाचे औचित्य साधून स्त्रीत्वाचा उत्सव ‘स्वयंसिद्धा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी यांनी केले आहे. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना नगराध्यक्षा सौ. सिमाताई …
Read More »श्रींच्या हस्ते मठाच्या सेवकांचा सत्कार
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठात श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींच्या हस्ते मठाचे सेवक बाबासाहेब जाधव, सुरेश आगम, सर्जेराव गायकवाड, विलास आगम, राजू शेंडेकर, पिंटू कारखाने, ओंम शिंदे, संदिप जाधव यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी मठाचे व्यवस्थापक अर्जुन कानवडे, प्रकाश हुद्दार, गिरीश कुलकर्णी, गणपती पाटील, सुहास …
Read More »संकेश्वरात इगनायट जिमचे शानदार उद्घाटन
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर जुन्या पुणे-बेंगळूर मार्गावरील सदा कब्बूरी यांच्या एम.एस.बिल्डींगच्या दुसऱ्या मजल्यावरील इगनायट पर्सनल ट्रेनिंग स्टुडिओचा उद्घाटन सोहळा नुकताच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. उपस्थितांचे स्वागत जिमचे प्रशिक्षक गौतम उर्फ ओंकार पोवार यांनी केले. उद्घाटन सोहळ्याला माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, सभापती सुनिल पर्वतराव, नगरसेवक डॉ. मंदार हावळ, सदा कब्बूरी, …
Read More »विद्यार्थ्यांनी दडपण न घेता परीक्षेला सामोरे जावे : प्रा. सोहन तिवडे
‘गोमटेश’मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन निपाणी (वार्ता) : दुसऱ्यांची नक्कल करण्यापेक्षा आपल्यातले सुप्तगुण कसे ओळखावेत आणि त्या गुणांचा विकास कसा करावा. परीक्षेच्या कालावधीत पालकांनीही विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. या शिवाय अभ्यासामुळे घरातील वातावरण हे चांगले राहावे यासाठी कुटुंबातील सदस्यांनी प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांनी मनावर दडपण न ठेवता परीक्षेला सामोरे जावे. …
Read More »पालखी प्रदक्षिणाने बाबा महाराज पुण्यतिथी सोहळ्याची सांगता
निपाणी (वार्ता) : येथील दर्गा संस्थापक संत बाबा महाराज चव्हाण पुण्यतिथी सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. गेले आठ दिवस ज्ञानेश्वरी पारायण, भजन, कीर्तन, प्रवचन आदी कार्यक्रम पार पडले. शनिवारी शेवटच्या दिवशी दिंडी प्रदक्षिणा चव्हाणवाडा ते दत्त मंदिर, हरी मंदिर, थळोबा पेठ, विद्या मंदिर मैदान समाधी स्थळ तसेच दर्गा भेट व …
Read More »खानापूर तालुका क्षत्रिय मराठा समाजातर्फे डॉ. सोनाली सरनोबत यांचा सत्कार
खानापूर : खानापूर तालुका क्षत्रिय मराठा समाजातर्फे दि. 4 मार्च रोजी मेळावा आणि प्रीतीभोजनाचा कार्यक्रम कौंदल येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी क्षत्रिय मराठा समाजाच्या खानापूर तालुका महिला अध्यक्षपदी डॉ. सोनाली सरनोबत यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला दिलीप पवार, डी. एम. भोसले, अभिलाष देसाई, तानाजी कदम, …
Read More »मानकापूर कुस्ती मैदानात दोन्ही कुस्त्या बरोबरीत
एकापेक्षा एक अशा कुस्त्यांनी मैदान रंगले : कुस्ती प्रेमींचा प्रतिसाद निपाणी (वार्ता) : माणकापूर येथील ग्रामदैवत श्री मलकारसिद्ध देवाच्या महाशिवरात्री यात्रेनिमित्त भरविण्यात आलेल्या कुस्ती मैदानात एकापेक्षा एक अशा कुस्त्या झाल्याने या कुस्ती मैदानाला कुस्ती प्रेमींच्याकडून प्रतिसाद मिळाला. प्रथम क्रमांकाची कुस्ती तुषार जगताप- अहमदनगर व हरीश देहल्ली-उत्तराखंड यांच्यात तर दुसर्या क्रमांकाची …
Read More »अर्थसंकल्पात कोणतेच अतिरिक्त कर नाहीत
कर्नाटकाचा तुटीचा अर्थसंकल्प सादर, विकास योजनावर भर बंगळूर : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शुक्रवारी २०२२-२३ या वर्षासाठी तुटीचा अर्थसंकल्प सादर केला. मुख्यमंत्र्यांनी आपल्या पहिल्या अर्थसंकल्पात सामान्यांवर अतिरिक्त कराचा बोजा टाकला नाही. त्यांच्या अंदाजपत्रकानुसार, एकूण प्राप्ती २.६१ लाख कोटी रुपये आहे, तर एकूण खर्च २.६५ लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. …
Read More »मणतुर्गा शिवारात आढळले वाघाच्या पावलांचे ठसे
खानापूर : मणतुर्गा (ता. खानापूर) शिवारात वाघाच्या पावलांचे ठसे आढळून आल्याने परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. वनखात्यानेही शिवारात आढळलेले ठसे वाघाचे असल्याचे स्पष्ट केल्याने गांभीर्य वाढले आहे. मणतुर्ग्याजवळील जंगलात स्थानिक शेतकऱ्यांना वाघाच्या डरकाळ्या ऐकू आल्या होत्या. पण, वाघाने शिवाराच्या दिशेने कधी मोर्चा वळवला नव्हता. चार दिवसांपूर्वी गावापासून काही …
Read More »बेळगांव जिल्हा बॅंक राज्यात ‘नंबर वन’ : गजानन क्वळी
संकेश्वर (प्रतिनिधी) : बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राज्यात नंबर वन ठरल्याचे नूतन संचालक गजानन क्वळी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले, आपणाला नामनिर्देश संचालक म्हणून निवड केलेल्या भाजपाचे मंत्रीगण, खासदार आमदार या सर्वांचा मी मनपूर्वक आभारी आहे. राज्यातील जिल्हा बॅंकांत बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अव्वल स्थानावर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta