कसे लढणार कोरोनाशी : रुग्णांचा प्राण कंठाशी निपाणी : विषाणूजन्य आजारांवर गुणकारी ठरलेल्या ’रेमडेसिव्हीर’ या इंजेक्शनची सर्वत्र मोठी मागणी असल्याने निपाणी शहरात अनेक दिवसांपासून त्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. काही खासगी रुग्णालयांनी हात वर करीत रुग्णांच्या नातेवाईकांच्या हाती चिठ्या सोपविल्या आहेत. औषध आणल्यावर इलाज, अशी भूमिका घेतल्याने कोरोनाग्रस्तांचे प्राण कंठाशी …
Read More »’खाकी’ची रोगप्रतिकारशक्ती वाढली!
निपाणी पोलिसांनी केली कोरोनाच्या दुसर्या लाटेवर मात : व्यायामावर केले लक्ष केंद्रित निपाणी : योग्य नियोजनामुळे निपाणी पोलीस कोरोनावर मात करण्यात यशस्वी ठरले आहेत. परिणामी, कोरोनाच्या दुसर्या लाटेत एकाही पोलिसाला प्राण गमवावे लागले नाहीत. यावरून पहिल्या लाटेनंतर आलेल्या अनुभवातून घेतलेल्या खबरदारीमुळे पोलिसांची रोगप्रतिकारशक्ती बर्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. निपाणी …
Read More »कृषी सुधारणा कायद्यांविरोधात बेळगावात शेतकऱ्यांकडून काळा दिन
बेळगाव : केंद्र सरकारच्या कृषी सुधारणा कायद्यांविरोधात विविध शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनाला आज सहा महिने पूर्ण झाले. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय संयुक्त किसान मोर्चाने दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत बेळगावातही या कायद्यांविरोधात काळा दिन पाळण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी काळे झेंडे फडकावत आंदोलन केले. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्याहीताच्या आड येणारे कृषी सुधारणा …
Read More »बंद असलेली प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू करा : खानापूर युवा समिती
बेळगाव : खानापूर तालुक्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाचे प्रयत्न अपुरे पडत असून ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याची दखल घेऊन कापोली, माचीगड व माणिकवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तातडीने सुरू करावे, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे तहसीलदार रेश्मा …
Read More »फुल उत्पादक-व्यापारी संकटात : उद्यापासून मार्केट बंद
कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी राज्य सरकारनेजारी केलेल्या लॉकडाउनमुळे बेळगावात फुलउत्पादकांना व विक्रेत्यांना मोठ्या नुकसानीला सामोरेजावे लागत आहे. विक्रीस आणलेली फुले रस्त्यावरओतून देऊन रिकाम्या हाती घरी परतण्याची वेळत्यांच्यावर आली आहे. व्यापार नसल्याने उद्यापासूनफुल मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लॉकडाउनमुळे बेळगाव होलसेल फुलमार्केट ओस पडले आहे. बाजारात आणलेली फुले ग्राहकांअभावी तशीच पडून रहात असल्याने शेतकरी आणि विक्रेत्यांनाही नुकसान सोसावे लागत आहे. लॉकडाउनमुळे लग्नसोहळे व अन्य समारंभांना बंदी आहे तर देव गाभाऱ्यात अन मंदिरे बंद अशी स्थिती आहे. त्यामुळे फुलांना मागणी नाही. परिणामी फुल उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना संकटात …
Read More »सामाजिक जाणिवेतून कोरोना योद्ध्यांना किट
उत्तम पाटील : निपाणी मतदार संघात १५०० जणांना वाटप निपाणी : दोन महिन्यापासून निपाणीसह परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. या काळात अंगणवाडी, आशा कार्यकर्त्या, ग्रामपंचायत, नगरपालिका कर्मचारी, वैद्यकीय मंडळी, पत्रकार जीवावर बेतून काम करत आहेत. या कोरोना योद्ध्यांची दखल घेऊन बोरगाव अरिहंत परिवाराचे संस्थापक रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवा उद्योजक …
Read More »राज्यात लस, ब्लॅक फंगसच्या औषधांचा तुटवडा : आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर
बेंगळुरू : राज्यात लस, ब्लॅक फंगसच्या औषधांचा तुटवडा आहे हे सत्य आहे. ही समस्या सोडवण्यासाठी केंद्रीयमंत्री सदानंदगौडा यांच्या संपर्कात आहोत. केंद्राकडे २० हजार व्हायल्स इंजेक्शन्सची मागणी केली असून केंद्राने ११५० व्हायल्सचा पुरवठा केला आहे अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली.बंगळुरात पत्रकारांशी बोलताना आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर म्हणाले, प्राथमिक …
Read More »