Monday , December 15 2025
Breaking News

बेळगाव

स्व. बी. शंकरानंद यांच्या मालकीची मालमत्ता घोटाळ्याप्रकरणी आणखी एक ताब्यात

  बेळगाव : माजी केंद्रीय मंत्री डी. बी. शंकरानंद यांच्या मालकीच्या मालमत्तेची बनावट कागदपत्रे तयार करून कोट्यवधी रुपयांची मालमत्ता हडप केल्याप्रकरणी खडेबाजार पोलिसांनी अयुब पार्थनळ्ळी याला अटक केली आहे. सध्या, या प्रकरणासंदर्भात खडेबाजार पोलिसांनी आरोपी सुनील तलवार आणि अयुब पार्थनळ्ळी यांना अटक केली आहे. आरोपी सुनील तलवार हा हुक्केरी तालुक्यातील …

Read More »

प्रेमचंद : शोषित-पीडित जनतेचे साहित्यकार : प्रो. डॉ. प्रतिभा मुदलियार

  बेळगाव : धनपत राय, ज्यांना संपूर्ण भारत “प्रेमचंद” या नावाने ओळखतो, त्यांना “उपन्यास सम्राट” तसेच “कलम का सिपाही” असे गौरवोपाधीने संबोधले जाते. प्रेमचंद यांनी केवळ हिंदी कथांना वास्तवाचा आधार दिला नाही, तर स्वतःच्या जीवनानुभवातून त्या कथांना एका नव्या सर्जनशीलतेने समृद्ध केले. पुढे ते हिंदी आणि उर्दू साहित्याचे सर्वाधिक लोकप्रिय …

Read More »

वीर सावरकर चषक बेळगावच्या आबा हिंद क्लबने पटकाविला

  बेळगाव : नुकत्याच इचलकरंजी येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र व कोल्हापूर ॲमेचर असोसिएशन यांच्या सानिध्याखाली सावली सोशल सर्कल यांच्या वतीने निमंत्रितांच्या आंतरराज्य जलतरण स्पर्धेत बेळगावच्या आबा हिंद क्लबच्या जलतरणपटूनी उत्कृष्ट कामगिरी करून 48 सुवर्ण 20 रौप्य व 23 कांस्य असे एकूण 91 पदके संपादन करून उत्कृष्ट कामगिरी केली व आबा …

Read More »

रोटरी ई क्लबतर्फे गर्भवती मातांना सुका मेवा, फळांचे वाटप

  बेळगाव : रोटरी दिनदर्शिकेनुसार जुलै हा महिना माता व मुलांच्या आरोग्यासाठी समर्पित असल्यामुळे रोटरी ई क्लबच्यावतीने गर्भवती मातांना सुका मेवा व फळांचे वाटप करण्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला. चौगुलेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र व शहापूर येथील होसूर आरोग्य केंद्र येथे रोटरी ई क्लबच्या सदस्यांनी गर्भवती मातांना सुका मेवा व फळांचे …

Read More »

प्रभुनगरजवळ झालेल्या भीषण अपघातात जवानाचा जागीच मृत्यू

  खानापूर : खानापूर–बेळगाव मार्गावर प्रभुनगर गावाजवळ दुचाकीवरून प्रवास करत असलेल्या सुट्टीवर आलेल्या जवानाचा भीषण अपघात होऊन डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे जागीच मृत्यू झाला आहे. सुरभ द्रौपदकर (२८) असे जवानाचे नाव आहे. अपघात इतका भयानक होता की जवान रस्त्यावर दूर फेकला गेला. अपघातग्रस्त दुचाकीचा नंबर केए 22 एचके 8494 असून …

Read More »

भाषिक अल्पसंख्यांकांच्या हक्कांची अंमलबजावणी करण्यासंदर्भात केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगातर्फे बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

  बेळगाव : भाषिक अल्पसंख्यांक आयोगाच्या आयुक्तांसमोर अहवाल सादर करण्यापूर्वी भाषिक अल्पसंख्यांकांच्या हक्कांची अंमलबजावणी करा अशी सूचना केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगातर्फे बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सीमा भागात केल्या जाणाऱ्या कन्नडसक्तीबाबत पत्रव्यवहार करण्यात आला होता त्यानंतर बेळगाव जिल्ह्याला भेट देऊन भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्काबाबत अभ्यास अहवाल …

Read More »

छत्तीसगड मधील नन्सच्या अटकेचा बिशप यांच्याकडून निषेध

  बेळगाव : छत्तीसगड पोलिसांनी दोन कॅथोलिक नन्सना अटक केल्याच्या घटनेचा बेळगावचे बिशप रेव्ह. डॉ. डेरेक फर्नांडिस यांनी तीव्र निषेध केला आहे. अटक करण्यात आलेल्या नन्स व युवकासाठी प्रार्थना करण्याचे आणि या अटकेविरुद्ध आवाज उठवण्याचे आवाहन केले आहे. केरळ येथील दोन कॅथोलिक नन – सिस्टर प्रीती मेरी व सिस्टर वंदना …

Read More »

इस्कॉन जन्माष्टमीसाठी मुहूर्तमेढ संपन्न

  बेळगाव : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना मृत संघ (इस्कॉन)च्या वतीने यंदा भव्य प्रमाणात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. त्यासाठी शुक्रवार पेठ टिळकवाडी येथील श्री श्री राधा गोकुळ आनंद मंदिर परिसरात भव्य मंडप उभारण्यात येणार आहे. त्या मंडपाची मुहूर्तमेढ आज सकाळी इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ संन्यासी परमपूज्य भक्ती रसामृत …

Read More »

बेळगाव जिल्ह्यात जलजीवन मिशन कामांची जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांच्याकडून पाहणी

  बेळगाव : जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांनी बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती, मुडलगी गोकाक, रामदुर्ग आणि रायबाग तालुक्यातील ग्रामपंचायत क्षेत्रात सुरू असलेल्या जलजीवन मिशन कामाची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. राहुल शिंदे यांनी सौंदत्ती तालुक्यातील तडलसुर ग्रामपंचायत हद्दीतील हलकी गावाला भेट देऊन जलजीवन मिशन योजना प्रकल्पाचे कामकाज अहवालानुसार झाले आहे …

Read More »

रस्ते सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकारी यांनी दिले निर्देश…..

  बेळगांव: अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी रस्ते सुरक्षिततेचे उपाय करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था उत्तम प्रकारे सांभाळली जावी यासाठी सुरक्षा आधारित कृती आराखडा राबवला पाहिजे. यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आवश्यक ती पावले उचलावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बुधवारी (जुलै ३०) झालेल्या जिल्हास्तरीय रस्ते …

Read More »