Sunday , December 14 2025
Breaking News

बेळगाव

बेळगाव ग्रामीणमध्ये प्रथमच कावड यात्रा

  बेळगाव : बेळगाव ग्रामीण परिसरातील बेनकनहळ्ळी गावातील काही हिंदू युवकांनी एकत्र येऊन प्रथमच कावड यात्रेचे आयोजन केले. श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी पाच पवित्र नद्यांचे जल एकत्र करून खानापूर येथील मलप्रभा नदीचे जल घेऊन, पारंपरिक पद्धतीने गंगा पूजन आणि आरती करून कावड यात्रेला प्रारंभ करण्यात आला. ही कावड यात्रा खानापूर-बेळगाव …

Read More »

शहापूर मंगाई देवी ट्रस्टतर्फे आजपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन

  बेळगाव : अळवण गल्ली शहापूर येथील श्री मंगाई देवी देवस्थान ट्रस्ट आणि मराठा पंच मंडळातर्फे श्रावण मासानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज बुधवारपासून या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. आज बुधवारी सकाळी वेद पठण, देवीला अभिषे,कुंकुम पूजा व महापूजा होणार आहे. उद्या गुरुवारी दुपारी तीन वाजल्यापासून दुर्गा सप्तशती, …

Read More »

वाढदिवस विशेष : आबासाहेब नारायणराव दळवी एक अष्टपैलू व्यक्तिमत्व!

आबासाहेब नारायणराव दळवी एक प्रतिभावंत अष्टपैलू व्यक्तिमत्व! ज्यांचे संपूर्ण आयुष्य त्यांच्या कुटुंबीयांसह समाजाला आदर्शवत आहे. पेशाने शिक्षक असणारे आबासाहेब हे एक आदर्श शिक्षक तर आहेतच पण ते एक आदर्श व्यक्ती आहेत. फक्त नोकरी करणे हे त्यांच्या मनाला कधी पटलेच नाही. नोकरीसोबतच समाजाच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. नोकरीसोबतच कला, क्रीडा …

Read More »

कर्ले व जानेवाडी येथे युवा समितीच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वितरण

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत कर्ले येथील मराठी उच्च प्राथमिक शाळेत पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा कमिटीचे सदस्य एन. बी. कुगजी होते. युवा समितीचे मच्छे येथील सहकारी श्री. केदारी करडी यांनी “सीमाभागात मराठी भाषा …

Read More »

नोकरीवरून काढून टाकल्यामुळे मानसिक तणावातून युवकाची आत्महत्या

बेळगाव : नोकरीवरून काढून टाकल्यामुळे मानसिक तणावात आलेल्या एका युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील मोदगा गावात घडली. मृत युवकाचे नाव रवी विरणगौड हट्टीहोळी (वय २४) असे असून तो एमसीए पदवीधर होता. तो गेल्या वर्षभरापासून पुण्यातील एका ग्लोबल कंपनीमध्ये नोकरी करत होता. मात्र, सुमारे १५ दिवसांपूर्वी त्याला काही कारणांमुळे कंपनीतून …

Read More »

आझम नगर परिसरात दिवसाढवळ्या भामट्यांनी सोन्याची चेन हिसकावली!

  बेळगाव : दिवसाढवळ्या एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून चोरटे पळून गेल्याची घटना बेळगावमधील आझम नगरमध्ये घडली. पद्मजा कुलकर्णी (वय ७५) आज दुपारी ३-४ च्या सुमारास केएलई हॉस्पिटलच्या मागील रस्त्यावरून तिच्या नातवासोबत चालत असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी पद्मजा कुलकर्णी यांच्या गळ्यातील ३५ ग्रॅमची चेन हिसकावून पळ काढला. दरम्यान, …

Read More »

आं. शा. फुटबॉल स्पर्धेत बेळगाव कॅन्टोन्मेंट हायस्कूल संघ अजिंक्य!

  बेळगाव : बेळगावच्या कॅन्टोन्मेंट बोर्ड इंग्लिश मीडियम हायस्कूलने खानापूर (जि. बेळगाव) येथील साई स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे आयोजित आंतरशालेय आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले आहे. साई स्पोर्ट्स अकॅडमी खानापूरतर्फे नुकत्याच आयोजित आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा -2025 मध्ये जिल्ह्यातील 10 शालेय संघांनी भाग घेतला होता. ज्यामध्ये बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्ड इंग्लिश मीडियम हायस्कूल संघाने …

Read More »

बेनकनहळ्ळी ग्राम पंचायतीचे सेक्रेटरी प्रताप मोहिते देखील निलंबित

  बेळगाव : बेनकनहळ्ळी ग्राम पंचायतीच्या पीडीओ सुजाता बटकुर्की यांच्यासह सेक्रेटरी प्रताप मोहिते यांनादेखील जिल्हा पंचायतीचे सीईओ राहुल शिंदे यांनी निलंबित केले आहे. पीडीओ आणि सेक्रेटरीअभावी ग्राम पंचायतीच्या कामकाजावर परिणाम झाला असून विविध कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना माघारी फिरावे लागत आहे. कंग्राळी बुद्रुकचे पीडीओ गोविंद रंगापगोळ यांच्यावर अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला …

Read More »

नाथ पै चौक गणेशोत्सव मंडळ नवीन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी जगन्नाथ पाटील यांची निवड

  बेळगाव : शहापूर बॅरिस्टर नाथ पै चौक येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची बैठक आज मंगळवारी संपन्न झाली. या बैठकीत यावर्षी मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे केले जाणार आहे. त्यासाठी 2025-26 साला करीता नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. नव्या कार्यकारिणी अध्यक्षपदी जगन्नाथ पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. काळभैरवनाथ मंदिरात पार …

Read More »

अर्णव, युवराज, तनवी, श्रेया यांची राष्ट्रीय डायव्हिंग स्पर्धेसाठी अभिनंदनीय निवड

  बेळगाव : नुकत्याच बेंगलोर येथील केन्सिंगटन हलसूर डॉल्फिन जलतरण तलावात कर्नाटक राज्य जलतरण संघटना आयोजित सब ज्युनिअर ज्युनिअर व सीनियर डायव्हिंग स्पर्धेत आबाहिंद क्लबच्या डायव्हिंग पटूनी उत्कृष्ट कामगिरी करून कर्नाटक राज्य संघात स्थान मिळवले. यामध्ये कुमार अर्णव कुलकर्णी ग्रुप 1 एक मीटर स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग एक रौप्य पदक, कुमार …

Read More »