बेळगाव : बेळगाव शहरासह उपनगरात गांजा व इतर अंमली पदार्थ विक्री विरोधात पोलिसांनी धडक मोहीम राबवून बेळगाव शहर अंमली पदार्थ मुक्त करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल माजी नगरसेविका व महिला आघाडीतर्फे आज सोमवारी सकाळी बेळगाव पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन …
Read More »बेळगाव – मंगळुरु बसचे नियंत्रण सुटल्याने खड्ड्यात कोसळली; एका प्रवाशाचा मृत्यू
अंकोला : उत्तर कन्नड जिल्ह्यात घडलेल्या घटनेत चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस खड्ड्यात कोसळली आणि बसमध्ये अडकलेल्या एका प्रवाशाचा मृत्यू झाला. बेळगावहून मंगळुरूला जाणारी ही खाजगी बस असल्याची माहिती आहे. मुसळधार पावसामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि खड्ड्यात कोसळली. ही घटना उत्तर कन्नड जिल्ह्यातील अंकोला तालुक्यातील अगासुरुजवळ घडली. बसमध्ये अडकलेल्या …
Read More »गणेशोत्सव मंडळांना परवानगीसाठी पंधरा दिवस आधीपासूनच ‘एक खिडकी’ : पोलिस आयुक्तांची माहिती
बेळगाव : शहर आणि उपनगरांतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना परवानगीसाठी गणेशोत्सवाच्या पंधरा दिवस अगोदर विविध ठिकाणी ‘एकखिडकी’ सुरू केली जाईल, अशी माहिती पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली. होणाऱ्या पुढील महिन्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी पोलिस आयुक कार्यालयात बैठक झाली. यावेळी मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी मत व्यक्त …
Read More »सीमाभागातील कन्नडसक्ती त्वरित मागे घावी; पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना युवा समिती सीमाभागचे निवेदन!
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची गोकाक येथील निवासस्थानी भेट घेण्यात आली आणि व सीमाभागात होत असलेल्या कन्नडसक्तीला आपण बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने लक्ष घालून कन्नडसक्ती त्वरित मागे घावी असे निवेदन सादर केले. त्यावेळी अध्यक्ष शुभम शेळके यांनी मराठी भाषिकांच्यावर कन्नडसक्ती तीव्र …
Read More »सौंदत्ती तालुक्यातील मळगली येथे विहिरीत पडून वडील, मुलाचा दुर्दैवी मृत्यू
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील मळगली गावात रविवारी विहिरीत बुडून वडील आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. बसवराज केंगेरी (४०) आणि मुलगा धरेप्पा केंगेरी (१४) अशी मृतांची नावे आहेत. बसवराज केंगेरी हे सौंदत्ती तालुक्यातील मुरगोड गावचे रहिवासी आहेत. पत्नीच्या गावात आपल्या जमिनीवर कीटकनाशके फवारण्यासाठी शेतात गेले होते. बसवराज हे …
Read More »मार्कंडेय नदी पात्रात उडी मारलेल्या व्यक्तीचा शोध सुरूच; उद्या पुन्हा शोधमोहीम
बेळगाव : काल दि 19/07/2025 कंग्राळी खुर्द येथील मार्कंडेय नदी पात्रात एका व्यक्तीने उडी मारुन आत्महत्या केल्याची माहिती मिळाल्यानंतर आपल्या टीमने तत्काळ शोधमोहीम सुरू केली होती. काल सायंकाळी झाल्याने मोहीम थांबवावी लागली. त्यानंतर आज सकाळी सुमारे 10:30 वाजल्यापासून सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत शोधकार्य पुन्हा राबवण्यात आले. शोधामध्ये अत्याधुनिक पाण्याखालील कॅमेऱ्यांचा …
Read More »बस स्टँड परिसरात चोरी करणाऱ्या दोन चोरांना अटक
बेळगाव : बेळगाव सेंट्रल बस स्टँड परिसरात प्रवाशांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोन आरोपींना मार्केट पोलिसांनी अटक केली आहे. बेळगाव सेंट्रल बस स्टँडवर गर्दीच्या ठिकाणी बसमधून उतरताना सोन्याचे दागिने चोरी झाल्याप्रकरणी पुंडलिक भीमप्पा लेनकन्नावर यांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात पोलिसांनी प्रकाश विजय जाधव आणि कालिदास दिलीप बराडे यांना …
Read More »मटका घेणाऱ्या एकास अटक…
बेळगाव: बेळगाव शहरातील माळमारुती पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या कणबर्गी येथील सेंच्युरियन क्लबजवळ मटका घेणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव नागराज यल्प्पाला तळ्ळूर असे आहे. तो सार्वजनिक रस्त्यालगत असलेल्या मटका नंबरवर जनतेकडून पैसे वसूल करून ओसी जुगार खेळत होता. याबाबतच्या विशिष्ट माहितीच्या आधारे, माळमारुती पोलिस …
Read More »उत्सव काळात जनतेला सुविधा द्या : आमदार आसिफ सेठ यांची अधिकाऱ्यांना सूचना
बेळगाव : श्रावण महिना सुरू होताच, सणांची मालिका येते. विशेषतः बेळगाव शहरात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. आज रविवार दि. २० रोजी आमदार आसिफ सेठ यांनी अधिकाऱ्यांसह शहरातील विविध भागात फेरफटका मारून कामाची पाहणी केली. गणेशोत्सव जवळ येत असल्याने बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांनी फोर्ट रोडवरील …
Read More »बेळगाव पोलिसांची मोठी कारवाई: २३.८४० किलो गांजा जप्त
बेळगाव : बेळगावच्या उद्यमबाग पोलिसांनी मोठी कारवाई करत २३.८४० किलो गांजा जप्त केला असून तिघांना अटक करून तुरुंगात पाठवले आहे. उद्यमबाग पोलिस स्टेशनचे पीआय डी.के. पाटील यांनी मोठी कारवाई करत शहरात गांजा विकणाऱ्या तीन जणांना अटक केली. अटक केलेल्यांकडून १० लाख रुपये किमतीचा २३.८४० किलो गांजा जप्त करण्यात आला. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta