बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी उद्या बुधवार दि. २१ जानेवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या दिवशी मूळ दाव्यावर सुनावणी होण्याची शक्यता असून, संपूर्ण सीमाभागाचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे. सीमाप्रश्नी महाराष्ट्राच्या वतीने वरिष्ठ विधिज्ञ ॲड. सी. एस. वैद्यनाथन आणि ॲड. ऑन रेकॉर्ड शिवाजी जाधव यांनी सुनावणी लवकरात लवकर व्हावी, …
Read More »श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सव सोहळ्याला 29 जानेवारीपासून प्रारंभ
बेळगाव : श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाज बेळगाव, वैश्यवाणी युवा संघटना बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने दरवर्षीप्रमाणे बेळगाव येथील श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सव सोहळा माघ शुद्ध एकादशी गुरुवार दिनांक 29 जानेवारी ते माघ शुद्ध चतुर्दशी रविवार दि. 1 फेब्रुवारी 2026 पर्यंत साजरा करण्यात येणार आहे. चार दिवसांच्या या उत्सव काळात …
Read More »आशा पत्रावळी यांना महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार
बेळगाव : प्राईम टायकून मीडिया आयोजित महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार २०२६ हा पुरस्कार सोहळा कोल्हापूर येथे पार पडला. या सोहळ्यात विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान उद्योजक व व्यावसायिकांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात बेळगावच्या आशा पत्रावळी यांच्या विणकामातील योगदानाबद्दल वुमन इंटरप्रीन्यूयर इन हॅन्डमेड अँड क्राफ्ट इंडस्ट्री या श्रेणीत महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार प्रदान …
Read More »उचगाव गणेश मार्कंडेय तीर्थक्षेत्रेतील सभा मंडपाचे पूजन
बेळगाव : बेळगाव वेंगुर्ला रोडवर असलेल्या गणेश मार्कंडेय तीर्थक्षेत्र येथील मंदिरासमोरील सभा मंडपाचे पूजन पूजन समारंभ उचगाव ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरशे आणि काँग्रेसचे नेते जयवंत बाळेकुंद्री यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला. गणेश जयंतीचे औचित्य साधून मंदिराला रंगरंगोटी समोरील पेवर्स आणि सभामंडप असे विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले असून सदर …
Read More »मानसिक ताण-तणावातून कडोली येथील तरुणाची आत्महत्या
बेळगाव : कडोली येथील एका तरुणाने मानसिक ताण-तणावातून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. आठवड्याभरात गावातील ही दुसरी घटना असल्याची चर्चा सुरू झाली आहे. संतोष रमेश हंपन्नावर (वय २९ लक्ष्मी गल्ली, कडोली) असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. त्याच्या पक्षात पत्नी, दोन मुली, एक भाऊ, असा परिवार आहे. …
Read More »संजीवीनीच्या क्रीडामहोत्सवात उमटला आनंदाचा नवा सूर
बेळगाव : खेळाचा आनंद, आपुलकीचा स्पर्श आणि आत्मविश्वासाची नवी उभारी या तिन्हींचे अनोखे मिश्रण अनुभवायला मिळाले ते संजीवीनी फाउंडेशनच्या वार्षिक क्रीडामहोत्सवात. काळजी केंद्रातील रुग्णांसाठी आयोजित केलेला हा क्रीडामहोत्सव केवळ स्पर्धा नव्हता, तर आनंद, पुनर्वसन आणि मानवी सन्मानाचा उत्सव ठरला. खेळाच्या माध्यमातून उपचाराची संकल्पना प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही संजीवीनी फाउंडेशनने आपल्या काळजी …
Read More »चलवेनहट्टीचे भाविक यल्लामा यात्रेला रवाना होणार
बेळगाव : चलवेनहट्टी येथील भाविक २५ जानेवारी रोजी सौंदत्ती येथील रेणुका देवी यात्रेसाठी रवाना होणार आहेत पुढील नियोजन प्रमाणे यात्रा साजरी करवी असे आवाहन ग्रामपंचायत सदस्य यांनी केले आहे. रविवार दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी गावातून यात्रेसाठी प्रस्थान करणे तसेच जोगुळभावी येथील परड्या भरुण रेणूका देवीचा डोंगर चढणे, मंगळवार …
Read More »जय जय स्वामी समर्थ घोषात, पादुका पालखी परिक्रमेचे बेळगावात भक्तीभावात स्वागत
बेळगाव : अक्कलकोटहून निघालेल्या स्वामी समर्थांच्या पादुका पालखी परिक्रमेचे आज सोमवारी सायंकाळी येथील गोवावेस दत्त मंदिरात मोठ्या भक्तीभावात स्वागत करण्यात आले. यावेळी “जय जय स्वामी समर्थ” जयघोषाने परिसर दणाणून गेला. श्री अक्कलकोट अन्नछत्र मंडळ संस्थापक अध्यक्ष जनमेयजय राजे विजयसिंह राजे भोसले तसेच कार्यकारी अध्यक्ष अमोल राजे जनमेजय राजे भोसले …
Read More »म. ए. युवा समिती आदर्श शाळा पुरस्कारासाठी आवाहन
बेळगाव : दरवर्षी प्रमाणे महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने कै. श्रीनिवास केशवराव म्हापसेकर यांच्या स्मरणार्थ आदर्श शाळा पुरस्कार २०२५-२६ साठी आवाहन करीत आहोत. बेळगाव शहर, बेळगाव तालुका ग्रामीण विभाग आणि खानापूर तालुक्यातील एकूण पाच मराठी प्राथमिक शाळांना आदर्श शाळा पुरस्कार देण्यात येतील, तरी विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेल्या प्राथमिक शाळांकडून …
Read More »हर्षिता ठाकूरसह अन्य सहा जणांवर धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल
बेळगाव : बेळगाव शहरात काल एकूण आठ ठिकाणी हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त शहरात सर्वत्र शोभायात्रा काढण्यात आली होती. बेळगाव शहरालगत असणाऱ्या पिरनवाडी येथे देखील हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्या ठिकाणी सुरू असलेल्या शोभायात्रे दरम्यान हर्षिता ठाकूर यांनी पिरनवाडी येथील प्रार्थना स्थळासमोर शोभायात्रा येताच अवमानकारक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta