Wednesday , February 18 2026
Breaking News

जय जय स्वामी समर्थ घोषात, पादुका पालखी परिक्रमेचे बेळगावात भक्तीभावात स्वागत

Spread the love

 

बेळगाव : अक्कलकोटहून निघालेल्या स्वामी समर्थांच्या पादुका पालखी परिक्रमेचे आज सोमवारी सायंकाळी येथील गोवावेस दत्त मंदिरात मोठ्या भक्तीभावात स्वागत करण्यात आले. यावेळी “जय जय स्वामी समर्थ” जयघोषाने परिसर दणाणून गेला.

श्री अक्कलकोट अन्नछत्र मंडळ संस्थापक अध्यक्ष जनमेयजय राजे विजयसिंह राजे भोसले तसेच कार्यकारी अध्यक्ष अमोल राजे जनमेजय राजे भोसले यांच्या मार्गदर्शनानुसार श्री स्वामी समर्थ पादुका पालखी परिक्रमेचे हे 29 वे वर्ष आहे. सालाबदाप्रमाणे यावर्षीही बेळगाव सर्वप्रथम श्री दत्त मंदिर येथे पादुका आणि पालखीची पूजा करण्यात आली. आरती संपन्न झाली.त्यानंतर परिक्रमा मिरवणुकीला सुरुवात झाली. पालखीच्या अग्रभागी भजनी मंडळ बँडचा गजराने मार्ग दुमदुमून गेला. गोवावेस बसवेश्वर चौक, कोरे गल्ली, कचेरी गल्ली मार्गै पालखी परिक्रमा शहापूर हट्टीओळ गल्ली येथे पोहोचली. मिरवणूक मार्गावर हजारो भक्तांनी पादुकांचे दर्शन घेतले. पालखी मार्गावर अनेक ठिकाणी पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच महिलांनी ओवाळणी केली. पादुका पालखी परिक्रमा मिरवणुकीत श्री स्वामी समर्थअन्नछत्र मंडळ (अक्कलकोट) उपाध्यक्ष अभय खोबरे, नेमिनाथ गरगट्टे, प्रभाकर नाकाडी, मोहन लाड, राजेंद्र गायकवाड, संतोष भोसले, टी सी बेकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने स्वामीभक्त उपस्थित होते.

हट्टीओळ गल्ली येथे पादुका पालखीचे पूजा होणार आहे त्यानंतर प्रसादाचा कार्यक्रम संपन्न होईल. उद्या मंगळवारी दुपारी हट्टीहोळी गल्ली येथून पादुका पालखी परिक्रमा महाद्वार रोड येथील श्री स्वामी समर्थ आराधना केंद्राकडे प्रस्थान करणार आहे. उद्या याच ठिकाणी पालखी परिक्रमेचा उद्या मुक्काम राहणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

एडीजीपी आलोक कुमार यांची हिंडलगा कारागृहात अचानक भेट

Spread the love  बेळगाव : बेळगाव येथील ऐतिहासिक हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात एडीजीपी आलोक कुमार यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *