Wednesday , December 17 2025
Breaking News

बेळगाव

राहुल गांधींनी हिंदूंची माफी मागावी : अनिल बेनके

  बेळगाव : राहुल गांधी यांनी लोकसभेत हिंदुविरोधी वक्तव्य करून हिंदूंच्या भावना दुखावल्या. त्यामुळे त्यांनी लोकसभेत हिंदूंची माफी मागावी, असे भाजप प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार अनिल बेनके यांनी सांगितले. बेळगाव शहरात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे हिंदू हिंसाचारी आणि दहशतवादी असल्याचे वक्तव्य …

Read More »

महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी केली शहरातील स्वच्छतेची पाहणी

  बेळगाव : बेळगाव महापालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी शहराला भेट देऊन सफाई कामगारांचे काम व स्वच्छतेचे निरीक्षण केले. सकाळी 6.00 च्या सुमारास सदाशिवनगर येथील महापालिकेच्या वाहन शाखेला भेट दिली. नंतर त्यांनी कचरावाहू वाहनास भेट देऊन कामगारांच्या कामाची व स्वच्छतेची पाहणी केली. त्यानंतर महांतेश नगर येथील बीट कार्यालय व वीरभद्रनगर …

Read More »

बाची येथे घरावर झाड कोसळून नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली

  बेळगाव : वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मंगळवारी रात्री विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली असून मोठे नुकसान झाले आहे. बेळगाव तालुक्यातील बाची येथील श्रीमती शांता परशराम गावडे आणि मोहन परशराम गावडे यांचा घरावर वृक्ष कोसळून 5 लाखाचे नुकसान झालेले आहे. तरी प्रशासनाने ताबडतोब या घडलेल्या घटनेकडे पाहून …

Read More »

वडगाव येथील सरकारी चावडीला तलावाचे स्वरूप

  बेळगाव : वडगाव येथील सरकारी चावडी दिवसेंदिवस अधिकच समस्यांच्या विळख्यात गुरफटत चालली आहे. चावडी परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले आहे. सततच्या पावसामुळे चावडीच्या प्रवेशद्वाराला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यापुढे पाऊस जास्त प्रमाणात झाल्यास चावडीत प्रवेश करण्यासाठी नागरिकांना एखाद्या बोटीचा वापर करावा लागेल की काय?अशी काहीशी स्थिती सध्या चावडी परिसरात …

Read More »

युवा समितीच्या वतीने तारिहाळ येथे शैक्षणिक साहित्याचे वितरण

  बेळगाव : आज महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगावच्या वतीने पूर्व प्राथमिक शाळा तारिहाळ येथे शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा समितीचे उपाध्यक्ष वासु सामजी हे होते. दरवर्षी मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून तसेच इतर गरजू विद्यार्थ्यांना युवा समितीच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येते. आज या …

Read More »

डॉक्टर्स डे निमित्त केएलई संगीत महाविद्यालय आणि केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने संगीत कार्यक्रम संपन्न

  बेळगाव : संगीतामध्ये भावना जागृत करण्याची, कथा सांगण्याची आणि दिलासा देण्याची शक्ती आहे. ते बदलाला प्रेरणा देऊ शकते, सांत्वन देऊ शकते आणि आठवणी निर्माण करू शकते. जागतिक संगीत दिन साजरा करून, आपल्या समाजात आणि वैयक्तिक जीवनात संगीताची महत्त्वाची भूमिका आम्ही स्वीकारतो. शिक्षण म्हणजे केवळ पाठ्यपुस्तके, परीक्षा आणि चांगले गुण …

Read More »

लक्ष्मीबाई जयवंत कोंडुस्कर प्रतिष्ठानच्या वतीने पहिलीच्या विद्यार्थ्यांना दप्तर (स्कूल बॅग)चे वाटप

  बेळगाव : समाजाचे आपणही काहीतरी देणं लागतो या भावनेने नेहमी समाजहितासाठी कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते श्रीरामसेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर तसेच त्यांचे बंधू चंद्रकांत कोंडुस्कर यांनी लक्ष्मीबाई जयवंत कोंडुस्कर प्रतिष्ठानच्या वतीने मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दप्तर (स्कूल बॅग)चे वाटप करण्यात आले. दि. 1 जुलै रोजी …

Read More »

एल. एन. कंग्राळकर यांच्या “हेची माझे सुख” पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

  बेळगाव : येथील निवृत्त मुख्याध्यापक एल. एन. कंग्राळकर यांनी लिहिलेल्या “हेची माझे सुख” या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा गेल्या शनिवारी हॉटेल नेटिव्हच्या सभागृहात संपन्न झाला. शब्दशिवार प्रकाशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक प्रा. सुभाष सुंठणकर हे होते. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाल्यानंतर इंद्रजीत घुले यांनी प्रास्ताविकात …

Read More »

जायन्ट्स ग्रुपतर्फे डॉक्टर्स डे साजरा

  बेळगाव : “मनुष्याच्या जीवनात दोन व्यक्तींना अनन्यसाधारण महत्त्व आहे त्या म्हणजे शिक्षक आणि डॉक्टर, शिक्षक हा माणसाला घडवतो तर डॉक्टर हा माणसाला वाचवतो, त्यामुळे डॉक्टर हा पृथ्वीवरचा देवच आहे, त्याने फक्त सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून काम करावे” असे आवाहन प्रा. संध्या देशपांडे यांनी बोलताना केले. येथील जायन्ट्स ग्रुप ऑफ …

Read More »

बेळगावात बनावट नोटा छापणारी टोळी गजाआड

  बेळगाव : गोकाक-बेळगाव रस्त्यावरील कडबगट्टी गावातून जाणाऱ्या रस्त्याने प्रवास करणाऱ्या कारची तपासणी केली असता, 100 व 500 रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्याने पाच जणांना अटक करण्यात आली, अशी माहिती बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमा शंकर गुळेद यांनी दिली. सकाळच्या गस्तीवरील पोलिसांनी केलेल्या तपासणीत हे प्रकरण उघडकीस आले. मुडलगी …

Read More »