Saturday , October 19 2024
Breaking News

बेळगाव

सांबरा येथे काँक्रीट रस्त्यांच्या बांधकामाला चालना

  बेळगाव : बेळगाव तालुक्याच्या सांबरा गावातील गणेश नगरात येणाऱ्या सर्व गल्ल्यांतील रस्त्यांच्या विकासाकरिता आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी 50 रु. लाखांचे अनुदान मंजूर करून काँक्रीटचे रस्ते निर्मितीच्या कामाला चालना दिली आहे. आज आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते सांबऱ्यात सदर कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यापूर्वी 80 लाख रुपये मंजूर करून रस्त्यांची …

Read More »

प्राईड सहेलीतर्फे अभय उद्यानाची स्वच्छता!

  बेळगाव : सामाजिक कार्यात कायम अग्रस्थानी असलेल्या प्राईड सहलीच्या सदस्यांनी अभय उद्यान सराफ कॉलनी येथे भेट दिली. तेव्हा त्यांनी पाहिले खूप कचरा जमा झालेला आहे. झाडाची पाने गळून सगळीकडे पसरलेली आहेत. काही ठिकाणी झाडाची फळे पडून खराब झालेली होती. त्यांना मुंग्या लागलेल्या होत्या. या उद्यानाची नेहमीच स्वच्छता करण्यात येते. …

Read More »

“गोल्डन स्क्वेअर”च्या बुद्धीबळपटूंची एससीएमए ऑल इंडिया ओपन फिडे रेटेड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत विशेष बाजी

  बेळगाव (प्रतिनिधी) : धारवाड येथे नुकत्याच झालेल्या एससीएमए (SCMA) ऑल इंडिया ओपन फिडे रेटेड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत बेळगावमधील गोल्डन स्क्वेअर बुद्धिबळ अकादमीच्या बुद्धीबळपटूंनी घवघवीत यश मिळविले. या स्पर्धेत एकूण 257 बुद्धीबळपटूंनी भाग घेतला होता. स्पर्धेत बेळगाव बुद्धिबळ अकादमीने पहिला क्रमांक पटकाविला. अकादमीला पहिल्या क्रमांकाचे 4000 रुपयांचे रोख बक्षीस व …

Read More »

तिरुपती – हुबळी पॅसेंजर रेल्वेत अज्ञात व्यक्तीची हत्या

  हुबळी : तिरुपती – हुबळी पॅसेंजर रेल्वेच्या सर्वसाधारण डब्यात काल रात्री अज्ञात व्यक्तीचा निर्घृण खून झाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली. तिरुपती – हुबळी रेल्वे रात्री उशिरा हुबळी येथील बहट्टी येथे आली असता, डब्यांचे निरीक्षण करताना एका व्यक्तीचा खून झाला असल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. यानंतर रेल्वे पोलिसांना घटनेची माहिती …

Read More »

सहनशील ‘स्त्री’ हे शक्तीचे प्रतिक! : आ.लक्ष्मी हेब्बाळकर

  बेळगाव (प्रतिनिधी) : स्त्रीमध्ये जीवन घडवण्याची शक्ती आहे. जन्मतःच आईची ताकद, वात्सल्य, सहिष्णुता, प्रेम, संयम, काळजी, आदरातिथ्य, सन्मान आणि सांत्वन हे गुण तिच्यात जन्मापासूनच रुजलेले असतात, म्हणूनच सहनशील स्त्री हे शक्तीचे प्रतिक आहे, असे प्रतिपादन बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले. अखिल भारत शरण साहित्य परिषद, कदळी महिला …

Read More »

महानगरपालिकेच्या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकातून देखील मराठी भाषा हद्दपार

  बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकातून देखील मराठी भाषा हद्दपार होणार आहे. महानगर पालिकेने पुढील आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकाची तयारी सुरू केली आहे. अंदाजपत्रकाबाबत बेळगावातील प्रतिष्ठित नागरिक, ज्येष्ठ नागरिक, अर्थतज्ञ, चार्टर्ड अकाऊंटंट तसेच या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सूचना व सल्ला देण्याचे आवाहन केले आहे. पण या सूचना इंग्रजी व कन्नड …

Read More »

कोल्हापूरातील जनता सदैव सीमावासीयांच्या पाठीशी : वसंतराव मुळीक

  बेळगाव : कोल्हापूरातील जनता सदैव सीमावासीयांच्या पाठीशी ठामपणे उभी असून शेवटच्या श्वासापर्यंत सीमावासीयाबरोबर असेल असे उद्गार अखिल भारतीय मराठा महासंघाचे उपाध्यक्ष श्री. वसंतराव मुळीक यांनी काढले. श्री. मुळीक यांच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून सीमाभागातील मराठी जनता आणि महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्यावतीने कोल्हापूर येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. समितीचे खजिनदार श्री. …

Read More »

एम.ए. (मराठी) साठी प्रवेश प्रक्रिया सुरू

  बेळगाव : राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या (Rani Channamma University) मराठी विभागाच्या एमए 2022-23 साठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. कोणत्याही पदवीचा विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र आहे. प्रवेशासाठी दंडाशिवाय अर्ज भरण्याची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर आहे. UUCMS (https://uucms.karnataka.gov.in) मध्ये ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत, आधारकार्ड, दहावीचे प्रमाणपत्र, जात आणि उत्पन्न प्रमाणपत्र, पदवीचे …

Read More »

आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याहस्ते 1.75 कोटी खर्चाच्या विकासकामांचे भूमिपूजन

    बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघांतर्गत येणाऱ्या कुवेंपू नगर येथील आझाद हौसिंग सोसायटी वसाहत व परिसरातील गटारी आणि रस्ते सुधारण्यासाठी बेळगाव महापालिकेकडून 1.75 कोटी रु. प्राप्त झाले आहेत. आज बुधवारी स्थानिक रहिवाशांच्या उपस्थितीत आ.लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते भूमिपूजन करून सदर कामांचा शुभारंभ करण्यात आला. आ. लक्ष्मी हेब्बाळकर पायाभूत सुविधांच्या …

Read More »

कोरे गल्ली, जेड गल्ली येथील रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य

  बेळगाव : कोरे गल्ली, जेड गल्ली येथील सामाईक रस्त्यावर  कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून 15 दिवसातून एकदा कचऱ्याची उचल होते. डासांमुळे डेंग्यू, मलेरिया सारख्या रोगांना सामना करावा लागत आहे, महानगर पालिकेने लक्ष देऊन नागरिकांना कचरा बाहेर न टाकण्याची समज द्यावी आणि औषधांची फवारणी गेले वर्षभर झाली नाही ती करावी, असे …

Read More »