बेळगाव : काँग्रेस रोडवर पहिल्या रेल्वे फाटकानजिक रेल्वेखाली आत्महत्या करण्यास गेलेल्या महिला व दोन मुलांचा जीव वाचवणाऱ्या स्फूर्ती विश्वनाथ सव्वाशेरी हिला रोटरी क्लब ऑफ बेळगाव नॉर्थतर्फे “ब्रेव्हरी ऑवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले.
बालिका आदर्श विद्यालयात शिकणाऱ्या स्फूर्तीला हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ बेळगाव नॉर्थचे अध्यक्ष अरुण शिरगापूर, सचिव पांडुरंग धोत्रे, सहाय्यक प्रांतपाल माजी नगरसेविका पुष्पा पर्वतराव, संस्थेचे सर्व सदस्य, यांच्यासह साईनगर वडगाव येथील मुख्य पंच रंगनाथ तग्गी उपस्थित होते.