Sunday , July 26 2026
Breaking News

विनायक उर्फ शाहू अनंत निळकंठाचे 45 व्या श्री गणेश चषकाचा मानकरी

Spread the love

 

 

बेळगाव : बेळगाव येथील सरदार हायस्कूल शाळेच्या मैदानावर केजी स्पोर्ट्स कंग्राळ गल्ली आयोजित श्री गणेश सिंगल विकेट क्रिकेट स्पर्धेतील अंतिम लढतीत विनायक निळकंठाचे याने संतोष उर्फ लारा याचा पराभव करीत श्री गणेश सिंगल विकेट 2024 जिंकली अन ट्रॉफीचा मानकरी ठरला.

या स्पर्धेतील उत्कृष्ट झेल पंकज पाटील, उत्कृष्ट गोलंदाज सचिन सहानी, उत्कृष्ट अष्टपैलू प्रतीक बाळेकुंद्री, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक रोहित मुरकुटे, सुनील पाटील, अष्टपैलू खेळाडू सचिन सहानी स्पर्धेतील सर्वोत्तम पंच सुशांत शिंदे, उत्कृष्ट यष्टीरक्षक किरण तरळेकर, यांना वैयक्तिक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे पुरस्कर्ते शरद पाटील, सुहास पाटील, माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, नगरसेवक शंकर पाटील, अरुण पठाणी, गडकरी शंकर बडवण्णाचे, बाबुराव कुट्रे, आदित्य पाटील, गडकरी सुरेश पाटील, शिवाजी जाधव, आनंद माळवी या मान्यवरांचे हस्ते विजेत्या खेळाडूंना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धा यशस्वी पार पडण्यासाठी शरद पाटील, पंकज पाटील, रोहित मुरकुटे, अनिल पाटील, प्रतीक पाटील, आदित्य पाटील, दीपक पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच केजी स्पोर्ट्स मंडळाने माजी खेळाडू व पंचमंडळ उपस्थित क्रिकेटर्सचे आभार मानले. पावसाचा व्यत्यय येऊन देखील स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल विशेष कौतुक करण्यात आले.

या स्पर्धेची वैयक्तिक बक्षीस एसपी ऑटो ॲक्सेसरीजचे संचालक प्रतीक पाटील व आदित्य पाटील यांनी पुरस्कृत केली. मंगाई स्पोर्ट्सचे आनंद माळवी यांनी दोन बॅट्स स्पॉन्सर केल्या. सर्व ट्रॉफीज केजी स्पोर्ट्स स्पॉन्सर केल्या. टी-शर्ट व पहिले पारितोषिक एसपी कार ॲक्सेसरीजचे संचालक शरद पाटील व सुहास पाटील यांनी पुरस्कृत केले.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *