बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या वतीने वडगाव बेळगाव येथील श्री तात्यासाहेब मुसळे हायस्कूल येथे करिअर मार्गदर्शन व मानसिक आरोग्य सत्र आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून कोमल कोल्लीमठ उपस्थित होत्या. त्यांनी हे सत्र अतिशय सुरळीतपणे पार पाडले. सत्र अतिशय माहितीपूर्ण होते. त्या सत्राचा विशेषाधिकार ९ वी आणि १० वीच्या विद्यार्थ्यांना देण्यात आला.
रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या अध्यक्षा आर.टी.एन. रुपाली जनाज यांनी स्वागत केले. सचिव आर.टी.एन शीतल चिलामी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शिल्पा कवडी, इंट्रॅक्ट क्लब ऑफ बनशंकरीच्या मेंटॉर सौ.लक्ष्मी पाटील व विद्यार्थी उपस्थित होते.