बेळगाव : दहा वर्षांपूर्वी देशातील जनतेला विविध आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने देशातील प्रत्येकाची फसवणूक केली आहे. जाती धर्माच्या नावावर देशात तेढ निर्माण करण्याचे काम मोदी सरकार करत आहे. देशाचे संविधान बदलण्याचा घाट मोदी सरकारने घातला आहे. यावेळची लोकसभा निवडणूक स्वातंत्र संग्रामाची दुसरी वेळ ठरली आहे. यासाठी लोकसभेच्या …
Read More »फॅशनेट स्पोर्ट्स अकादमीच्या वतीने मतदान जनजागृती
बेळगाव : लिंगराज कॉलेजच्या कॅम्पस मधील केएलई संस्थेच्या जलतरण तलाव व फॅशनेट जलतरण स्पोर्ट्स अकादमी यांच्यावतीने मतदान जनजागृतीसाठी कॉलेजच्या आवारात व परिसरात मतदान जनजागृती रॅली करीत जनतेला शंभर टक्के मतदान करा असा संदेश देण्यात आला. प्रशासनाच्यावतीने स्वीप समितीच्या माध्यमातून मतदारांत यापूर्वी जागृती करण्यात आली आहे, आज रविवार तारीख 5 …
Read More »काँग्रेसचे पैसे वाटणाऱ्यांना भाजप कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडले!
गोकाक : गोकाकमध्ये काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर आणि टीमकडून मतदारांना वाटण्यासाठी आणलेली रक्कम भाजपा कार्यकर्त्यांनी जप्त करून पोलिसांच्या हवाली केल्याची घटना आज घडली. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, भाजपचा बालेकिल्ला असलेल्या गोकाक मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांच्यासाठी पैसे वाटप करण्यास आलेल्या पाच जणांना भाजप समर्थकांनी रंगेहात पकडून …
Read More »मतदान जनजागृतीसाठी बेळगावात बुलेट बाईक जथा
बेळगाव : जिल्हा सफाई समितीच्या वतीने चन्नम्मा सर्कल येथे आज शनिवारी (4 मे) आयोजित अनिवार्य मतदान जनजागृती बाईक जथा कार्यक्रमास जिल्हा स्वीप समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमा शंकर गुळेद यांनी मंजुरी दिली. यावेळी बोलताना जेपीएमचे सीईओ राहुल शिंदे म्हणाले की, जिल्हाभर स्वीप …
Read More »जगदीश शेट्टर यांच्या विजयासाठी स्थानिक नेते लागले जोमाने कामाला
किरण जाधव यांनी घेतली बैठक : शेट्टरांना निवडून देण्याचे केले आवाहन बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांच्या प्रचारासाठी बेळगाव शहर परिसरातील नेते आणि कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. ‘आपकी बार 400 पार’ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी स्थानिक नेत्यांनी चंग बांधला आहे. त्या अनुषंगाने बेळगावमधील स्थानिक …
Read More »९ मे रोजी शिवजयंती; परंपरेनुसार शनिवारी चित्ररथ मिरवणूक
बेळगाव : बेळगावमध्ये अक्षय तृतीयेच्या आदले दिवशी म्हणजेच वैशाख द्वितीयेला पारंपरिक पद्धतीने छत्रपती शिवरायांची जयंती साजरी केली जाते तसेच तिसऱ्या दिवशी भव्यदिव्य चित्ररथ मिरवणूक काढली जाते. यावर्षीही गुरुवार दि. ९ मे रोजी शिवजयंती साजरी होणार असून शनिवार दि. ११ मे रोजी बेळगाव शहरातून भव्य चित्ररथ मिरवणूक काढली जाणार आहे. …
Read More »माजी महापौरांचा महाप्रचार आणि समितीचा घातला आचार…
महाराष्ट्र एकीकरण समितीचा बट्याबोळ करायचा विडाच जणू काही लोकांनी उचललेला दिसतो. मराठी माणसाचा घात मराठी माणूसच करू शकतो हेच खरे. एवढी वर्ष गटतट म्हणून समितीचा उद्धार करणाऱ्या लोकांनी आता उघड उघड राष्ट्रीय पक्षांचे जोडे उचलण्याची सपारीच घेतली आहे. एरवी समितीसाठी किती काम करतो, आपण मराठी कसे, समितीनिष्ठ कसे हे …
Read More »चलवेनहट्टीत ब्रम्हलिंग मंदिरचा पहिला वर्धापन दिन
बेळगाव : चलवेनहट्टी येथे श्री ब्रम्हलिंग मंदिरचा पहिला वर्धापन दि. ४ व ५ मे असा दोन दिवस साजरा होणार आहे. दि. ४ रोजी वेगवेगळ्या गावचे हारीपाठ होणार आहेत तसेच आठ वाजता तुरमुरी येथील प्रसिद्ध किर्तनकार बाळू भक्तिकर यांचे रात्री ८-०० किर्तन होणार आहे तसेच किर्तन सोहळा संपल्यावर नंतर गावातील …
Read More »डॉ. सरनोबत दाम्पत्याकडून जगदीश शेट्टर यांचा सत्कार
बेळगाव : शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर व भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत परिवारातर्फे बेळगाव लोकसभा मतदार संघातील भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांना संपूर्ण पाठिंबा व्यक्त करण्याबरोबरच त्यांचा चांदीची तलवार देऊन सत्कार करण्यात आला. बेळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी आज शुक्रवारी सकाळी आपल्या प्रचार दौऱ्याप्रसंगी नियती …
Read More »जरांगे- पाटील यांच्या बेळगाव सभेला सांगलीहून कार्यकर्ते उपस्थित
बेळगाव : काल बेळगाव येथील धर्मवीर संभाजी उद्यान येथे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला त्यांचं संबोधन ऐकण्यासाठी सांगलीहून कार्यकर्ते उपस्थित होते. सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीत आपणही योगदान द्यावं व बेळगावातील युवा कार्यकर्त्यांकडून सीमाप्रश्नी माहिती घेऊन महाराष्ट्रातील युवावर्ग सीमावासीयांच्या पाठीशी उभा करावा यासाठी हे कार्यकर्ते उपस्थित होते. सीमाप्रश्न सोडवणुकीच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta