Saturday , October 19 2024
Breaking News

बेळगाव

मराठा मंडळ ज्युनिअर कॉलेजच्या 15 विद्यार्थ्यांची राज्य पातळीवर निवड

  बेळगाव : शिक्षण खात्यामार्फत झालेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये मराठा मंडळाच्या विद्यार्थ्याने घवघवीत यश संपादन केले आहे. मलप्रभा पाटील हिने लांब उडी व तिहेरी उडीमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच ज्युडोमध्ये राधिका डुकरे, राजेश्वरी कोडचवाडकर हिने प्रथम क्रमांक. सुमित पाटील याने द्वितीय क्रमांक. तसेच कराटेमध्ये श्रुती जोमणे प्रथम व नंदनी गावडे हिने …

Read More »

नॅनो कार उलटली; सुदैवाने जीवितहानी टळली

  बेळगाव : पुणे – बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर हलग्यानजीकच्या सर्विस रोडवर नॅनो कार उलटली. मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही. ही कार बेळगावहून हुबळीच्या दिशेने जात असताना हलग्यानजीकच्या सर्विस रोडवर असणाऱ्या राईस मिलजवळ ही घटना घडली. या कारमधून आजी – आजोबा प्रवास करीत होते. मात्र सुदैवाने किरकोळ दुखापती व्यतिरिक्त त्यांना अन्य …

Read More »

हिंडलगा येथील प्राथमिक कृषी संघाची सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

  बेळगाव : हिंडलगा येथील प्राथमिक कृषी पत्तीन संघाची सर्वसाधारण सभा मोठ्या खेळीमेळीत संपन्न झाली. संस्थेचे हे 77 वे वर्ष होय. ही सभा सिद्धी विनायक सभागृहात संघाचे चेअरमन रमाकांत पावशे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. प्रथम सभासद व निवृत्त मुख्याध्यापक प्रकाश बेळगुंदकर यांनी प्रास्ताविक मनोगत केले. व्यवस्थापक उत्तम शिंदे यांनी पुष्पमाला …

Read More »

किरण जाधव यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या उत्तर कर्नाटक संघटकपदी निवड

  समाज बांधवातून होतंय समाधान व्यक्त बेळगाव : कर्नाटक राज्य सकल मराठा समाजाचे संघटक, प्रदेश भाजपा ओबीसी मोर्चाचे सचिव, मराठा समाजाच्या उत्कर्षासाठी सातत्याने कार्यरत असलेले विमल फाऊंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष किरण जाधव यांची अखिल भारतीय मराठा महासंघ, उत्तर कर्नाटक संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाची स्थापना सन 1900 …

Read More »

श्री शिवप्रतिष्ठानच्या दुर्गा दौडमुळे बिजगर्णीत भक्तीमय वातावरण

  बेळगाव : श्री शिवप्रतिष्ठान बिजगर्णी यांच्या वतीने घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत गावातून पहाटे दुर्गा दौड फेरी काढुन जनजागृती करण्यात येत आहे. या दुर्गा दौड फेरीतील ध्वजाचे घरोघर पुजन करुन स्वागत केले जात आहे. गेल्या काही वर्षापासून प. पू. संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या प्रेरणेतून श्री शिवप्रतिष्ठान बेळगाव यांच्या वतीने घटस्थापनेपासुन ते विजयादशमीपर्यंत …

Read More »

जिल्हास्तरीय प. पू. महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत बेळगाव जिल्हा अम्याचुअर सिलंबम्ब असोसिएशनच्या सिलंबम्बपटूंचे घवघवीत यश

  बेळगाव (प्रतिनिधी) : उपसंचालक, पदवी पूर्व शिक्षण खाते बेळगाव आणि गोमटेश संयुक्त पदवीपूर्व महाविद्यालय, हिंदवाडी-बेळगाव यांच्या संयुक्त सहयोगाने बेळगाव जिल्हास्तरीय पदवी पूर्व महाविद्यालयीन 2022-23 क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हिंदवाडी येथील गोमटेश विद्यापीठात या स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी घेण्यात आलेल्या सिलंबम्ब स्पर्धेत 35 ते 60 किलो वजनी गटात …

Read More »

शाळकरी मुलाच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक

बेळगाव : हुक्केरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुडस गावच्या हद्दीत हिरण्यकेशी नदीच्या पात्रात अज्ञात मुलाचा शिरविरहित मृतदेह आढळल्याच्या प्रकरणाचे गूढ उकलण्यात हुक्केरी पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी दोन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्याचे बेळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील यांनी सांगितले. 20 सप्टेंबरपासून बेपत्ता झालेल्या मुलाच्या शोधार्थ गावातील अनेकांची चौकशी केल्यानंतर …

Read More »

येळ्ळूर ग्राम पंचायतच्यावतीने विविध विकासकामांचे उद्घाटन

  बेळगाव : येळ्ळूर ग्राम पंचायतच्यावतीने ग्राम पंचायतीच्या 15 व्या आयोगातून निधी मंजूर करून येळ्ळूर येथील विविध विकासकामांना प्रारंभ करण्यात आला. येळ्ळूर येथील पाटील स्मशानभूमी, बाराभाव (विहीर), एससी स्मशानभूमी, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर समुदाय भवन व उद्यान विकासकामांचे ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील, ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी तसेच गावातील ज्येष्ठ …

Read More »

भरधाव वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू; हुक्केरी तालुक्यातील घटना

  बेळगाव : भरधाव वाहनाच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना हुक्केरी तालुक्यातील होळेम्मा मंदिराजवळ घडली. सौंदत्ती तालुक्यातील चचडी गावातील मल्लनगौडा यल्लनगौडा पाटील (२२) आणि सिद्धारुद्ध वीरभद्र करोशी (२४) अशी मृतांची नावे आहेत. भरधाव वाहनाने धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले …

Read More »

श्री सरस्वती को- ऑप. सोसायटीची सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

  बेळगाव : श्री सरस्वती को- ऑप. सोसायटीची 28 वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दिनांक 29/9/22 रोजी सरस्वती सभागृहात खेळमेळीच्या वातावरणात पार पडली. प्रारंभी अध्यक्ष सुरेंद्र पाटणेकर, संचालक प्रकाश गोखले, सुरेश कनगली, रविंद्र लाड, राजाभाऊ चौगले, संस्थेचे कार्यवाह अनंत शानभाग यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. दिवंगत सभासदांना श्रद्धांजली …

Read More »