Monday , September 21 2026
Breaking News

श्री बसवेश्वर बँकेतर्फे रक्त दान शिबिर संपन्न

Spread the love

 

बेळगाव : श्री बसवेश्वर सहकारी बँकेच्या ६१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने बँकेच्या ‘अ’ वर्ग सदस्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी व रक्तदान शिबिर दि. ११ ऑगस्ट रोजी बँकेच्य क्लब रोड शाखा सभागृहात संपन्न झाले.
डॉ. मंजुनाथ गड्डी, एमडी (बीएचएमएस) यांनी मधुमेह आणि रक्तदाब तपासणी केली. डॉ. श्री. प्रसाद जिरगे यांनी नेत्र तपासणी केली व डॉ. के.एल.ई. प्रभाकर कोरे रुग्णालय रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या मोफत आरोग्य तपासणीचा लाभ बँकेच्या सभासदांनी मोठ्या संख्येने घेतला. बँकेचे अध्यक्ष श्री. रमेश एम. कळसन्नावर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. बँकेचे उपाध्यक्ष श्री. गिरीश व्ही बागी, संचालक श्री. बाळाप्पा बी कगन्नगी (व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष), श्री. प्रकाश एम. बाळेकुंद्री, श्री. बसवराज व्ही. झोंड, श्री. बसवराज व्ही. उप्पिन, श्रीमती सरला एस. हरेकर, सौ. दीपा एम. कुडची, श्री. सतीश के पाटील, तज्ञ संचालक श्री. चंद्रशेखर ए हिरेमठ आणि व्यवस्थापकीय मंडळाचे सदस्य श्री राजशेखर एस चोणद, श्री सोमशेखर बी. होंबळ, बँकेचे महाव्यवस्थापक श्री शंकर एस वाली आणि बँकेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *