Saturday , October 19 2024
Breaking News

बेळगाव

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मोहीम तीव्र

  बेळगाव : बेळगावातील हिंडलगा रोडवर (वनिता विद्यालयाजवळ) आज सकाळी बिबट्या दिसल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस व वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मोहीम तीव्र केली. आमदार अनिल बेनके, जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन कारवाईची माहिती घेतली. पोलिस उपायुक्त रवींद्र गडाडी आदी उपस्थित होते.

Read More »

गोल्फ कोर्स परिसरातील “त्या” शाळांना आज सुट्टी

  बेळगाव : आज सकाळी साधारण 6.30 च्या दरम्यान गोल्फ कोर्स परिसरात बिबट्या दिसल्याने परिसरातील 22 शाळांना तातडीने सुट्टी जाहीर केली. शिक्षण विभागाचे उपसंचालक बसवराज नलतवाड यांनी सांगितले की, बिबट्या दिसल्याने बेळगाव शहर आणि ग्रामीण भागातील २२ प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांना सोमवारी (२२ ऑगस्ट) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Read More »

शिरगुप्पीजवळील मुळवाड येथे बिबट्याचे दर्शन

मुळवाड : बेळगाव जिल्ह्यात आणखी एक बिबट्या आढळून आला असून संपूर्ण जिल्ह्यात बिबट्याची दहशत वाढली आहे. कागवाड तालुक्यातील शिरगुप्पीजवळील मुळवाड येथील शेतात रविवारी सायंकाळी बिबट्या दिसला. प्रशांत पाटील नावाचा शेतकरी शेतात गेल्यावर बिबट्याला पाहून घाबरून पळून आला. शेतकऱ्याने येऊन सांगितल्यानंतर गावकऱ्यांनी जाऊन खात्री केली असता तिथे पायाचे ठसे आढळून आले. …

Read More »

सार्वजनिक वाचनालय आयोजित भजन स्पर्धा उद्यापासून

बेळगाव : बेळगाव येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने श्रावण मासानिमित्त सोमवार दिनांक 22 ऑगस्टपासून आयोजित केलेल्या संगीत भजन स्पर्धेला उद्या प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन संत साहित्याचे अभ्यासक ह.भ.प. एस. बी. ओऊळकर यांच्या हस्ते दुपारी 3 वाजता मराठा मंदिर खानापूर रोड रेल्वे ओव्हर ब्रिज येथे होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी …

Read More »

बेळगावातील सार्वजनिक गणेश मंडपात वीर सावरकरांचे भावचित्र लावावेत : आमदारांची सूचना

  बेळगाव : काँग्रेसने सावरकरांची प्रतिमा लावण्यास विरोध दर्शविल्यानंतर भाजप आता गणेशोत्सवात सावरकरांचे भावचित्र लावण्यास पुढे सरसावला आहे. बेळगावातही सावरकरांचे चित्र लावण्याचा मुद्दा सध्या गाजत आहे. काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवादरम्यान सर्व गणेश मंडळांमध्ये सावरकरांची प्रतिमा लावण्याचा निर्धार करण्यात आला आहे. याच मुद्द्यावर बेळगाव येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार अभय यांनी गणेशोत्सवादरम्यान …

Read More »

‘ना नफा ना तोटा’ अथर्व फाउंडेशनची दुसरी लॅब बेळगावात सुरु

  बेळगाव : अथर्व फाउंडेशन या संस्थेच्या वतीने गेल्या वर्षी गणेश चतुर्थीला सोमवार पेठ टिळकवाडी येथे सुरू करण्यात आलेल्या लॅबोरेटरीला मिळालेला प्रतिसाद आणि शहरी विभागातील नागरिकांची मागणी लक्षात घेऊन अथर्वच्या वतीने कडोलकर गल्ली बेळगाव येथे रविवारी आणखी एक रक्त-लघवी कलेक्शन केन्द्राचा प्रारंभ करण्यात आला. उत्तर विभागाचे आमदार अनिल बेनके व …

Read More »

येळ्ळूर ग्राम पंचायत सदस्यांकडून स्मशानभूमी झाली स्वच्छ

बेळगाव : येळ्ळूर येथील मुख्य स्मशानभूमी गेली कित्येक महिने अस्वच्छ होती. यामुळे याठिकाणी गावातील भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला होता. व डासांचा पैदास वाढला होता. याची दखल घेऊन येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन स्मशान स्वच्छता केली. यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील, ग्राम …

Read More »

कुस्तीपटू लक्ष्मी पाटील यांना आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडून अभिनंदन!

  बेळगाव : हरियाणा येथे २४ ते २७ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या फेडरेशन चषक – हरियाणा रोटक २०२२ या ५४ किलो गटातील कुस्ती स्पर्धेत सहभागी होणार्‍या हलगा बस्तवाड गावातील लक्ष्मी संजय पाटील हिचे बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मीबाई हेब्बाळकर यांनी अभिनंदन केले. लक्ष्मीच्या धाडसाचे आणि शौर्याचे कौतुक करून आमदार हेब्बाळकर …

Read More »

“आजादी का अमृत महोत्सव” साजरा

  बेळगाव : आपल्याला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने सगळीकडे आजादी का अमृत महोत्सव हा सगळीकडे साजरा करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर जायंटस प्राईड सहेली व व जायंट्स परिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने भातकांडे केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये एक ऑगस्ट ते सहा ऑगस्ट पर्यंत देशभक्तीवर गायन, भाषण, चित्रकला, फॅन्सी …

Read More »

येळ्ळूर ग्राम पंचायतकडून चांगळेश्वरी मंदिर परिसरात पिण्याच्या पाण्याची कमतरता झाली दूर…

बेळगाव : येळ्ळूर येथील ग्राम देवता श्री चांगळेश्वरी मंदिर परिसरात गेली कित्येक वर्षाची मागणी आज ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील यांनी केली पूर्ण येळ्ळूर येथील चांगळेश्वरी मंदिर समोर पिण्याच्या पाण्याचे फिल्टर मशीनचे आज उद्घाटन झाले. चांगळेश्वरी मंदीरला बाहेर गावाहून येणाऱ्या भाविकांना यात्रा काळात व इतर दिवशी पिण्याच्या पाण्याची कमतरता …

Read More »