बेळगाव : महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पुत्र काँग्रेसचे युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांच्या कारचालकावर अज्ञात व्यक्तींनी चाकूहल्ला केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी बेळगावातील क्लब रोड परिसरात घडली आहे. या हल्ल्यात बसवंत कडोलकर (वय ३२) असे जखमी चालकाचे नाव असून, हल्ल्यानंतर त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात …
Read More »रस्त्याकडेला असहाय्य जखमी पडलेल्या वृद्धाला सामाजिक कार्यकर्त्यांचा दिलासा
बेळगाव : बेळगाव रेल्वे स्थानकाजवळ रस्त्याकडेला असहाय्य जखमी अवस्थेत झोपून असलेल्या एका वृद्ध इसमाला सामाजिक कार्यकर्त्यांनी आज मंगळवारी सकाळी माणुसकीच्या दृष्टिकोनातून हॉस्पिटलमध्ये दाखल करून दिलासा दिला. याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, शहरातील सामाजिक कार्यकर्ते ॲलन विजय मोरे, अवधूत तुडवेकर व संतोष दरेकर यांना बेळगाव रेल्वे स्थानकाजवळ एक वृद्ध इसम …
Read More »जोशीज पब्लिक सेंट्रल स्कूलचे स्नेहसंमेलन साजरे
बेळगाव : मंडोळी रोड येथील जोशीज पब्लिक सेंट्रल स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे झाले. यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेऊन विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. माधव प्रभू उपस्थित होते. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर डॉ. माधव प्रभू यांचा सत्कार करण्यात आला. …
Read More »येळ्ळूर विभाग म. ए. समितीची महत्वाची बैठक उद्या
बेळगाव : येळ्ळूर विभाग म. ए. समितीची महत्वाची बैठक बुधवार दि. 07/01/2026, रोजी सायंकाळी ठीक 7.00 वाजता येळ्ळूर विभाग म. ए. समितीच्या कार्यालयात बालशिवाजी वाचनालाय येथे होणार आहे. तरी या बैठकीला आजी -माजी लोकप्रतिनिधी, जिल्हा पंचायत, तालुका पंचायत, ग्राम पंचायत, तसेच नेते व सर्व पदाधिकारी, युवा यांनी जास्तीत …
Read More »नामस्मरणाची गोडी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने झटणारे किणये येथील शंकर लक्ष्मण पाटील गुरुजी
बेळगाव : मानसिक समाधानासाठी नामस्मरण अत्यंत आवश्यक असून, नामस्मरणाची गोडी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने किणये येथील शंकर लक्ष्मण पाटील गुरुजी गेली सुमारे ४८ वर्षे विनामूल्य भजन व भावगीते शिकवण्याची परंपरा निरंतरपणे जपत आहेत. वारकरी संप्रदायातील संतांचे अभंग, गवळणी, भावगीते व भक्तीगीते यांचे संस्कार समाजात रुजावेत, या सेवाभावी भावनेतून गुरुजींचे …
Read More »बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे उद्या पत्रकार दिन
बेळगाव : बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे उद्या मंगळवार (ता.६) सकाळी ११ वाजता पत्रकार दिन साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार श्री. बालमुकुंद पत्की यांना ‘दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर’ पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. हा कार्यक्रम पत्रकार भवन, पद्मावती चेंबर्स, कुलकर्णी गल्ली, बेळगाव येथे होणार आहे. या …
Read More »डीसीसी बँक कर्मचारी हल्ला प्रकरणी भाजप आक्रमक
बेळगाव : डीसीसी बँक कर्मचाऱ्यावरील हल्ला प्रकरणातील आरोपींना अटक न झाल्याने भाजपने काँग्रेस सरकारवर तीव्र हल्लाबोल केला आहे. सवदी समर्थकांवर गुन्हा दाखल होऊनही कारवाई होत नसल्याने पोलिसांनी सरकारचे बाहुले बनू नये, असा इशारा भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांनी दिला. बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी …
Read More »आमदार लक्ष्मण सवदी यांनी डीसीसी बँकेत येऊन माफी मागावी
बेळगाव : आमदार लक्ष्मण सवदी यांनी ७ दिवसांच्या आत डीसीसी बँकेत येऊन माफी न मागितल्यास जिल्हाभरात बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशारा डीसीसी बँक कर्मचारी युनियनने दिला आहे. बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी (डीसीसी) बँकेच्या कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षांवर आमदार लक्ष्मण सवदी यांनी हल्ला केल्याचा आणि खोटी माहिती पसरवल्याचा आरोप करत आज कर्मचाऱ्यांनी …
Read More »मुतगे महाविद्यालयात पारितोषिक वितरण सोहळा व बारावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण संचलित मुतगे येथील पदवी पूर्व महाविद्यालयामध्ये पारितोषिक वितरण सोहळा व बारावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच पार पडला. अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे चेअरमन आर. वाय. पाटील उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून ज्योती पदवी पूर्व महाविद्यालयाच्या डॉक्टर प्राध्यापिका श्रीमती माधवी बाघी या उपस्थित होत्या. विद्यार्थिनींच्या स्वागत …
Read More »अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला ५ वर्षांचा कारावास
बेळगाव : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिला लग्नासाठी धमकावणाऱ्या नराधमाला बेळगावच्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र विशेष जलदगती न्यायालयाने ५ वर्षांची सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सचिन विरूपाक्ष वाणी (वय ३०, रा. वाणी मळा, केस्ती, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta