Saturday , October 19 2024
Breaking News

बेळगाव

नागरिकांच्या समस्यांची तातडीने दखल घ्या : जिल्हाधिकारी नितेश पाटील

  बेळगाव : शहरा उपनगरातील कोणत्याही भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, वीजपुरवठा खंडित होणे यासह अन्य काही समस्या असल्यास त्याची संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घ्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज मंगळवारी आयोजित महानगरपालिका व इतर विभागांच्या समन्वय बैठकीत जिल्हाधिकारी नितेश पाटील बोलत होते. …

Read More »

राजहंसगड गावातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा…

शंकर नागुर्डेकर यांची ग्रामपंचायतकडे निवदनाद्वारे मागणी बेळगाव : राजहंसगड गावात मागील कित्येक दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे, गावात जवळपास 200 हून अधिक भटकी कुत्री फिरत आहेत. कोणताही अनुचित प्रकार अथवा जिवितहानी घडण्यापूर्वी कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अशी मागणी शंकर नागुर्डेकर यांनी ग्रामपंचायतकडे निवदनाद्वारे मागणी केली आहे. या कुत्र्यांमुळे …

Read More »

शिवानंद महाविद्यालयात कारगिल विजय दिवस साजरा

  बेळगाव : भारतीय सैन्याची शौर्याची गाथा म्हणून कारगिल विजय दिवस महत्वाचा आहे. हा दिवस याची आठवण करून देतो की, आपले कित्येक जवान हसत हसत शहीद झाले पण देशासाठी प्राणपणाला लावून लढले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना कारगिल युद्धात करावा लागला. अन्न नाही, झोप नाही, वातावरणही पोषक नसताना देखील भारतीय सैन्याने …

Read More »

मंगाईदेवी यात्रेला उत्साहात सुरुवात : लाखो भाविकांची गर्दी

  बेळगाव : वडगावची आराध्य दैवत श्री मंगाईदेवी यात्रेला आजपासून सुरुवात झाली असून कोरोनामुळे दोन वर्षे यात्रा साजरी करण्यात आली नव्हती. यावर्षी मात्र उत्साहात साजरी होत आहे. वडगावच्या मंगाईदेवीच्या यात्रेला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. मंदिरचा परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे. गोवा, महाराष्ट्र आदी ठिकाणांहून आलेल्या हजारो भाविकांनी देवीचे दर्शन …

Read More »

अथणी येथे कालव्यात आढळला मृतदेह

  बेळगाव : अथणी येथील पाटबंधारे कालव्यात संशयास्पदरित्या एका अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. बेळगाव जिल्ह्यातील अथणी या तालुक्यातील यक्कंची या गावातील पाटबंधारे योजनेअंतर्गत सुरु असलेल्या कामकाजातील कालव्यात एका युवकाचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला आहे. सदर बाब लक्षात येताच गळी पोलीस स्थानकात ग्रामस्थांनी माहिती दिली असून तातडीने बचावकार्य पथक …

Read More »

उमेश उदय काळे यांना पीएचडी प्रदान

बेळगाव : अनगोळ रोड वरील नागरिक आणि अंगडी कॉलेजचे प्राध्यापक श्री. उमेश उदय काळे यांना कर्नाटक विश्वविद्यालयातर्फे पीएचडी ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. डोमेस्टिक वॉटर मॅनेजमेंट इन बेळगाव या विषयावर त्यांनी सादर केलेल्या प्रबंधाला ही पीएचडी देण्यात आली आहे. त्यांना डॉ. एच. एस. भरडी यांचे मार्गदर्शन लाभले असून ते …

Read More »

‘स्वरगंध’चा स्वरांकित गुरुवंदना सोहळा; विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गाण्यांमुळे श्रोते मंत्रमुग्ध

गुरुवंदनेचा हृद्य सोहळा स्वरगंध दरवळला गायन-वादन कल्लोळ झाला जणू नादब्रह्म अवतरला… असेच काहीसे वर्णन गुरुवंदना या कार्यक्रमाचे करावे लागेल. शहापूर कचेरी गल्लीतील स्वरगंध विद्यालयातर्फे दि. 24 रोजी सरस्वती वाचनालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी विद्यालयाच्या विविध वयोगटातील शिष्यांनी सरस गाणी सादर करुन रसिकांची वाहवा मिळविली. विद्यालयाच्या संचालिका सौ. भाग्यश्री …

Read More »

कायद्याच्या अंमलबजावणीबरोबरच अधिकाऱ्यांमध्ये माणुसकीही महत्त्वाची : आमदार लक्ष्मी हेब्बाळकर

  बेळगाव : आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सोमवारी प्रादेशिक परिवहन विभाग कार्यालयात जाऊन ऑटो आणि टिम्पो ट्रॅव्हलर्स चालकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत परिवहन आयुक्त आणि वरिष्ठ प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ऑटो चालक आणि टेम्पो चालक हे कष्टकरी आहेत. कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह तसेच वाहन कर्ज फेडावे लागते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्यांना कायदेशीर …

Read More »

रस्ते आणि नाल्याच्या समस्येमुळे तिरंगा कॉलनीतील नागरिक हैराण

बेळगाव : बेळगावमधील तिरंगा कॉलनी येथील नाल्यात पाणी वाढल्यामुळे रस्त्यावर पाणी वाहात आहे. यामुळे येथील नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. बेळगावमधील तिरंगा कॉलनी शेजारी असलेल्या नाल्यात पावसामुळे पाण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे या नाल्यातील पाणी रस्त्यावर ओसंडून वाहात आहे. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असून आजूबाजूच्या भागातील पाणीही या …

Read More »

आयुर्वेदामुळे रोग समूळ नाहीसा होतो : आयुर्वेदाचे अभ्यासक सुहास देशपांडे यांचे प्रतिपादन

  बेळगाव : प्रगतिशील लेखक संघाच्या शुक्रवारी झालेल्या साप्ताहिक बैठकीत आयुर्वेदाचे अभ्यासक सुहास देशपांडे यांचे आयुर्वेदाचे फायदे व उपचार याविषयी मार्गदर्शनपर व्याख्यान झाले. प्रारंभी लेखक संघाचे अध्यक्ष प्रा. आनंद मेणसे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. प्रत्येक नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी ही सरकारची आहे. इंग्लंडमध्ये ती सरकार घेते. तशी ती आपल्या सरकारनेही …

Read More »