Saturday , October 19 2024
Breaking News

बेळगाव

बेळगाव जिल्ह्यात 17 लाख रोप लागवडीचे उद्दिष्ट

बेळगाव : शासनाच्या कोटीवृक्ष अभियान अंतर्गत जिल्हा पंचायत फलोत्पादन खाते, वन खाते, सामाजिक वनीकरण खात्याच्या माध्यमातून पुढील पाच वर्षात जिल्ह्यात एक कोटी वृक्षारोपण केले जाणार आहेत. याचाच एक भाग म्हणून यावर्षी 17 लाख 2 हजार रोपे लावण्यात येणार आहेत. विविध सरकारी कार्यालयाचे आवार, सरकारी शाळा, जिल्ह्यातील एपीएमसी आवार, स्मशानभूमी, जंगल …

Read More »

मराठा सेवा संघातर्फे मराठा युवा उद्योजक मेळावा संपन्न

बेळगाव : मराठा समाजाच्या युवकांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतंत्र उद्योजक बनावे. यासाठी मराठा उद्योजकाना एकत्र करून युवकांच्या अडचणी व शंका दूर करण्यासाठी मराठा सेवा संघ बेळगाव यांच्या वतीने दि. 3 जुलै रोजी संभाजी नगर वडगाव येथे उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मराठा सभागृहात आयोजित मेळाव्यास चेंबर ऑफ कॉमर्स …

Read More »

वेटलिफ्टिंगपटू मराठा युवतीचा किरण जाधव यांनी केला सन्मान : दानशूरांना केले मदतीचे आवाहन

बेळगाव : वेटलिफ्टिंग या क्रीडा क्षेत्रातील कार्यकर्तृत्वाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये हालगा – बेळगावच्या ज्या युवतीबद्दल गौरवोद्गार काढले, त्या शेतकरी कन्या असणार्‍या शूर मराठा युवतीचा विमल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि भाजप युवा नेते किरण जाधव यांनी आर्थिक मदत देऊन सन्मान केला. अक्षता बसवंत कामती, राहणार हालगा, …

Read More »

महापौर, उपमहापौर निवडणूक घ्या; अन्यथा पालिकेला टाळे ठोकू

आम आदमी पक्षाकडून सरकारला इशारा बेळगाव : येत्या तीन दिवसांत बेळगाव महानगरपालिकेने महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक घ्यावी, अन्यथा महापालिका कार्यालयाला टाळे ठोकू, असा कडक इशारा आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी सरकारला दिला आहे. बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीला 9 महिने उलटले तरी अद्याप महापौर आणि उपमहापौरांच्या निवड झालेली नाही. निवडणूक जिंकली तरी नगरसेवकांच्या …

Read More »

आरोग्य सौध बेंगळुर येथे आमदार अनिल बेनके यांची भेट

बेळगांव : दिनांक 07 जुलै 2022 रोजी आमदार अनिल बेनके यांनी आरोग्य सौध बेंगळुर येथे भेट दिली आणि एमसीएच, ट्रुमा सेंटर, नर्सिंग कॉलेज आणि वसतिगृहाच्या आगामी प्रकल्पांबाबत संवाद सांधला. तसेच वसतिगृहाचे मुख्य अभियंता यांनी बेळगांव उत्तर मतदारसंघात हे ड्रीम प्रोजेक्ट सुरु करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु, असे प्रतिपादन केले.

Read More »

कर्नाटक मराठा समाज विकास महामंडळ लि. कार्यालयाला आमदार अनिल बेनके यांची भेट

बेळगांव : दिनांक 07 जुलै 2022 रोजी बेळगांव उत्तर मतदारसंघाचे आमदार अनिल बेनके यांनी बेंगळूर येथील कर्नाटक मराठा समाज विकास महामंडळ लि. या कार्यालयाला भेट दिली. महामंडळाचे अध्यक्ष डॉ. एम. जी. मुळे व महामंडळाच्या इतर मान्यवरांची भेट घेतली व मराठा समाजाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी आमदारांसमवेत मराठा विकास …

Read More »

जयतीर्थ मूळ वृंदावनाची बदनामी थांबवा

ब्राह्मण समाजाच्यावतीने निदर्शने बेळगाव : कलबुर्गी जिल्ह्यातील सेडम तालुक्यातील कागीना नदीच्या तीरावरील श्री जयतीर्थाच्या मूळ वृंदावनाबद्दल काही लोकांकडून होणारा अपप्रचार थांबवावा आणि तो करणार्‍यांवर सरकारने कारवाई करावी, या मागणीसाठी बेळगावात ब्राह्मण समाजातर्फे आज आंदोलन करण्यात आले. कोप्पळ जिल्ह्यातील गंगावती तालुक्यातील अणेगोंडी येथील नव वृंदावन येथे रघुवर्य तीर्थाच्या वृंदावनाला जयतीर्थाचे वृंदावन …

Read More »

बेकिनकेरे येथे सेवानिवृत जवानाचा सत्कार

बेळगाव : देश सेवेतून निवृत्त झालेल्या बेकिनकेरे येथील भरमा आण्णाप्पा यळ्ळूरकर यांचा माजी सैनिक संघटना व ग्रामस्थांच्यावतीने आज बुधवारी आयोजित नागरी सत्कार उत्साहात पार पडला. बेकिनकेरे गावातील श्री ज्ञानेश्वर मंदिरात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी ता. पं. उपाध्यक्ष यल्लाप्पा गावडे होते. व्यासपीठावर ग्रा. पं उपाध्यक्षा गंगुबाई गावडे, सदस्य जोतिबा धायगोंडे, …

Read More »

बेळगाव जिल्हा बुद्धीबळ संघटनेच्यावतीने जिल्हा मर्यादित बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

बेळगाव : बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने कै. गंगाधरय्या एस. सालीमठ यांच्या स्मृती प्रित्यर्थ पहिल्या बेळगाव जिल्हा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 9 व 10 जुलै 2022 असे दोन दिवस शिव बसव नगर, बेळगाव येथील आर. एन. शेट्टी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये ही स्पर्धा घेतली जाणार आहे. शनिवार दिनांक …

Read More »

एंजल फाउंडेशनच्यावतीने डेंग्यू व चिकनगुनिया प्रतिबंधक लसीकरण

बेळगाव : एंजल फाउंडेशनच्यावतीने भांदूर गल्ली येथे डेंग्यू व चिकनगुनिया प्रतिबंधक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सध्या पावसाळ्याला सुरुवात झाली असून त्यामध्ये डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे . डेंग्यू व चिकनगुनिया या रोगांचेही प्रमाण वाढत आहे. याकरिता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीला एंजल फाउंडेशनचे …

Read More »