Saturday , October 19 2024
Breaking News

बेळगाव

मोदींच्या नेतृत्वाखाली भारत सर्वाधिक प्रगती करणारा देश : केंद्रीय मंत्री सोमप्रकाश

बेळगाव : गेल्या ८ वर्षांत केंद्र सरकारने गरिबांच्या कल्याणाचा हेतू ठेवून अनेक विकास योजना आणल्या आहेत. या काळात भारत जगातील सर्वाधिक वेगवान प्रगती करणारा देश ठरला आहे असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग खात्याचे राज्यमंत्री सोमप्रकाश यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने सत्तेत ८ वर्षे पूर्ण केल्यानिमित्त बेळगावातील …

Read More »

मी बोलतो ते आचरणात आणतो : आ. श्रीमंत पाटील

किरणगी येथे चार गावांना जोडणाऱ्या रस्त्याचा शुभारंभ अथणी : कागवाड विधानसभा मतदारसंघांमध्ये दिलेल्या आश्वासन प्रमाणे आपण विकास कामे राबवत आहे. आश्वासन देऊन दिशाभूल करणाऱ्यापैकी मी राजकारणी नव्हे. जे बोलतो ते आचरणात आणतो, असे प्रतिपादन माजी मंत्री व कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांनी व्यक्त केले. किरणगी (ता. अथणी) येथे तावशी -किरणगी, …

Read More »

महापौर, उपमहापौर निवडणूक त्वरित घ्या : नगरसेवकांची निवेदनाद्वारे मागणी

बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक होऊन 8 महिने उलटून गेले तरी अद्याप महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक घेण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रभागांमधील कोणतीही कामे होत नाही आहेत. तेंव्हा बेळगाव महापौर-उपमहापौर निवडणूक तात्काळ घेण्यात यावी, अशी मागणी 15 हून अधिक नगरसेवकांनी केली आहे. बेळगाव महापालिकेची निवडणूक होऊन 8 महिने झाले आहेत, …

Read More »

बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मृतदेह ठेवून निदर्शने

बेळगाव : स्मशानभूमीला जायला वाट नसल्याच्या निषेधार्थ सौंदत्ती तालुक्यातील एनगी ग्रामस्थांनी सोमवारी बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मृतदेह ठेवून निदर्शने केली. सौंदत्ती तालुक्यातील एनगी गावात हिंदू-मुस्लिम समाजाच्या स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नाही. याबाबत अनेकवेळा तक्रारी करूनही तालुका प्रशासनाने दाद दिली नव्हती. त्याच्या निषेधार्थ एनगी ग्रामस्थांनी बेळगावात आज आगळेवेगळे आंदोलन केले. गावातील ६५ वर्षीय …

Read More »

समितीच्या मोर्चावेळी गडबड करण्याचा प्रयत्न; करवे नेता पोलिसांच्या ताब्यात

बेळगाव : मराठी भाषेतून सरकारी कागदपत्रे देण्याच्या मागणीसाठी बेळगावात सोमवारी महाराष्ट्र एकीकरण समितीने काढलेल्या मोर्चावेळी गोंधळ घालू पाहणाऱ्या कन्नड रक्षण वेदिके शिवरामगौडा गटाच्या एका आगंतुक नेत्याला पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतले. सीमाभागातील मराठी भाषिकांना मराठी भाषेतून सरकारी परिपत्रके, कागदपत्रे देण्याच्या मागणीसाठी बेळगावात सोमवारी महाराष्ट्र एकीकरण समितीने भव्य मोर्चा काढला होता. त्यामुळे …

Read More »

जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांची बदली

बेळगाव : बेळगाव जिल्ह्याचे पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्या बदलीचा आदेश राज्य सरकारने बजावला आहे. राज्यातील 16 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा आदेश राजकारण सरकारने बजावला असून त्यात बेळगाव जिल्ह्याचे एसपी लक्ष्मण निंबरगी यांचादेखील समावेश आहे आयपीएस अधिकारी संजीव एम. पाटील यांची बेळगाव जिल्ह्याच्या एसपी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. बेंगळुरू …

Read More »

म. ए. समितीची मागणी अर्थहीन : पालकमंत्री गोविंद कारजोळ

बेळगाव : मराठी भाषेत सरकार कागदपत्रे देण्याची महाराष्ट्र एकीकरण समितीची मागणी अर्थहीन असल्याचा जावईशोध लावत कर्नाटकात कन्नडच प्रशासकीय भाषा असल्याने कन्नडमध्येच सरकारी कागदपत्रे देण्यात येतील, अशी दर्पोक्ती जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी मारली. मराठी भाषेत सरकार कागदपत्रे देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आज आंदोलनाची हाक दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी …

Read More »

मराठीतून कागदपत्रांसाठी म. ए. समितीचा विराट मोर्चा

बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषिकांना त्यांची मातृभाषा मराठीतूनच सरकारी कागदपत्रे, दाखले मिळावेत या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने आज पुन्हा एल्गार पुकारला. शहरातील सरदार्स हायस्कूल मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून प्रशासनाचे धाबे दणाणून सोडले. गेल्या अनेक दशकांपासून सीमावासीयांना मातृभाषा मराठीतून सरकारी कागदपत्रे मिळावीत, बसेस आणि सरकारी कचेऱ्यांवर मराठी भाषेतील फलक …

Read More »

श्रीराम सेना हिंदुस्थानच्या वतीने वडगावमध्ये चिकुनगुनिया, डेंग्यू लसीकरण

बेळगाव : पावसाळा सुरु झाला आहे त्यामुळे पावसाळी रोगांच्या प्रसाराची शक्यता गृहीत धरून वडगांव येथील देवांग नगर चौथ्या क्रॉससह भागातील नागरिकांना श्रीराम सेना हिंदुस्तान, डॉ. सोनाली सरनोबत यांच्यावतीने जवळपास 500 जणांना डेंग्यू आणि चिकुनगुनियाची लस देण्यात आली. यावेळी चेतन खन्नूकर, महेश जाधव, कौशिक पाटील, अण्णा पैलवानाचे, काशिनाथ मुचंडी, मंजुनाथ शिंदे, …

Read More »

बी. एस. चन्नबसप्पा टेक्स्टाईल मॉलचे शानदार उद्घाटन

बेळगाव : बेळगावातील कापड व्यवसाय क्षेत्रात क्रांतिकारक पाऊल ठरणाऱ्या बी. एस. चन्नबसप्पा टेक्स्टाईल मॉलचे उद्घाटन रविवारी शानदार कार्यक्रमाद्वारे पार पडले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी उपस्थित राहून शोरूम संचालकांना शुभेच्छा दिल्या. तसेच या उद्घाटनाच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात बोलताना कर्नाटकाच्या उद्योग व्यवसायाची प्रगती व्हावी, अशी सदिच्छा व्यक्त केली. राज्य सरकारने …

Read More »