येळ्ळूर : सर्व थरातील मानवी जीवनात तणाव वाढलेला आहे. त्याचबरोबर चमचमीत आणि तयार खाद्य पदार्थांची रोजच्या आहारात वाढ झालेली आहेत. त्याच बरोबर अनेकांना अनेक प्रकारची व्यसने आहेत. त्यामुळे शरिरामध्ये अनेक आंतरश्वाव्यात अनिचमितता येवून अवयवामध्ये बिघाड होत आहे. याबद्दलचे सविस्तर विवेचन “माधवबाग” मुंबई विभागाचे मेडीकल हेड डॉ. निलेश कुलथे यांनी …
Read More »राकसकोप जलाशयाचे दोन दरवाजे उघडले, पाणी पातळीत मोठी वाढ
बेळगाव : बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाच्या पाणी पातळीत काल सोमवारी मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे सोमवारी दुपारी तीन वाजता जलाशयाचे दोन दरवाजे दोन इंचांनी खुले करण्यात आले आहेत. त्यामुळे मार्कंडेय नदीकाठच्या शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जलाशय तुडुंब भरण्यास अजून दोन फूट पाणी गरजेचे आहे.
Read More »जी. जी. चिटणीस स्कूलच्या सुवर्ण महोत्सवी क्रीडा मैदानाचे उद्घाटन
बेळगांव : अनुदानाशिवाय संस्था चालविणे अत्यंत कठीण आहे. अशा परिस्थितीत जी. जी. चिटणीस शाळेने अत्यंत अत्याधुनिक क्रीडा संकुलाची उभारणी केली याचा मला अभिमान वाटतो असे पालक मंत्री सतीश जारकीहोळी जी. जी. चिटणीस हायस्कूलच्या नूतन सुवर्ण महोत्सवी क्रीडा मैदान उद्घाटन प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट चंद्रहास अणवेकर हे …
Read More »स्मार्ट सिटीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर!
बेळगाव : सध्या कोसळत असलेल्या मुसळधार पावसात स्मार्ट सिटीचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला आहे. नव्याने केलेला अनगोळ- वडगाव मुख्य रस्ता अवघ्या दोन महिन्यात खचल्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करताना वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. काल रात्रीच या रस्त्यावरून जात असताना एक दुचाकीस्वार खचलेल्या रस्त्याचा अंदाज न …
Read More »वृद्ध भिक्षुक महिलेच्या मदतीला धावले सामाजिक कार्यकर्ते
बेळगाव : पांगुळ गल्ली येथे जवळपास तीन दिवसापासून रस्त्याशेजारी झोपून असलेल्या एका असहाय्य वृद्ध भिक्षुक महिलेच्या मदतीला धावून जात सामाजिक कार्यकर्त्यांनी तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेऊन दाखल केले. याबाबतची संक्षिप्त माहिती अशी की, पांगुळ गल्ली येथील एका दुकानदाराचा स्वस्तिक फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना फोन आला. त्या दुकानदाराने गल्लीत एक वृद्ध महिला रस्त्या …
Read More »आंबोली विशेष बससेवा तात्पुरती स्थगित
बेळगाव : वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आंबोलीसाठी दर शनिवार आणि रविवारी सुरू करण्यात येणारी विशेष बससेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. आंबोलीत अधिक पाऊस आणि दरड कोसळल्यामुळे परिवहनने हा निर्णय घेतला आहे. मात्र, येणाऱ्या आठवडाभरात ही बससेवा पुन्हा सुरू होईल, अशी माहिती देण्यात आली आहे. मागील आठवडाभरापासून दमदार पावसाला …
Read More »मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे गुणवंतांचा गौरव
बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विनोद गायकवाड उपस्थित होते. अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे होते. व्यासपीठावर उद्योजक विजय कंग्राळकर, राजीव साळुंखे, अभियंता संग्राम गोडसे, दीपक किल्लेकर, रेणुका …
Read More »जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांच्या पथकाने केली विविध नदीपात्राची पाहणी
बेळगाव : गेल्या चार दिवसांपासून जिल्हाभरात चांगला पाऊस पडत आहे. कृष्णा, घटप्रभा आणि मलप्रभा नद्यांमध्ये आवक वाढली असून, सध्या पुराची भीती नाही. रविवारी (23 जुलै) रोजी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधीक्षकांसह नदीपात्रासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेट देऊन प्रसारमाध्यमांना माहिती दिली. कृष्णा नदीत …
Read More »टिळकवाडी येथील गजानन नगर परिसरातील घरांतून शिरले पाणी; त्याची छायाचित्रे!
बेळगाव : पावसाचा जोर आज रविवारीही कायम राहिला. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून वादळी वारे सुटल्याने ठिकठिकाणी झाडे व घरांची पडझड होत आहे. यात जीवितहानी झाली नसली तरी मोठे नुकसान झाले. टिळकवाडी परिसरातील गजानन नगर भागात घरांतून पाणी शिरले.
Read More »बेळगाव, खानापूर आणि कित्तूर तालुक्यातील प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांना उद्या सुट्टी
बेळगाव : पावसाचा जोर आज रविवारीही कायम राहिला. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून वादळी वारे सुटल्याने ठिकठिकाणी झाडे व घरांची पडझड होत आहे. यात जीवितहानी झाली नसली तरी मोठे नुकसान झाले. नद्यांसह नाल्यांच्याही पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. मुसळधार पावसामुळे सोमवारी (24 जुलै) बेळगाव, खानापूर आणि कित्तूर तालुक्यातील प्राथमिक व …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta