Sunday , December 14 2025
Breaking News

बेळगाव

पहिल्याच पावसात स्मार्ट सिटीचा भोंगळ कारभार उघड!

  बेळगाव : मागील चार दिवसांपासून शहर परिसरात दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाने मागील एक महिना ओढ देत आता दमदार पावसाला सुरवात झाली आहे. पुनर्वसूच्या तरण्या पावसाने शेतकऱ्यांना सावरले मात्र स्मार्ट सिटीचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरात अनेक ठिकाणी …

Read More »

बेळगावसह परिसरात पावसाचा जोर

  बेळगाव : बेळगावसह परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. मागील चार दिवसांपासून सततच्या पावसामुळे नदी, नाले प्रवाहित झाले आहेत. बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला आहे तर रामदुर्ग तालुक्यात किमान पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात खानापूर तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 41.2 मी.मी. पावसाची नोंद झाली असून सर्वात कमी …

Read More »

गोकाक धबधब्यावर जाण्यास निर्बंध; पोलिसांनी जागोजागी बॅरिकेड्स लावले

  बेळगाव : गोकाक येथील धबधबा व परिसर पर्यटकांचे मोठे आकर्षण ठरले आहे. पावसाळ्यात येथे अक्षरशः जत्रा भरते. येथील मंत्रमुग्ध करणारे नैसर्गिक वातावरण लोकांना खेचून आणत आहे. या जबरदस्त ‘लोकेशन्स’वर फोटो न काढले तरच नवल. धबधब्याच्या कड्याजवळ आणि टोकावर धोकादायक स्थितीत सेल्फी व फोटोसेशन केले जात आहे. मात्र, असे करणे …

Read More »

मोहरमच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची खडेबाजार पोलीस स्थानकात बैठक

  बेळगाव : इस्लामिक पहिल्या महिन्याची म्हणजेच नव्या वर्षाची सुरुवात मोहरम महिन्यापासून केली जाते. यंदा २९ जुलै रोजी होणाऱ्या मोहरम ताजियाची सुरुवात १९ जुलै पासून होणार आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावमधील मुस्लिम समाजाच्या प्रमुख नेत्यांची तसेच शांतता समितीच्या सदस्यांची बैठक खडेबाजार पोलीस स्थानकात बोलाविण्यात आली होती. या बैठकीत मोहरम उत्सवाच्या तयारीसंदर्भात …

Read More »

राकसकोप जलाशयाच्या पाणीपातळीत वाढ

  बेळगाव : मागील चार दिवसापासून शहर व परिसरात संततधार सुरू आहे. पावसाचा जोर वाढल्यामुळे नदी, नाले काही प्रमाणात प्रवाहित झाले आहेत त्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. यावर्षी काहीशी दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाणू लागली होती. त्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या …

Read More »

शाहू महाराज स्मृती शताब्दीनिमित्त शनिवारी विशेष व्याख्यान

  बेळगाव : बेळगाव येथील भाऊराव काकतकर महाविद्यालयात शाहू महाराज स्मृती शताब्दी निमित्त कराड येथील व्याख्याते संभाजीराव मोहिते यांचे ‘विशेष व्याख्यान,’ आयोजित करण्यात आले आहे. शनिवारी दि. 22 रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाचे आयोजक साप्ताहिक राष्ट्रवीर, मराठा समाज सुधारणा मंडळ, दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ आणि तुकाराम को ऑप बँक आहेत. शनिवारी …

Read More »

बसुर्ते गावात सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू

  बेळगाव : शिवारात रोप लावणी करताना सापाने चावल्याने इसमाचा मृत्यू झाला. लक्ष्मण सोमान्ना घुमठे (वय 60, राहणार छत्रपती शिवाजी महाराज चौक बसुर्ते बेळगाव) असे या सर्पदंशाने मरण पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. आज दुपारी ही घटना घडली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी असा परिवार आहे. लक्ष्मण हे शेतात भात …

Read More »

कंत्राटी कामगाराचा फेसबुकवर लाईव्ह व्हिडीओ करत विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न!

  बेळगाव : रायबाग तहसीलदार कार्यालयातील कंत्राटी कामगाराने वकिलाच्या छळाला कंटाळून फेसबुकवर लाईव्ह येत विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. हालप्पा सुराणी असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून वकिलाच्या मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. ते पाहून त्याच्या पत्नीने देखील विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. …

Read More »

फिल्मी स्टाईलने लांबविली महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी

  बेळगाव : फिल्मी स्टाईल पद्धतीने महिलेचा पाठलाग करत मोटरसायकल वरून येऊन चाकूचा धाक दाखवत गळ्यातील 20 ग्राम वजनाची अंदाजे एक लाख वीस हजाराची सोनसाखळी लांबून भामट्याने पलायन केल्याची घटना सोमवारी रात्री 8-45 च्या दरम्यान खानापूर रोड मच्छे येथे घडली. वीणा धोंडीराम तारणाळे मजगावकर नगर मच्छे असे सोनसाखळी लूटलेल्या महिलेचे …

Read More »

सावगाव रोडवरील अपघातात जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू

  बेळगाव : अशास्त्रीय पद्धतीने घातलेल्या गतिरोधकावरून पडून जखमी झालेल्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा सोमवारी खाजगी इस्पितळात उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. सावगाव रोड वरील अंगडी कॉलेज जवळ ही घटना घडली आहे ऋषिकेश सत्यप्रमोद कुलकर्णी (वय 27) राहणार बुधवार पेठ टिळकवाडी असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. बुधवार दिनांक 12 जुलै रोजी दुचाकीवरून कॉलेजला …

Read More »