बेळगाव : श्रीराम सेना हिंदुस्थान संघटनेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन अनगोळ राजहंस गल्ली येथील सद्गुरू सदानंद महाराज मठात रविवार दि. 28/12/2025 रोजी सकाळी 9 ते 2 वा पर्यंत करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी जपत समाजासाठी उपयुक्त असे उपक्रम राबविण्याची परंपरा या संघटनेने कायम जपली असून त्याचाच एक भाग म्हणून …
Read More »शिव बसव ज्योती होमिओपॅथिक विद्यार्थ्यांची नंदिनी प्रकल्पाला शैक्षणिक भेट
बेळगांव (प्रतिनिधी) : येथील आधार एज्युकेशन सोसायटी संचालित श्री शिवबसव ज्योती होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या समूहाने नंदिनी दुग्ध प्रकल्पाला शैक्षणिक भेट दिली. कॉलेजमधील सामुदायिक औषधशास्त्र विभागाने नंदिनी दूध डेअरीला क्षेत्रभेट आयोजित केली होती. सामुदायिक औषधशास्त्र विभागाच्या सदस्यांनी बीएचएमएस अभ्यासक्रमातील तिसऱ्या वर्षाच्या ३५ विद्यार्थ्यांसोबत डेअरीला भेट दिली. डेअरीतील व्यवस्थापिका श्रीमती महालक्ष्मी …
Read More »युवा शक्तीच्या जोरावर भारत विश्वगुरु : डॉ. मीना चंदावरकर यांचा विश्वास
बेळगाव : योग्य नियोजन, आत्मविश्वास, सकारात्मक विचार आणि आव्हानांचा यशस्वीपणे सामना करण्याची शिकवण याद्वारे बी.के मॉडल हायस्कूलने लाखो विद्यार्थी घडविले. या शाळेचे विद्यार्थी जगाच्या कानाकोपऱ्यात यशस्वीपणे कार्यरत आहेत. या युवाशक्तीच्या जोरावरच भारत विश्वगुरू होणार आहे, असा विश्वास शिक्षणतज्ञ, कर्नाटक विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉक्टर मीना चंदावरकर यांनी बोलावून दाखवला. बी. के. …
Read More »येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीने संघटना बांधणीचे रणसिंग फुंकले
येळ्ळूर : तळागळातील कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष भेटून विभागवार बैठका घेवून समितीला बळकटी देण्याबरोबर दैनंदिन समस्या जाणून घेण्यासाठी परमेश्वर मंदिर येथे विभागवार बैठक घेऊन संघटना बांधणीचे रणसिंग फुंकण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे जेष्ठ कार्यकर्ते बाबू यल्लापा कंग्राळकर होते. प्रारंभी प्रकाश अष्टेकर यांनी प्रास्ताविक भाषणात सीमा चळवळीचा आढावा घेत मराठी जनतेने संघटीत …
Read More »प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर उद्या बेळगावात: कार्यक्रम सर्वांना खुला
बेळगाव : येथील प्रतिष्ठित शिक्षण संस्था ‘बेळगाव एज्युकेशन सोसायटी’ च्या बी.के. मॉडेल हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणून बुधवार दि. २४ डिसेंबर रोजी भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक सचिन पिळगावकर उपस्थित राहणार आहेत. शाळेच्या भव्य मैदानावर हा कार्यक्रम सायंकाळी साडेपाच वाजता संपन्न …
Read More »मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी, बेळगाव येथे जागतिक ध्यान दिन साजरा
बेळगाव : मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी येथे जागतिक ध्यान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह प्राध्यापकवर्ग आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आणि प्रशिक्षक म्हणून ‘हार्टफुलनेस मेडीटेशन सेंटरचे’ प्रशिक्षिक ब्रदर सतिश लाभले होते. तर व्यासपीठावर कॉलेजचे प्राचार्य डॉ. विष्णू कंग्राळकर आणि उप-प्राचार्य …
Read More »नगरसेवक निधीतून रस्त्याचा प्रश्न मार्गी; नगरसेविका सौ. नेत्रावती भगवत यांचे आभार..
बेळगाव : समर्थ नगर चौथा क्रॉस, वॉर्ड क्रमांक १५ येथे नवीन पेव्हर रोडच्या बांधकामाच्या कामाचा शुभारंभ पूजाविधीने करण्यात आला. सदर रस्ता विकासकाम नगरसेविका सौ. नेत्रावती विनोद भागवत यांच्या निधीतून करण्यात येत आहे. गेल्या तब्बल २० वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्ती व विकासाची प्रतीक्षा नागरिक करत होते. अखेर हा प्रश्न मार्गी …
Read More »भावी पिढी घडवण्याचे काम शिक्षकांबरोबर पालकांचे : खासदार जगदीश शेट्टर यांचे प्रतिपादन
बेळगाव : अलीकडच्या काळात पालकांच्या मुलांबद्दलच्या अपेक्षा वाढल्या आहेत. याकडे लक्ष दिल्यास पालकांनी मुलांना भावी जीवनाच्या वाटा चोखाळण्याचे स्वातंत्र्य द्यावे.भावी पिढी घडविण्याचे काम शिक्षकांबरोबर पालकांचेही असल्याचे प्रतिपादन,माजी मुख्यमंत्री आणि बेळगावचे विद्यमान खासदार जगदीश शेट्टर यांनी केले. कॅम्प येथील बी.के. मॉडल हायस्कूलच्या शतक महोत्सव कार्यक्रमात आज खासदार जगदीश शेट्टर आणि …
Read More »खासदार धैर्यशील माने यांच्यावर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडणार : करवे
बेळगाव (वार्ता) : गेल्या पन्नास वर्षांपासून महाराष्ट्रातील नेते बेळगावमध्ये येऊन चिथावणीखोर भाषणे देऊन भाषिक द्वेषाची बीजे पेरत आहेत. कर्नाटकातील नागरिक राज्योत्सव साजरा करतात. तेव्हा समिती बेळगावमध्ये काळा दिवस पाळतात आणि बेळगावमधील अधिवेशनादरम्यान महामेळावा भरवणारे राज्यद्रोही महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावात आमंत्रित करून त्यांना चिथावणीखोर भाषणे करायला लावतात. …
Read More »कोल्हापूरच्या ‘ग्वाही’, बेळगावच्या ‘झाले मोकळे आभाळ’ एकांकिकेची बाजी
बेळगाव : १४ व्या कॅपिटल वन करंडक एकांकिका स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ बेळगावात अतिशय उत्साही वातावरणात पार पडला. या स्पर्धेच्या खुल्या गटात कोल्हापूरच्या डी.आर.के.सी. कॉलेज ऑफ कॉमर्सच्या ‘ग्वाही’ एकांकिकेने, तर शालेय विद्यार्थ्यांच्या जिल्हा मर्यादित गटात वरेरकर नाट्य संघ बेळगावच्या ‘झाले मोकळे आभाळ’ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावून बाजी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta