Friday , October 18 2024
Breaking News

बेळगाव

बायपास रस्त्यावरील कचऱ्याची शेतकरी रविवारी विल्हेवाट करणार!

बेळगाव : हालगा -मच्छे बायपास रस्त्याच्या ठिकाणी दारूच्या पार्ट्या व अन्य जे गैरप्रकार चालतात त्याला आळा घालण्याच्या मागणीकडे प्रशासन व पोलीस खात्याचे लक्ष वेधण्यासाठी या बायपास पट्ट्यातील शेतकरी एकत्र येऊन येत्या रविवार दि. ३ एप्रिल रोजी सकाळी श्रमदानाने या रस्त्याशेजारील शेतात पडलेल्या दारूच्या बाटल्या व इतर कचरा गोळा करणार आहेत. …

Read More »

बेळगावात १३० कोटीतून होणार किडवाई कॅन्सर हॉस्पिटल

बेळगाव : बेळगावात ४ एकर प्रशस्त जागेत १३० कोटी रुपये खर्चातून किडवाई कॅन्सर संस्था हॉस्पिटल सुरु करण्यात येणार असल्याची माहिती बंगळूरच्या किडवाई संस्थेचे संचालक डॉ. सी. रामचंद्र यांनी सांगितले. बेळगावात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. सी. रामचंद्र म्हणाले, शिमोगा, तुमकूर, म्हैसूर येथे किडवाई संस्थेची केंद्रे सुरु करण्यात आली …

Read More »

मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे ३ एप्रिल रोजी वधू-वर मेळावा

बेळगाव – मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे रविवार दि.३ एप्रिल रोजी वधू -वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रेल्वे ओव्हरब्रिज येथील मराठा मंदिर येथे सकाळी १०.३० वाजता या मेळाव्यास प्रारंभ होईल. या मेळाव्यास सामाजिक कार्यकर्ते शंकरराव पाटील व युवा उद्योजक शीतल वेसणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. तरी मेळाव्याचा अधिकाधिक …

Read More »

44.16 कोटींची घरपट्टी बेळगाव मनपाकडून वसूल

बेळगाव : बेळगाव महापालिकेच्या महसूल विभागाला यंदाच्या आर्थिक वर्षात उद्दिष्टाच्या 80 टक्के पेक्षा जास्त घरपट्टी वसुली करण्यात यश आले असून तब्बल 44 कोटी 16 लाख रुपये इतकी घरपट्टी वसूल करण्यात आली आहे. आजवरची ही सर्वाधिक घरपट्टी वसुली आहे. कोरोना लॉकडाऊनची समस्या गेल्या 2021-22 या आर्थिक वर्षात देखील होती. याशिवाय बेळगाव …

Read More »

जायंट्स वेल्फेअर फौंडेशनच्या विशेष समिती सदस्यपदी मोहन कारेकर यांची निवड

बेळगाव : बेळगाव शहर आणि परिसरात गेल्या छत्तीस वर्षांपासून कार्यरत असलेल्या जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनचे संस्थापक सदस्य मोहन कारेकर यांची जायंट्स वेल्फेअर फौंडेशन या जागतिक स्थरावर काम करणाऱ्या संघटनेच्या विशेष समिती सदस्यपदी निवड करण्यात आली. गेल्या छत्तीस वर्षापासून जायंट्स मेनचे सचिव, खजिनदार, उपाध्यक्ष आणि अध्यक्ष म्हणून कार्य केले असून …

Read More »

रेल्वे स्थानकासमोर छ. शिवाजी महाराजांची प्रतिमा बसवा : प्रमोद मुतालिक

बेळगाव : पुनर्निर्मित नव्या बेळगाव रेल्वे स्थानकाच्या दर्शनीय भिंतीवर बसविण्यात आलेल्या महापुरुष आणि क्रांतिकारकांच्या प्रतिमांमध्ये हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचा अभाव आहे ही अत्यंत दुर्दैवी व खेदाची बाब आहे. तेव्हा केंद्र सरकारने बेळगाव रेल्वे स्थानकासमोरील महापुरुष व क्रांतिकारकांच्या प्रतिमानमध्ये शिवरायांच्या प्रतिमेचा अंतर्भाव करावा, अशी मागणी श्रीराम सेनेचे …

Read More »

धर्मवीर संभाजी महाराज चौकात बलिदान मासाची सांगता

बेळगाव : वद्य श्रीशके 1610 दिनांक 11 मार्च 1689 हौतात्मा दिन तेंव्हापासून प्रत्येक वर्षी एक महिना बलिदान मास म्हणून पाळला जातो. या महिन्यामध्ये शंभुभक्त पायात चप्पल न घालता व आपले आवडते अन्न वर्ज करुन दररोज सकाळ व सायंकाळी फोटोपूजन करतात. या बलिदान मासाला एक महिना झाला असून शिवपुत्र छत्रपती श्री …

Read More »

….अखेर शिवसृष्टीच्या उद्घाटनाची मुहूर्त मिळाला!

  एप्रिल अखेरीस होणार योगी आदित्यनाथांच्या हस्ते उद्घाटन बेळगाव : छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित शिवसृष्टी निर्मितीचे कामकाज पूर्णत्वास आले असून एप्रिल अखेर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती आमदार अभय पाटील यांनी दिली आहे. बेळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना आमदार अभय पाटील म्हणाले, बेळगावमधील शिवसृष्टी हे आपले …

Read More »

आमदारांनी घेतला बुडाच्या विकासकामांचा आढावा

बेळगाव : उत्तर मतदार संघामध्ये बेळगाव शहर विकास प्राधिकरणाकडून (बुडा) राबवण्यात येत असलेली विकास कामे आणि भविष्यातील विकास कामांबाबत आमदार अ‍ॅड. अनिल बेनके यांनी आज गुरुवारी आढावा बैठक घेतली. बेळगाव उत्तरचे आमदार अ‍ॅड. अनिल बेनके यांनी आज गुरुवारी बुडा कार्यालयांमध्ये बुडाचे अध्यक्ष, संचालक आणि अधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीत उत्तर …

Read More »

बारा कोटींच्या विकास कामांना चालना

बेळगाव : बेळगाव शहराच्या उत्तर भागात आमदार अनिल बेनके यांनी बारा कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना गुरुवारी चालना दिली. मूलभूत सुविधा, रस्ते, नाला, ड्रेनेज, सीडी वर्क अश्या विविध विकासकामाना अनिल बेनके यांनी सुरुवात केली. ढोर गल्ली, भडकल गल्ली, कोतवाल गल्ली रोड या ठिकाणचे काँक्रिटचे रस्ते हनुमान नगर टीव्ही सेंटरमधील शाहूनगर भागातल्या …

Read More »