Friday , October 18 2024
Breaking News

बेळगाव

खानापूर तालुका म. ए. समितीत एकीची वज्रमुठ!

4 एप्रिलपासून पुनर्रचना प्रक्रिया सुरू खानापूर : खानापूर तालुक्यातील जागृत देवस्थान श्रीक्षेत्र हब्बनहट्टी येथील स्वयंभू मारुती मंदिरात खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दोन्ही गटात एकी घडली. गुरुवारी झालेल्या दोन्ही गटांच्या संयुक्त बैठकीत एकी करण्याचा निर्णय झाला असून 4 एप्रिल रोजी खानापूर शिवस्मारकात बैठक होणार असून त्या बैठकीपासून पुनर्रचनेला सुरुवात होणार …

Read More »

यंदा कर वाढ नको; आमदार अनिल बेनके

बेळगाव : बेळगाव महापालिकेकडून यावर्षी जवळपास साडेतीन टक्के कर वाढ असल्याची माहिती मिळताच उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी तात्काळ महापालिका आयुक्त रुद्रेश घाळी यांची भेट घेऊन कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना कर वाढ करण्यात येऊ नये या मागणीचे निवेदन सादर केले. तत्पूर्वी आमदार बेनके यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि नगरविकास मंत्री बसवराज …

Read More »

देसूर येथे श्रीराम मूर्ती सवाद्य मिरवणुकीने रवाना

बेळगाव : देसूर (ता. जि. बेळगाव) येथे नव्याने बांधण्यात आलेल्या श्रीराम मंदिरामध्ये प्रतिष्ठापना करण्यासाठी पंढरपूर होऊन बेळगावात दाखल झालेली श्रीराम मूर्ती आज सायंकाळी सवाद्य मिरवणुकीने देसूरला नेण्यात आली. देसुर येथील मौजे बसवाण गल्ली येथे नव्याने बांधण्यात आलेल्या श्रीराम मंदिराचे उद्घाटन आणि मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा येत्या सोमवार दि. 28 मार्च 2022 …

Read More »

हिंडलग्यात 9 एप्रिलला हनुमान स्पोर्ट्स क्लबतर्फे शरीरसौष्ठव स्पर्धा

बेळगाव : हिंडलगा येथील हनुमान स्पोर्ट्स क्लबतर्फे येत्या शनिवार दि. 9 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता हिंडलगा ग्रा. पं. सदस्य रामचंद्र मन्नोळकर आणि एसएसएस फाउंडेशनचे संस्थापक -चेअरमन संजय सुंठकर पुरस्कृत जिल्हास्तरीय 10 वी हिंडलगा श्री -2022, ग्रामपंचायत स्तरीय 10 वी हिंडलगा क्लासिक -2022 आणि जिम पातळीवरील रुद्र क्लासिक टॉप …

Read More »

मुस्लीमांवर आर्थिक बहिष्काराचे आंदोलन : प्रमोद मुतालिक

बेळगाव : सौंदत्ती रेणुका यल्लमा देवस्थानासह बेळगाव जिल्ह्यातील सर्व हिंदू देवालयांच्या यात्रा काळात आणि देवस्थान परिसरात मुस्लिम धर्मियांकडून केल्या जाणाऱ्या व्यापाराला विरोध करून त्यांच्यावर आर्थिक बहिष्कार घालण्याचे आंदोलन श्रीराम सेनेने छेडले असल्याची माहिती श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी दिली. बेळगाव येथे आज गुरुवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते …

Read More »

क्षयरोग नियंत्रणासाठी बेळगाव जिल्ह्याला रौप्य पदक

बेळगाव : क्षयरोगाच्या नियंत्रणात बेळगाव जिल्ह्याने सर्वोत्तम कामगिरी करत रौप्य पदक मिळविले असून बेळगाव जिल्ह्याला मिळालेल्या यशाबद्दल जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी आनंद व्यक्त केला आहे. शिवाय पुढील वर्षी सुवर्णपदकाचा दिशेने कार्यरत राहण्यासाठी आवाहन केले आहे. बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग आणि संघ, क्षयरोग नियंत्रण …

Read More »

तिसरे राज्यस्तरिय बेळगाव मराठी साहित्य संमेलन ८ मे रोजी

बेळगाव : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव जिल्हा व मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 8 मे 2022 रोजी मराठा मंदिर बेळगाव येथे तिसरे राज्यस्तरिय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाचा जागर होणार आहे. डी. बी. पाटील फोटो स्टुडिओच्या कार्यालयात जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. अध्यक्षस्थानी ॲड. सुधीर चव्हाण …

Read More »

अथणी सरकारी हॉस्पिटलवर लोकायुक्त धाड

बेळगाव : अथणी येथील सरकारी हॉस्पिटलबद्दलच्या वाढत्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेताना लोकायुक्त एसपी यशोदा वंटगुडे आणि डीवायएसपी जी. रघू यांच्या नेतृत्वाखालील पथकाने काल बुधवारी अथणी सरकारी हॉस्पिटलवर धाड टाकली. यामुळे तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, अथणी सरकारी हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकारी शस्त्रक्रियेसाठी रक्कम उकळत …

Read More »

सरकारी प्राथमिक मराठी शाळा बेळगुंदी येथे युवा समितीच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत दरवर्षीप्रमाणे यंदाही सरकारी प्राथमिक मराठी शाळा बेळगुंदी येथे मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या १लीच्या विद्यार्थ्यांना तसेच गरजू विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी युवा समितीचे कार्यकर्ते युवराज सुतार यांनी उपस्थिताना सदर उपक्रमाची माहिती देवून विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा उद्देश पटवून दिला. उपस्थित शिक्षक …

Read More »

सीमाभागातील पत्रकारांनाही आरोग्य सुविधा द्या : आम. राजेश पाटील

बेळगाव : सीमाभागातील मराठी पत्रकारांना देखील महाराष्ट्र शासनाने आरोग्याच्या सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी लक्षवेधी सूचना चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळात मांडली. महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून लाभ दिला जातो. शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीची स्थापना 1 ऑगस्ट 2009 रोजी करण्यात …

Read More »