Friday , October 18 2024
Breaking News

बेळगाव

पाणी समस्या उद्भवल्यास बांधून घालेन : आ. अभय पाटील यांचा एल अँड टी अधिकार्‍यांना इशारा

बेळगाव : बेळगाव शहरात कुठे जरी पाण्याची समस्या उद्भवली तर तुम्हाला बांधून घालून, ब्लॅक लिस्टमध्ये घालेन असा इशारा आ. अभय पाटील यांनी एल अँड टी कंपनीच्या अधिकार्‍यांना दिला. बेळगाव महानगर पालिकेने शहराच्या पाणी पुरवठ्याची जबाबदारी एल अँड टी कंपनीला दिली आहे. मात्र त्या दिवसापासून शहरात पाण्याची समस्या वरचेवर निर्माण होत …

Read More »

आमदार अनिल बेनके यांच्या कार्यालयाची अज्ञातांकडून मोडतोड

बेळगाव : बेळगाव उत्तरचे भाजपचे आमदार अनिल बेनके यांच्या चव्हाट गल्ली येथील राजकीय कार्यालयावर रात्री अज्ञातांकडून मोडतोड करण्यात आली. त्यामुळे येथील घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. दगडफेक कोणी आणि कशामुळे केली हे अद्याप समजू शकले नाही. ज्या ठिकाणी आमदारांचे कार्यालय आहे ते ठिकाण शहरातील अतिसंवेदनशील भागांपैकी एक म्हणून ओळखले जाते. दगडफेकची …

Read More »

योगामुळे जीवनशैलीत परिवर्तन होते : दीपक पानसरे

बेळगाव : दैनंदिन जीवनात नियमित योगअभ्यास व सूर्य नमस्कार केल्यामुळे जीवनशैलीत परिवर्तन होते तसेच अष्टांगयोगमुळे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी यामुळे साधना शक्ती वाढते असे प्रतिपादन योग प्रशिक्षक दीपक पानसरे यांनी समन्वित आयोजित शिक्षकांच्या योग शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी उद्गार काढले. अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या माधव …

Read More »

मुगूळ ओढ्यामध्ये आढळला बेपत्ता युवकाचा मृतदेह

बेळगाव : घुमटमाळ, हिंदवाडी येथील प्रज्वल बसवराज महांतशेट्टी या बेपत्ता झालेल्या 24 वर्षीय युवकाचा मृतदेह येळ्ळूर शिवाराच्या हद्दीतील मुगूळ ओढ्यामध्ये गुडघाभर पाण्यात आढळला आहे. बेळगाव शहरातील नामांकित डॉक्टर बसवराज सिद्धाप्पा महांतशेट्टी यांचा मुलगा प्रज्वल बसवराज महांतशेट्टी हा झाडशहापूर-मच्छे शिवार परिसरात बेपत्ता झाल्यानंतर बेळगाव ग्रामीण पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली होती. …

Read More »

सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करणार्‍यावर कारवाई

बेळगाव : सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘हिजाब अथवा केसरी’ संदर्भात कोणाच्याही भावना दुखणाऱ्या वादग्रस्त पोस्ट करू नयेत. या पद्धतीने सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न कोणी करू नये, असे आवाहन डीसीपी रवींद्र गडादी यांनी केले आहे. दरम्यान, कर्नाटकातील हिजाब वादाशी संबंधित एका याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने काल तातडीची सुनावणी फेटाळून लावली. आम्ही योग्य …

Read More »

कर्नाटक प्रवेश आरटीपीसीआर सक्ती रद्द

पोलिस बंदोबस्त कायम कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावरुन कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी लागणाऱ्या आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्टची सक्ती कर्नाटक शासनाने रद्द केली असून कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी आता फक्त कोरोना दोन डोस घेतलेला दाखला दाखवून प्रवेश मिळणार आहे. कर्नाटक शासनाच्या या निर्णयाचे महाराष्ट्र व कर्नाटकातील सीमा …

Read More »

कै. जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेठ यांची 219 वी जयंती साजरी

बेळगाव : दैवज्ञ ब्राह्मण समाज शिक्षण संस्था व सुवर्ण लक्ष्मी को ऑप क्रेडिट सोसायटी ली. यांच्या संयुक्त विद्यमानाने सोसायटीच्या सभागृहात कै. जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेठ यांची 219 वी जयंती साजरी करण्यात आली. व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे चेअरमन विठ्ठल शिरोडकर तसेच प्रमुख पाहुणे प्रदीप अर्कसाली, संस्थेचे संस्थापक मोहन कारेकर, व्हाईस चेअरमन …

Read More »

बेळगांवचे तीन सुपुत्र बनले ऑनररी कॅप्टन

बेळगाव : भारतीय सैन्यदलात बेळगांवच्या अनेक जवानांनी नावलौकिक मिळविला आहे.यातच आता तब्बल 28 वर्षानंतर प्रथम मराठा लाइट इन्फेंट्री रेजीमेंट सेंटर प्रथम बटालियन (जंगी पलटन) चे सूभेदार मेजर ऑनररी लेफ्टनंट राम धामणेकर हुचेंनट्टी, सूभेदार ऑनररी लेफ्टनंट बाजीराव शिंदे गणेशपूर, सूभेदार ऑनररी लेफ्टनंट अशोक सदाशिवराव जाधव खडक गल्ली या बेळगांवच्या तीन सुपुत्रांना …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या बस तक्रारीची परिवहन महामंडळाकडून दखल

बेळगाव : दिनांक ०८/०२/२०२२ रोजी मच्छे येथे परिवहन मंडळाच्या बसला विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून प्रवास करीत होते. या संदर्भात म. ए. युवा समितीने हुबळीच्या परिवहन महामंडळकडे ट्विटरद्वारे तक्रार करून अतिरिक्त बसेस सोडण्याची मागणी केली होती आणि कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला होता. युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक …

Read More »

गरजू मुला-मुलींना शैक्षणिक साहित्य वाटप

बेळगाव : माहेश्वरी युवा संघ बेळगांव व ‘ऑपरेशन मदत’ यांनी संयुक्तपणे मोहीम राबवुन खानापूर तालुक्यातील कणकुंबी परिसरातील दुर्गम चिगुळे गावातील सरकारी प्राथमिक शाळेतील गरजू विद्यार्थ्यी व विद्यार्थ्यांनींना शैक्षणिक साहित्य आणि मोठ्या रगचे (ब्लॅंकेट) वाटप केले. ‘ऑपरेशन मदत’ तर्फे खानापूर तालुक्यातील जंगलातील दुर्गम खेड्यापाड्यावरील मुलांमुलींना शिक्षणासाठी मदत करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार …

Read More »