Sunday , December 14 2025
Breaking News

बेळगाव

अनगोळ येथे घराला आग लागून नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली

  बेळगाव : अनगोळ, झेरे गल्ली येथे घराला आग लागून घरातील गृहोपयोगी आणि खाद्योपयोगी ऐवज जळून खाक झाला. रोजंदारी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणाऱ्या एका गरीब महिलेच्या घराला आग लागून आगीत गृहोपयोगी आणि खाद्योपयोगी वस्तू जळून खाक झाल्याने ही महिला मोठ्या अडचणीत आली आहे. घटनेची माहिती समजताच भाजप कर्नाटक राज्य ओबीसी …

Read More »

जगातील सर्वात मोठी शक्ती, प्रेरणास्थान म्हणजे गुरू : आर. एम. चौगुले

  बेळगाव : प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात गुरू हे आलेले असतात आणि त्यांच्या सानिध्यात राहून आपण आपले जीवन सुखी समाधानी केले पाहिजे. प्राचीन काळापासून गुरूचा महिमा खूप मोठा असून आपल्या विद्यार्थ्यांची उन्नती पाहणे यामध्ये त्यांचे खरे समाधान असते, असे विचार म. ए. समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले यांनी व्यक्त केले. …

Read More »

सदलगा-दत्तवाड चेकपोस्टवर १६ लाखांच्या साड्या जप्त

  बेळगाव : विधानसभेच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यातील सीमांवर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे. बाची चेकपोजवळ सव्वासात लाखांचे मध्य जप्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर कणबर्गी येथील चेकपोस्ट जवळ नऊ लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. त्यानंतर …

Read More »

24 मार्चचा शेतकरी मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार

  म. ए. समितीच्या बैठकीत निर्धार बेळगाव : दिनांक 24 मार्च रोजी बेळगुंदी येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. माजी खासदार राजू शेट्टी शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. सरकार विविध कारणास्तव बेळगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी संपादित करत आहे. या पार्श्वभूमीवर बेळगुंदी येथील शेतकरी मेळावा …

Read More »

जय-पराजयाचा विचार सोडून स्पर्धकांनी स्पर्धेत सहभागी होणे महत्त्वाचे : किरण जाधव

  बेळगाव : स्पर्धेत जय- पराजय ही दुय्यम बाब असून स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या कलागुणांना सादर करणे महत्त्वाचे आहे, असे भाजप कर्नाटक राज्य ओबीसी युवा मोर्चा सचिव आणि सकल मराठा समाजाचे संयोजक किरण जाधव म्हणाले. कन्नड महिला संघ, साहित्य कला वेदिकेच्यावतीने रविवारी टिळकवाडी येथील दुसऱ्या रेल्वे फाटकानजिकच्या वरेरकर नाट्य भवन …

Read More »

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी गांभीर्याने

  बेळगाव : श्री धर्मवीर छ. संभाजी महाराज चौक बेळगाव सकाळी 09.30 वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे सालाबादप्रमाणे श्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त पुजन करण्यात आले. सुरुवात प्रेरणा मंत्राने करण्यात आली. बेळगाव सीमाभाग शिवसेना उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर आणि संघटक तानाजी पावशे, मंगेश नागोजीचे यांच्या हस्ते पुष्पहार घालून …

Read More »

राजहंसगडावर राबविली समिती नेत्यांनी स्वच्छता मोहीम!

  बेळगाव : काल झालेल्या दुग्धाभिषेक सोहळ्यासाठी बेळगांव परिसरातून हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. हा दिमाखदार सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी बेळगाव शहर तसेच ग्रामीण भागातून बहुसंख्येने लोक उपस्थित होते. त्यामुळे गड परिसरात कचरा निर्माण झाला होता. म. ए. समितीच्या माध्यमातून आज सोमवारी गड परिसरात स्वच्छता माहीम राबविण्यात आली होती. …

Read More »

बेळगाव तालुका व शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची संयुक्त बैठक उद्या

  बेळगाव : राजहंसगडावरील छत्रपती शिवाजी महाराजाच्या मूर्तीला दुग्धाभिषेकाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समस्त शिवभक्तांनी सहकार केले त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी बेळगाव तालुका व शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची संयुक्त बैठक मंगळवार दिनांक २१ रोजी दुपारी ठीक ३.०० वाजता मराठा मंदिर (रेल्वे ओव्हर ब्रिज) येथे आयोजित करण्यात आली आहे. रविवार दिनांक १९ …

Read More »

कर्नाटकातील भ्रष्टाचारावर पंतप्रधान मुग गिळून गप्प

  राहुल गांधींची बेळगावच्या जाहिर सभेत घणाघाती टीका बेळगाव : राज्यातील विकास कामात 40% कमिशन घेतले जात असल्याचा आरोप कॉन्ट्रॅक्ट असोसिएशन ने केला आहे. या संदर्भात कॉन्ट्रॅक्ट असोसिएशन स्कूल मॅनेजमेंट असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविले आहे. मात्र त्या पत्राचे उत्तर पंतप्रधानांनी अद्यापही दिलेले नाही. कर्नाटकातील भ्रष्टाचारावर पंतप्रधान मूग …

Read More »

कुद्रेमानी गावात अधिकाऱ्यांचा छापा; मतदारांना वाटण्यासाठी आणलेल्या टिपीन बॉक्ससह साहित्य जप्त…!!

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कुद्रेमानी गावात रविवारी सायंकाळी ग्रामीण भागातील मतदारांना वाटण्यासाठी भाजप नेत्याच्या घरी जमा करण्यात आलेल्या टिपीन बॉक्ससह काही भेटवस्तू अधिकाऱ्यांनी जप्त केल्याची घटना घडली. बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील कुद्रेमानी गावातील भाजप नेत्याच्या घरी मतदारांसाठी टिपीन बॉक्ससह काही साहित्य जमा करून ठेवण्यात आले होते. मात्र याबाबत खात्रीशीर माहिती …

Read More »