बेळगाव : बेळगावात आजपासून जाती आणि सामाजिक सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. आज, बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ आणि जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या उपस्थितीत जाती आणि सामाजिक सर्वेक्षणाला प्रारंभ झाला. सर्वेक्षण करण्यासाठी घरी आलेल्या शिक्षकांना नागरिकांनी त्यांच्या जाती, धर्म आणि इतर सामाजिक माहिती दिली. यावेळी नगरसेवक आणि अधिकारीही उपस्थित होते.
Read More »सांबरा येथील रास्ता रोको प्रकरणी 8 जण निर्दोष
बेळगाव : सांबरा येथे शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी करण्यात आलेल्या रस्ता रोको प्रकरणी माजी जिल्हा पंचायत सदस्य नागेश देसाई यांच्यासह आठ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 2018 साली अतिवृष्टी झाल्याने सांबरा विमानतळाच्या बाजूला असलेल्या भिंतीच्या बाजूला शेतकऱ्यांचा रस्ता पावसाने उध्वस्त झाला होता. सदर रस्ता व्हावा यासाठी शेतकऱ्यांच्या वतीने सांबरा …
Read More »माणिकवाडी येथील मृत व्यंकाप्पा मयेकर याच्या आई-वडीलांनी घेतली माजी आमदार डॉ. निंबाळकर यांची भेट
खानापूर : माणिकवाडी येथील तरुण व्यंकाप्पा मल्हारी मयेकर याचा चोरी केल्याच्या संशयावरून बेदम मारहाण केल्याने मृत्यू झाला होता. त्यासंदर्भात माणिकवाडी येथील ग्रामस्थ, पंच तसेच मयत व्यंकाप्पा याचे आई-वडील यांनी माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांची भेट घेतली व या खून प्रकरणातील तपासाबाबत चर्चा केली. यावेळी माजी आमदार डॉ. अंजली …
Read More »हलगा गावात बससेवा सुरू
बेळगाव : महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या निर्देशानुसार बेळगावातील हलगा गावासाठी बससेवा सुरू करण्यात आली आहे. गेल्या शुक्रवारी हलगा गावातील ग्रामस्थांनी मंत्री हेब्बाळकर यांच्या कार्यालयात जाऊन बससेवेची मागणी केली होती. मंत्र्यांनी त्वरित यावर लक्ष दिले आणि संबंधित अधिकाऱ्यांना बससेवा सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, आजपासून हलगा गावात …
Read More »गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी बेळगाव पोलिसांची कारवाई; 440 किलो गांजा जप्त
बेळगाव : शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस दलाने कंबर कसली असून सणासुदीच्या काळात गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी बेळगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एकाच वेळी विविध गुन्ह्यात सहभाग असलेल्या गुन्हेगारांना पकडून लाखोंचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. रायबाग तालुक्यातील निडगुंदी गावात गांजाची शेती करणाऱ्या एकाला रायबाग पोलिसांनी अटक केली …
Read More »रोहतक येथे झालेल्या सीबीएसई राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत ज्योती सेंट्रल स्कूलच्या वेदांत मिसाळेची चमकदार कामगिरी
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूलचा विद्यार्थी वेदांत मिसाळे याने सी.बी.एस.ई (CBSE) राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत तीन पदके जिंकली आहेत. १६ ते २१ सप्टेंबर २०२५ या कालावधीत हरियाणामधील रोहतक येथे ही स्पर्धा पार पडली. वेदांतने १०० मीटर बटरफ्लाय प्रकारात सुवर्णपदक पटकावले. त्याचप्रमाणे, २०० …
Read More »‘जय किसान भाजी मार्केट’ तात्काळ बंद करा: शेतकऱ्यांचे आंदोलन
बेळगाव : बेळगावमधील खासगी ‘जय किसान भाजी मार्केट’चा परवाना रद्द करून ते तात्काळ बंद करण्याची मागणी करत आज शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. यावेळी, जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीला घेराव घालण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून शेतकरी जय किसान भाजी मार्केट तात्काळ बंद करण्याची मागणी करत आहेत, मात्र प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत …
Read More »होलसेल मासळी बाजारासाठी योग्य जागा उपलब्ध करून द्या
होलसेल मासळी व्यापाऱ्यांकडून जिल्हा प्रशासनाला निवेदन बेळगाव : बेळगावमधील होलसेल मासळी व्यापाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला बेळगाव शहरात होलसेल मासळी बाजारासाठी योग्य जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात झालेल्या एका बैठकीनंतर होलसेल मासळी व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधी मंडळाने जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन सादर केले. बेळगाव उत्तरचे आमदार असीफ (राजू) …
Read More »मराठा मंडळच्या फार्मसी महाविद्यालयात पाचव्या राष्ट्रीय फार्माकोव्हिजिलन्स सप्ताहानिमित्त कार्यक्रम
बेळगाव : मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे १७ ते २३ सप्टेंबर २०२५ दरम्यान पाचवा राष्ट्रीय फार्माकोव्हिजिलन्स सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून शनिवार, दि. २० सप्टेंबर रोजी फार्माकोव्हिजिलन्स या विषयावर सेमिनार आयोजित करण्यात आला. या सेमिनारला केंद्रीय संशोधन प्रयोगशाळा, मराठा मंडळ एन्. जी.एच. इन्स्टिट्यूट ऑफ …
Read More »येळ्ळूर येथे मोफत रक्तगट तपासणी शिबीर
बेळगाव : मराठी भाषाप्रेमी मंडळ बेळगांव, बृहन्महाराष्ट्र मंडळ नवी दिल्ली व केएलईएस हॉस्पिटल या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने येळ्ळूर येथे मंडळाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त रविवार दि. २१ सप्टेंबर रोजी मोफत रक्तगट तपासणी शिबीर पार पडले. या शिबिरात अठरा वर्षांवरील २२५ विद्यार्थो व ग्रामस्थांनी स्वेच्छेने रक्त तपासणी करून घेतली. प्रत्येकाला रक्तगट …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta