बेळगाव: सदाशिवनगर येथील मुलींच्या वसतिगृहात सोमवारी एका नर्सिंगच्या विद्यार्थिनीने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. सुमित्रा गोकाक (१९) अशी आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव असून सदर विद्यार्थिनी जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील घटप्रभा येथील ही विद्यार्थिनी नर्सिंगचे शिक्षण घेत होती. बेळगावमधील सदाशिवनगर येथील डॉ. बी. आर. आंबेडकर सरकारी पोस्ट-मॅट्रिक मुलींच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनीने …
Read More »जातनिहाय जनगणनेत “धर्म : हिंदू, जात : मराठा, पोटजात : कुणबी, मातृभाषा : मराठी”च नमूद करा; सकल मराठा समाजाच्या मेळाव्यात आवाहन
बेळगाव : मराठा समाज शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे त्यामुळे मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मराठा समाजाला आरक्षण मिळणे गरजेचे आहे. कर्नाटक राज्यात आजपासून जातनिहाय जनगणती सुरू झाली आहे. यावेळी मराठा समाजाने आपली जबाबदारी लक्षात घेऊन येणाऱ्या काळात मराठा समाजाला आरक्षण मिळविण्याच्या दृष्टीने जनगणती वेळी मराठा कुणबी अशी नोंद करा, …
Read More »जाती सर्वेक्षणात “धर्म : हिंदू, जात : वीरशैव लिंगायत”च नमूद करा : महांतेश कवटगीमठ
बेळगाव : कर्नाटक राज्यात सुरू असलेल्या जाती सर्वेक्षणात समस्त वीरशैव लिंगायत समाजाने ‘धर्म’ या रकान्यात हिंदू आणि ‘जात’ या रकान्यात वीरशैव लिंगायत असेच नमूद करावे, असे आवाहन भाजपचे माजी आमदार महांतेश कवटगीमठ यांनी केले आहे. बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी यासंदर्भात माहिती दिली. ‘वीरशैव-लिंगायत समाज हा राज्यातील …
Read More »येळ्ळूर येथे कुणबी-मराठा नोंदीसाठी जागृती रॅलीत संपन्न; मराठा समाज एकवटला
येळ्ळूर : कर्नाटक सरकारच्यावतीने 22 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर पर्यंत जातीनिहाय जनगणना करण्यात येणार आहे. यावेळी मराठा समाजाने ‘धर्म- हिंदू, जात मराठा, पोट जात- कुणबी, मातृभाषा- मराठी आणि व्यवसाय- शेती’, अशी नोंदणी करून शिक्षणात व नोकरीत आरक्षण मिळवून आपला विकास करून घ्यावा, यासाठी शिवसेना चौक विराट गल्लीतून सर्व मराठा …
Read More »जायंट्स ग्रुप बेळगाव मेन तर्फे आयोजित गणेश उत्सव स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ 23 सप्टेंबर रोजी
बेळगाव : जायंट्स ग्रुप बेळगाव मेन तर्फे आयोजित गणेश उत्सव स्पर्धेचा निकाल (सुंदर श्रीमूर्ती आणि सुंदर देखावा) जाहीर झालेला आहे. दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी या स्पर्धेचा बक्षीस समारंभ पंडित नेहरू विद्यालय, अळवाण गल्ली शहापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. बक्षीस समारंभ संध्याकाळी ठीक पाच वाजता करण्यात येणार आहे. …
Read More »जातनिहाय जनगणनेबाबत जनजागृती; सकल मराठा समाजातर्फे आज मेळावा
बेळगाव : कर्नाटक सरकारच्या शैक्षणिक आणि सामाजिक सर्वेक्षण पत्रकात मराठा समाजातील लोकांनी धर्म, जात, पोटजात आणि मातृभाषा कशाप्रकारे नमूद करावी यासंदर्भात सकल मराठा समाज आणि मराठा समाजातील नेते मंडळींकडून जनजागृती करण्यात येत आहे. या अनुषंगाने मराठा समाजाचे युवा नेते किरण जाधव यांनी आज कपिलेश्वर कॉलनी, शास्त्रीनगर, गुडशेड रोड यासह …
Read More »तुमची मेहनत आणि मनाची निष्ठा हेच खरे गुरु आहेत : रणजीत चौगुले
बेळगाव : तुमची मेहनत आणि मनाची निष्ठा हेच खरे गुरु आहेत; धाडस करा, दिवसात छोटी छोटी उद्दिष्टे ठेवा आणि सातत्याने प्रयत्न करत रहा, यश तुमच्या पावलावर येईल, असे प्रतिपादन सरदार्स हायस्कूलचे शिक्षक रणजीत चौगुले यांनी केले. दि. बेळगाव तालुका रुरल इंडस्ट्रियल को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, बेळगाव यांच्या वतीने सभासदांच्या …
Read More »इंग्रजी, कॉन्व्हेंट शाळांना हिंदू सणांची सुट्टी सक्तीची करावी : श्रीराम सेना
बेळगाव : सरकारच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून राष्ट्रीय सणांचा तिरस्कार करणाऱ्या शहरातील इंग्रजी आणि कॉन्व्हेंट शाळांवर कारवाई करावी. तसेच दसरा सणासह हिंदूंच्या अन्य सणांची सुट्टी या शाळांसाठी सक्तीची करावी, अशी मागणी बेळगावच्या श्रीराम सेनेने बेळगाव जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे. श्रीराम सेनेचे उत्तर कर्नाटक राज्याध्यक्ष रवीदादा कोकीतकर यांच्या …
Read More »जय किसान भाजी मार्केटची इमारत पाडण्याची मागणी!
बेळगाव : जय किसान खासगी भाजी मार्केटची परवानगी रद्द झाल्यानंतरही इमारत न पाडल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकरी संघटनांनी आज बेळगाव महानगरपालिकेसमोर आंदोलन केले. जोपर्यंत ही इमारत तोडली जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे. जय किसान खासगी भाजी मार्केटची इमारत बांधण्याची परवानगी रद्द झाली आहे, तरीही …
Read More »पत्नीचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पतीला शिक्षा
बेळगाव : पत्नीचा दारू पिऊन मानसिक व शारीरिक छळ करून नाक कापल्याप्रकरणी आरोपी पती सुरेश परशुराम नाईक (वय 38 रा. शेंडसगळ, महाराष्ट्र) याला बेळगाव न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. आरोपी सुरेश हा त्याची पत्नी सुनीता (वय 35 रा. कागवाड, कर्नाटक) हिचा रोज दारू पिऊन शारीरिक व मानसिक छळ करीत होता. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta