Friday , October 18 2024
Breaking News

बेळगाव

डॉ. सागर मित्तल यांना रुग्णसेवेसाठी पुरस्कार प्रदान

बेळगाव : माधवबाग आयुर्वेद कार्डियाक क्लिनिक व हॉस्पिटल याचा कर्नाटक राज्याचा वार्षिक सन्मान सोहळा नुकताच हुबळी या ठिकाणी पार पडला. यात शहापूर शाखेचे डॉ. सागर मित्तल यांना आऊटस्टँडिंग परफॉर्मन्स इन डायबेटीस व हार्टडीसिज रिव्हरसल कर्नाटक रिजन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेले 9 वर्ष डॉ. सागर यांनी माधवबागच्या डिसीज रिव्हर्सल …

Read More »

आमदार, नगरसेवक व कार्यकर्त्यांचा एक स्तुत्य उपक्रम

बेळगाव : दक्षिणचे आमदार श्री. अभय पाटील हे गेल्या अनेक वर्षापासून दर रविवारी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह एखाद्या भागात जाऊन त्या भागाचे स्वच्छतेचे काम करतात. रविवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत हिंदवाडी येथील घुमटमाळ मारुती मंदिर परिसरात भेट देऊन स्वच्छता मोहीम राबविली.त्याचे असे झाले! मंदिराच्या परिसरात बराच कचरा पडलेला …

Read More »

कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमुर्तीपदी रितू राज अवस्थी

बंगळूर : कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती म्हणून रितू राज अवस्थी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज 13 राज्यांच्या उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायमूर्तींच्या नियुक्तीवर सही केली. केंद्र सरकारच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी आज हे अधिसूचित केले. सर्वोच्च न्यायालयाने शिफारस केल्यानुसार ही अधिसूचना जारी करण्यात आली. अलाहाबादस्थित न्यायमूर्ती …

Read More »

रुग्णाच्या नातेवाईकाला तालिबानी संबोधल्याने वाद

बेळगाव : उपचारांसाठी दाखल झालेल्या मुस्लिम रुग्णाच्या नातेवाईकाला एका सुरक्षारक्षकाने तालिबानी असे संबोधून अवमान केल्याची घटना बेळगावात केएलई इस्पितळात घडली. रुग्णाच्या नातेवाईकाला एका सुरक्षारक्षकाने तालिबानी असे संबोधून तालिबान्यांबद्दल माहिती सांग असे म्हटल्याची घटना शनिवारी केएलई इस्पितळात घडली. त्यावर रुग्णाच्या नातेवाईकाने वाद घालून, मला असे का संबोधले म्हणून आरडाओरड केली. त्यावेळी …

Read More »

रयत गल्ली येथील धोकादायक ट्रान्सफॉर्मर बदलण्याची मागणी

बेळगाव : रयत गल्ली, वडगाव येथील वरचेवर जळून खराब होणारा विद्युत ट्रान्सफॉर्मर स्थानिकांसाठी धोकादायक ठरत असून हा ट्रान्सफॉर्मर बदलून नवा ट्रान्सफॉर्मर बसवावा अथवा त्याची जागा बदलावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे. रयत गल्ली येथे रस्त्याच्या कडेला अनेक वर्षापासून मोठा विद्युत ट्रान्सफॉर्मर बसवली आहे. मात्र अलीकडे दुरुस्ती करून सर्व साहित्य …

Read More »

बेळगांवच्या स्नुषेचा राज्यपालांच्या हस्ते गौरव

बेळगाव : बेळगांवच्या स्नुषा डॉ. कल्पना सुहास गोडबोले यांना मुंबई येथे राजभवनामध्ये काल शुक्रवारी झालेल्या दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्या हस्ते ‘महाराष्ट्राचा कोरोना योद्धा -2021’ हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. शहरातील रविशंकर आर्केड, एसबीजे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजसमोर गणेशपुर रोड येथील सुप्रसिद्ध डॉ. सुहास गोडबोले यांच्या …

Read More »

भालचंद्र जारकीहोळी यांना कॅबिनेट मंत्री पद द्या

चलवादी महासभा आणि दलित पँथर यांच्यावतीने मागणी बेळगाव : जिल्हा चलवादी महासभा आणि दलित पँथर यांच्यावतीने हॉटेल मिलनमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून भालचंद्र जारकीहोळी यांना पद द्यावे अशी मागणी केली. तसेच भाजपाचे ज्येष्ठ नेहरू उरलेकर यांच्यासह चलवादी समाजाचे अनेक आमदार भाजपात आहेत. …

Read More »

बेळगावात नोटरी वकिलांचा मेळावा

बेळगाव : बेळगावात शनिवारी जिल्ह्यातील नोटरी वकिलांचामेळावा घेण्यात आला. कोरोना महामारीमुळे 2 वर्षानंतर झालेल्या या मेळाव्यात नोटरी वकिलांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. कर्नाटक स्टेट नोटरी असोसिएशन आणि बेळगाव डिस्ट्रिक्ट नोटरी असोसिएशनच्या वतीने बेळगावातील वकील संघटनेच्या समुदाय भवनात शनिवारी जिल्ह्यातील नोटरी वकिलांचा मेळावा घेण्यात आला. राज्य नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष एस. …

Read More »

साजिद शेख यांचा वन खात्यातर्फे सत्कार

बेळगाव : वन्यजीव सप्ताहानिमित्त बेळगाव वन विभागातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जनतेत वन्य प्राण्यांच्या विषयी जागरूकता, छायाचित्र प्रदर्शन आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन वन्यजीव सप्ताहात करण्यात आले होते. वन्यजीव सप्ताह समारोपाच्या निमित्त सामाजिक कार्यकर्त्यांचा आणि वन खात्याला विविध कार्यात सहकार्य करणार्‍या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. समारोप कार्यक्रमाचे आयोजन महात …

Read More »

ज्योतिर्लिंग व काळभैरव प्रभावळ स्थापना कार्यक्रम भक्तीभावाने

येळ्ळूर : येळ्ळूर येथील श्री जोतिर्लिंग कमिटीतर्फे आयोजित ज्योतिर्लिंग प्रभावळ व काळभैरव प्रभावळ स्थापना कार्यक्रम भक्तीभावाने मोठ्या उत्साहात पार पडला. सदर ज्योतिर्लिंग प्रभावळ व काळभैरव प्रभावळ स्थापना कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी ज्योतिर्लिंग कमिटीचे अध्यक्ष देवाप्पा खेमणाकर हे होते. प्रारंभी दुदाप्पा बागेवाडी यानी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. प्रभावळ गाड्याचे पुजन ग्राम पंचायत अध्यक्ष सतिश …

Read More »