Friday , October 18 2024
Breaking News

बेळगाव

युवकांनी लढण्याची जिद्द बाळगावी : मध्यवर्ती म. ए. समिती अध्यक्ष दीपक दळवी

खानापूर (वार्ता) : पंतप्रधानांना पत्र पाठविणे हा एक लढ्याचा भाग झाला मात्र पत्र पाठवून आपली जबाबदारी संपणार नाही तर सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सर्वांची जबाबदारी वाढलेली असून युवकांनी सीमालढा आपल्या खांद्यावर घ्यावा आणि प्रश्न सुटे तोपर्यंत विविध मार्गाने लढण्याची जिद्द बाळगावी, असे प्रतिपादन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले. …

Read More »

विविध मागण्यांसाठी कम्युनिस्टांची निदर्शने

बेळगाव : वाढती महागाई, भाषिक अल्पसंख्यांक नागरिकांचे हक्क आणि योग्यरितीने कोविड व्हॅक्सिनेशन व्हावे या मागण्यांसाठी बेळगाव शहरात कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन सादर करण्यात आले असून लवकरात लवकर सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांचे प्रश्न सोडवण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनामध्ये वाढत्या इंधन दरासंदर्भातील मुद्द्यावर …

Read More »

पत्र मोहिमेत महिलांची आघाडी

बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक बेळगाव सीमाप्रश्नी आपण वैयक्तिक लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा आणि आम्हा 20 लाख मराठी बांधवांना महाराष्ट्रात सामील करून न्याय द्यावा, अशा मागणीची एक हजाराहून अधिक पत्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नांवे पाठविण्याची मोहीम आज सोमवारी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महिला आघाडीतर्फे राबविण्यात आली. सीमा लढ्यातील हुतात्म्यांच्या वारसांसह शहरातील …

Read More »

पंतप्रधानांना पत्र पाठवायच्या कार्यक्रमाचे येळ्ळूरमध्ये थाटात शुभारंभ

येळ्ळूर : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती खानापूर यांच्यावतीने भारताचे पंतप्रधान यांना सीमावासीयाच्यावतीने सीमाप्रश्न सोडवणूक करावी असा मजकूर लिहून पत्र पाठविण्याचे ठरविण्यात आले होते. त्यांना पाठिंबा देत येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने आव्हान केल्यानंतर येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी आज प्रत्येक गल्लीतील नागरिकांनी पत्रे लिहून आजपर्यत 2150 पत्रे समितीकडे सोपविली …

Read More »

तारांगण-वैशाली स्टोन क्रशर मार्फत घेण्यात आलेल्या नादब्रह्म ऑनलाईन भजन स्पर्धेत साईराम प्रथम, स्वरगंध व मुक्ताई द्वितीय

बेळगाव (वार्ता) : आषाढी एकादशी निमित्य तारांगण व वैशाली स्टोन क्रशर यांनी आयोजित केलेल्या नाद ब्रम्ह ऑनलाईन भजन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आज सोमवार दिनांक 9ऑगष्ट रोजी दुपारी 3 वा. महिला विद्यालय मराठी शाळेच्या सभागृहात होणार आहे. या स्पर्धेचे प्रायोजक सौ. रुक्मिणी निलजकर वैशाली स्टोन क्रशर या आहेत. या स्पर्धेला …

Read More »

अंगणवाडीत विवीध पदांची भरती! महिलांना संधी

बेळगाव : बेळगाव शहरातील व ग्रामीण भागातील महिलांसाठी कर्नाटक शासनाने अंगणवाडी भरतीचे आदेश महिला व बालकल्याण विभागा तर्फे अधिसूचना प्रकाशित केली आहे. अंगणवाडी विविध पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत पात्र व इच्छुक उमेदवार 14 ऑगस्ट 2021 पर्यंत अर्ज दाखल करू शकतात. उच्च पदासाठी शैक्षणिक योग्यता दहावी. वयोमर्यादा 18 ते 35 …

Read More »

स्वातंत्र्यसैनिक संघटनेच्यावतीने सत्कार याचा अभिमान वाटतो : चंद्रशेखर निलगार

बेळगाव (वार्ता) : वाहतूक व गुन्हे विभागाचे डीसीपी चंद्रशेखर निलगार हे गेल्या 31 जुलै रोजी 31 वर्षाच्या सेवेतून निवृत्त झाले त्याबद्दल त्यांचा स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघाच्यावतीने सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष श्री. राजेंद्र कलघटगी हे होते.उपस्थितांचे स्वागत करून सहकार्यवाह संतोष होंगल यांनी नीलगार यांच्या कार्याचे कौतुक केले. अध्यक्षांच्या हस्ते शाल, …

Read More »

सीमाप्रश्नी पंतप्रधानांना पत्रं पाठवण्याच्या उपक्रमाला निलजी गावातुन युवकाचा पाठिंबा

बेळगाव (वार्ता) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने पंप्रधान नरेंद्र मोदींना हजारो पत्रं सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी ९ ऑगष्ट क्रांती दिनी पाठवण्याचा जो संकल्प केलेला आहे, त्याला सीमाभागातून मोठा पाठिंबा मिळत आहे, आज सीमालढ्यात मोठं योगदान असलेल्या निलजी ता.बेळगाव गावातून हजारोने पत्रं पाठवण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी सुनील अष्टेकर, गोपाळ पाटील, …

Read More »

शहर व उपनगरातील गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची मंगळवारी बैठक

बेळगाव : शहर व उपनगरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने मंगळवार दि. १० ऑगष्ट रोजी सायंकाळी ४.३० वा. सिद्धजोगेश्वर मंदिर (शनिमंदिर जवळ) बोलाविण्यात आली आहे. तरी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन रणजीत चव्हाण पाटील अध्यक्ष, रमाकांत कोंडुसकर कार्याध्यक्ष, शिवराज पाटील सरचिटणीस यांनी केले आहे.

Read More »