Sunday , December 14 2025
Breaking News

बेळगाव

ग्राहक कल्याण परिषदेचा उद्यापासून परिसंवाद

बेळगाव : अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेच्या कर्नाटक राज्य शाखेतर्फे उद्या दि 29 आणि 30 मार्च रोजी ग्राहकांची होणारी फसवणूक त्यांच्या समस्या व निवारण आणि जनजागृती संदर्भात परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील कन्नड साहित्य भवन येथे आज आयोजित पत्रकार परिषदेमध्ये अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष विख्यात शिनाॅय …

Read More »

पाणी समस्या सोडवा, नाहीतर झाडाला बांधून चोप देईन : आ. अनिल बेनके यांची अधिकाऱ्यांना झापले!

बेळगाव : बेळगावात पाणीसमस्या पुन्हा एकदा तीव्र झाली आहे. या पार्श्वभूमीवर आ. अनिल बेनके यांनी सोमवारी एल अँड टी कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची सभा घेऊन तातडीने पाणी समस्या सोडवा, नाहीतर झाडाला बांधून मारेन अशी तंबी दिली. बेळगाव शहरात पुन्हा एकदा पाणी समस्या उदभवली आहे. गेल्या ८ दिवसांपासून शहराच्या पाणी पुरवठ्यात …

Read More »

दहावीच्या परीक्षेला बेळगाव जिल्ह्यात प्रारंभ

बेळगाव : विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्वाचा टप्पा असलेल्या एसएसएलसी परीक्षेला बेळगाव जिल्ह्यात सोमवारी प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी प्रथम भाषा विषयाचा पेपर होता. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने परीक्षा केंद्रांवर येऊन परीक्षा दिली. राज्यभरात सोमवारी एसएसएलसी परीक्षेला प्रारंभ झाला. राज्यात बेळगाव सर्वात मोठा जिल्हा आहे. भौगोलिकच नव्हे तर विद्यार्थी संख्येच्या दृष्टीनेही सर्वात मोठा …

Read More »

अर्धनग्न अवस्थेत खासगी भाजी मार्केटच्या विरोधात आंदोलन

बेळगाव : सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एपीएमसीमधील व्यापारी व शेतकर्‍यांनी खासगी भाजी मार्केटच्या विरोधात अर्धनग्न अवस्थेत आंदोलन छेडून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 3 जानेवारीपासून बेळगावमध्ये गांधी नगर जवळ खासगी भाजी मार्केट सुरू करण्यात आले. त्यामुळे केपीएमसीमध्ये कार्यरत असलेले 80 टक्के व्यापारी या नव्या भाजी मार्केटमध्ये स्थलांतर झाले. त्यामुळे एपीएमसीमध्ये खरेदी तत्वावर …

Read More »

मराठा समाजाला मंत्रिपद नाही; मंत्रिपदासाठी मीही अग्रेसर : आ. अनिल बेनके

बेळगाव : राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. त्यासोबतच इच्छुकांची यादीही वाढत चालली आहे. आता तर बेळगाव उत्तरचे आ. अनिल बेनके यांनीही मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याचे सांगितल्याने राजकीय वर्तुळात चर्चाना ऊत आला आहे. बेळगावातील सरदार्स हायस्कूलमध्ये सोमवारी एसएसएलसी परीक्षार्थींचे स्वागत केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आ. अनिल बेनके यांनी सांगितले …

Read More »

तिसर्‍या बेळगाव मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी श्रीपाल सबनीस यांची निवड

बेळगाव (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने 8 मे 2022 रोजी मराठा मंदिर बेळगाव या ठिकाणी होणार्‍या तिसर्‍या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना निवडीचे पत्र अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय …

Read More »

उमेश बिराजदारने केले उमेश चव्हाणला घिस्सा डावावर चितपट!

बेळगाव : कर्नाटक केसरी उमेश बिराजदार याने महाराष्ट्र चॅम्पियन उमेश चव्हाण याला पाचव्या मिनिटाला घिस्सा डावावर चितपट करत कंग्राळीचे कुस्ती मैदान मारले. रविवारी बेळगावात तालुक्यातील कंग्राळी येथे कंग्राळी येथे झालेल्या कुस्तीगीर संघटना व ग्रामस्थ यांच्या वतीनं निकाली कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या क्रमांकाची कुस्ती कृष्णा पाटील, वस्ताद काशिनाथ …

Read More »

जिनगौडा कॉलेजमध्ये निरोप समारंभ संपन्न

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील देवेंद्रनगर येथील देवेंद्र जिनगौडा पदवीपूर्व कॉलेजमधील विद्यार्थिनींचा निरोप समारंभ नुकताच पार पडला. सदर समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून कर्नाटक शहर पाणीपुरवठा महामंडळाच्या संचालिका दीपा कुडची उपस्थित होत्या. प्रारंभी स्वागत आणि प्रास्ताविक झाल्यानंतर दीपा कुडची यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. आपल्या उद्घाटनपर भाषणात दीपा कुडची …

Read More »

सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी नेताजी जाधव

बेळगाव : 174 वर्षाची गौरवशाली परंपरा असलेल्या गणपत गल्ली बेळगाव येथील सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक नेताजी जाधव यांची निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या मावळत्या अध्यक्षा सौ. सुनीता मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत एकमताने निवड करण्यात आली. प्रसन्न हेरेकर यांची उपाध्यक्ष पदी तर मानद कार्यवाह पदी रघुनाथ बांडगी, …

Read More »

शास्त्रीय सहागायनाच्या कल्पकतेने उलगडला आगळा संगीत अविष्कार

बेळगाव (प्रतिनिधी) : आर्ट्स सर्कलने रविवारी शास्त्रीय सह गायनाचा आगळा कार्यक्रम सादर केला. या शास्त्रीय सहगायनाच्या कार्यक्रमाच्या कलाकार होत्या ऋतुजा लाड आणि दीपिका भिडे-भागवत. अध्यक्षा लता कित्तूर ह्यांनी सर्व कलाकारांचे पुष्पगुच्छ आणि स्मरणिका देऊन स्वागत केले. कलाकारांचा थोडक्यात परिचय रोहिणी गणपुले ह्यांनी करून दिला. कार्यक्रमाची सुरुवात झाली सायंकालीन राग मुलतानीने. …

Read More »