बेळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक हटवून मराठी जनतेवर हल्ला करणाऱ्या पोलिसांनी लोकांनीच हल्ला केल्याचा कांगावा केला. लोकांवर गुन्हे दाखल केले. या याचिकेवर आता बुधवारी(दि. ८) होणार आहे. २०१४ मध्ये पोलिसांच्या प्रचंड बंदोबस्तात येळ्ळूर येथील महाराष्ट्र राज्य फलक हटविण्यात आला. शांतता पद्धतीने विरोध करणाऱ्या लोकांवर अनामुष हल्ला करण्यात आला. त्यानंतर लोकांवरच गुन्हे नोंदवण्यात आले. २०१५ पासून न्यायालयात सुनावणी सुरू आहे. एकूण ७७ जणांवर दोषारोप आहे. पण, साक्षीदार
आणि संशयित वारंवार गैरहजर राहात असल्यामुळे याचिका लांबणीवर पडत आहे. याआधी साक्षीदारांना समन्स बजावण्यात आला असला तरी, न्यायालयात हजर राहिले नाहीत. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या सुनावणीला सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन वकिलांकडून करण्यात आले
आहे.
