Sunday , July 26 2026
Breaking News

ब्लूमिंग बड्स स्कूलमध्ये जागतिक पर्यावरण दिन

Spread the love

बेळगाव : ब्लूमिंग बड्स शाळेतील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी 6 जून 2022 रोजी जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात आणि अर्थपूर्णपणे साजरा केला.
प्रख्यात समाजसेविका आणि कोविड योद्धा सौ. माधुरी जाधव या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. अनेक वर्षापासून सौ. माधुरी जाधव गरीब आणि गरजू लोकांना मदत करत आहेत. दि. ब्लूमिंग बड्स स्कूलतर्फे राबविण्यात येणारा हा सामाजिक उपक्रम अत्यंत प्रशंसनीय असून यामुळे समाजात व विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागृती व आस्था निर्माण होईल असे उद्गार सौ. जाधव यांनी काढले.
सर्व पाहुण्यांना प्रेमाचे प्रतीक म्हणून रोप देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांसह प्राचार्य, व्यवस्थापन सदस्य कर्मचारी व विद्यार्थ्यांनी शाळेच्या बागेत व परिसरात विविध प्रकारची रोपटी लावली.
यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचे महत्व सांगणारी भाषणे दिली व गाणी गायली. इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांनी झाडांचे संरक्षण आणि वाढ करण्याचा संदेश देणारे नाट्यपथ सादर केले. यावेळी संचालिका रक्षिता घाटगे व प्राचार्या सौ. सुषमा चरंतीमाठ यांनी उपस्थितांना संबोधित केले.
आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *