Monday , September 21 2026
Breaking News

छोट्या दोस्तांच्या कलागुणांना वाव मिळावून देणारे बाल महोत्सव : डॉ. स्मृती हावळ

Spread the love

संकेश्वर (महंमद मोमीन) : छोट्या दोस्तांच्या कलागुणांना वाव मिळावून देण्यासाठी बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे महोत्सव संयोजक डॉ. स्मृती हावळ यांनी सांगितले. संकेश्वर रुक्मिणी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे आयोजित बाल महोत्सवात त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. रुक्मिणी गार्डन येथे आयोजित बाल महोत्सवाचे उद्घाटन नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, बालरोगतज्ज्ञ डॉ. नंदकुमार हावळ, डॉ. सुरेखा मावळ यांचे हस्ते करण्यात आले.
बाल महोत्सवात 6 ते 13 वर्षे वयोगटातील मुला-मुलींनी सहभागी होऊन आपल्या कलेचे प्रदर्शन केले. डॉ. स्मृती हावळ पुढे म्हणाल्या, छोट्या दोस्तांना आपल्या कलेचे प्रदर्शन करण्यासाठी व्यासपीठ हवे होते. ते बाल महोत्सवाने मिळवून दिले आहे. आम्ही संकेश्वरात मुलांसाठी आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. अलोरगाण, कडेलोट देखील छोट्या दोस्तांच्या पसंतीला उतरले. त्यातून बाल महोत्सवाची कल्पना सुचली. त्याला डॉ. सुरेखा हावळ ताईंनी प्रोत्साहन दिले असे त्यांनी सांगितले.
यावेळी नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, डॉ. नंदकुमार हावळ, डॉ. सुरेखा हावळ, डॉ. मंदार हावळ, डॉ. प्रितम मावळ, डॉ. सुप्रिया हावळ यांचा सत्कार करण्यात आला. बाल महोत्सवात संगीतकार अल्ताफ नदाफ यांच्या सप्तस्वर संगीत पाठशाळेतील छोट्या दोस्तांची सुगम संगीत मैफिल झाली. टाईनी टेल्स संस्थेने कपिलाने घेतला झोका, यलर्म हत्तीची गोष्ट बालनाटकांतून सादर केली. टाईनी टेल्सच्या प्रतिक्षा खासकर, कल्पेश यांनी बालनाटकांतून मुलांचे मनोरंजन केले. बाल महोत्सवात डॉ. विकास पाटील, जयप्रकाश सावंत, सविता सावंत, सचिन सपाटे, मुले-मुली पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

गणेशोत्सवासाठी यमकनमर्डी पोलिसांकडून गणेश मंडळाना मार्गदर्शक सूचना : पीएसआय आर. बी. पाटील

Spread the love  मंडप, मिरवणूक व विसर्जनावेळी नियमांचे पालन करण्याचे आवाहन दड्डी वार्ताहर.. आगामी गणेशोत्सवाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *