संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर तुळजाभवानी गोंधळी समाजतर्फे गोंधळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करुन सन्मानित करण्यात आले. समाजाचे अध्यक्ष कृष्णा दवडते, परशराम शिसोदे, महेश दवडते यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी प्राजक्ता हत्तळगे (93%), सुमित दवडते (86%), वैष्णवी सुगते (86%), प्रतिभा दवडते, मनिषा हत्तळगे (83%), दिव्या दवडते (75%) यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करुन सन्मानित करण्यात आले. गोंधळी समाजाच्या मुला-मुलींनी दहावी परिक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल समाजातर्फे त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.
यावेळी रवि दवडते, शशीकांत दवडते, अजित भोसले, दत्ता दवडते, दिपक दवडते समाज बांधव उपस्थित होते.
