Thursday , September 19 2024
Breaking News

बेळगाव

म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार महादेव पाटील यांच्या प्रचाराला प्रारंभ

  बेळगाव : सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी गेली ७० वर्षे लोकशाही मार्गाने लढा देणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीने एकनिष्ठ कार्यकर्ते महादेव पाटील यांना उमेदवारी दिली आहे. समिती नेत्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी उचगाव येथील जागृत देवता श्री मळेकरणी देवीच्या मंदिरात पूजा करून महादेव पाटील यांनी प्रचाराचा नारळ फोडला. यानंतर त्यांनी उचगावात फेरी काढून गावकरी व …

Read More »

बेळगावसह उपनगरात पावसाची दमदार हजेरी!

  बेळगाव : बेळगावसह उपनगरात आज पावसाने दमदार हजेरी लावली. मागील दोन दिवसात शहर व परिसरात तुरळक प्रमाणात पावसाने हजेरी लावली होती. मात्र आज वळीवाने संपूर्ण शहराला झोडपून काढले आहे. मागील काही दिवसात उष्माघाताने हैराण झालेल्या बेळगावकरांनी गारवा अनुभवला आहे. आज सायंकाळी ४.३० च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरवात झाली. …

Read More »

समितीचे अधिकृत उमेदवार महादेव पाटील यांचा उद्यापासून प्रचाराचा शुभारंभ!

  बेळगाव : बेळगाव लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार महादेव तुकाराम पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ शुक्रवार दिनांक 12 रोजी सकाळी ठीक 9.00 वाजता उचगाव येथील मळेकरणी देवीला साकडे घालून पूजन करून केला जाणार आहे. तरी या प्रचाराच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला शहर व तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची, आजी …

Read More »

बेळगाव शहर, जिल्ह्यात ईद-उल-फित्र रमजान उत्साहात

  बेळगाव : बेळगाव शहर आणि जिल्ह्यात मुस्लिम धर्मियांचा पवित्र सण ईद-उल-फित्र अर्थात रमजान श्रद्धाभक्तीने जल्लोषात साजरा करण्यात आला. बेळगावात पवित्र रमजान सणाचा एक भाग म्हणून हजारो मुस्लिम बांधवानी गुरुवारी शहरातील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज अदा केली. बेळगाव जिल्ह्यात मुस्लिमांनी गुरुवारी पवित्र ईद-उल-फित्र उत्साहात साजरी केली. मुस्लिमांनी महिनाभर रोजा पाळून …

Read More »

शुक्रवारपासून सुरु होणार महादेव पाटील यांचा प्रचार

  बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार महादेव पाटील यांचा प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे. बेळगाव तालुक्याची आराध्य दैवत उचगावची ग्रामदेवता श्री मळेकरणी देवी मंदिरात पूजन करून शुक्रवारी दि. 12 रोजी प्रचार आरंभ करण्यात येणार आहे. उचगाव येथे सकाळी 9:30 वाजता मळेकरणी देवीची पूजा करून प्रचार …

Read More »

नियोजनासाठी शहर आणि तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची उद्या संयुक्त बैठक

  बेळगाव : आगामी लोकसभा निवडणुकीच्या नियोजनासाठी शहर आणि तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक गुरुवारी दुपारी 4:00 वाजता आयोजित करण्यात आली आहे. बेळगाव शहरातील मराठा मंदिर रेल्वे ओवर ब्रिज येथे या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीत लोकसभा निवडणुकी संदर्भात नियोजन ठरविले जाणार आहे. …

Read More »

शहापूर, वडगाव भागात शिवजयंती उत्साहात साजरी करा : नेताजी जाधव

  बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूरची बैठक मंगळवार दिनांक ९/४/२०२४ रोजी श्री साईगणेश सोसायटीच्या सभागृहात संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहापूर महामंडळाचे अध्यक्ष श्री. नेताजी जाधव होते. ९ मे रोजी पारंपरिक शिवजयंती व ११ मे रोजी चित्ररथ मिरवणूक काढण्यात येणार आहे तरी मोठ्या उत्साहात हा शिवजयंती उत्सव …

Read More »

वडिलांच्या मजुरीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून मालकाकडून मुलीला मारहाण

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील काकती गावात एक घृणास्पद घटना नुकतीच घडल्याची माहिती समोर आली आहे. वडिलांनी केलेल्या कामाचे पैसे मागितल्याने मालकांनी मुलीला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, अर्जुन नामक व्यक्ती काकती येथील एका बँड कंपनीत कामाला होता. गुढीपाडवा असल्याने अर्जुनच्या १७ वर्षीय मुलीने मजुरीचे …

Read More »

बेळगाव शहरात गुरुवारी रमजान ईद होणार साजरी

  बेळगाव : बेळगाव शहरात रमजान सणाची ईद नमाज गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता करण्याचा निर्णय घेण्यात आला असून अंजुमन ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण होणार आहे असे अंजुमनचे अध्यक्ष आमदार राजू सेठ यांनी सांगितले. आज मंगळवारी सायंकाळी अंजुमन सभागृहात हिलाल कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत शहराचे मुफ्ती, मौलाना आणि …

Read More »

सीमेवरील चेकपोस्टवर अधिक सतर्कता ठेवून सखोल तपासणी करा : जिल्हाधिकारी

  बेळगाव : जिल्ह्यात आणि आंतरराज्य सीमेवरील चेकपोस्टवर अधिक सतर्कता ठेवून अवैध पैसे, दारू किंवा अन्य वस्तूंच्या वाहतुकीला आळा घालण्यात यावा, अशा सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिल्या. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात मंगळवारी आयोजित सहायक निवडणूक अधिकारी व नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत …

Read More »