बेळगाव (वार्ता) : हेस्कॉमकडून तातडीचे दुरुस्तीचा काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे उद्या रविवार दि. 1 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील कांही गावांचा वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. बेळगाव तालुक्यातील बाळगमट्टी, कुट्टलवाडी, बामणवाडी, नावगे, जानेवाडी, खादरवाडी, रणकुंडये, कर्ले, किणये, संतीबस्तवाड, वाघवडे, रंगधोळी, मार्कंडेयनगर, …
Read More »म. ए. समितीच्यावतीने कोंकण व चिपळूण येथील पूरग्रस्तांसाठी मदत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडे सुपूर्द
बेळगाव (वार्ता) : अलीकडे कोंकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे कोकणवासीयांना बराच फटका बसला आहे. या भागातील नागरिकांना मदतीसाठी अनेक जण युद्धपातळीवर काम करीत आहेत, सामाजिक बांधिलकी जपत महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने देखील कोकणातील पूरग्रस्तांना 150 किलो तांदूळ, औषधे, हँड ग्लोव्हस, सॅनिटायझर 5 लिटर, फिनायल 10 लिटर, टॉवेल 100, बेडशीट्स 20 आणि चादर 20 …
Read More »प्रशिक्षणार्थी एअरमन्सचा दीक्षान्त समारंभ दिमाखात पार
बेळगाव (वार्ता) : सांबरा, बेळगाव येथील भारतीय हवाई दलाच्या एअरमन ट्रेनिंग स्कूलमधून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 3606 प्रशिक्षणार्थी एअरमन्सचा दीक्षान्त समारंभ आज शनिवारी सकाळी मोठ्या दिमाखात पार पडला. एअरमन ट्रेनिंग स्कूलच्या परेड ग्राऊंडवर झालेल्या सदर दिमाखदार सोहळ्यास बेळगाव एअरमन ट्रेनिंग स्कूलचे ऑफिसर कमांडिंग एअर कमोडोर एस. डी. मुकुल प्रमुख पाहुणे म्हणून …
Read More »श्रीक्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरामध्ये रुद्राभिषेकासह धर्म ध्वज अनावरण
बेळगाव (वार्ता) : श्रीक्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरामध्ये आज धर्मध्वजाचे अनावरण सोहळ्यानिमित्त दत्तात्रय मठाचे मठाधिपती अशोकजी शर्मा आणि धनंजय भाई देसाई यांच्या हस्ते पहाटे रुद्राभिषेक पार पडला. त्यानंतर धर्म ध्वजाचा अनावरण सोहळा उत्तरचे आमदार अनिल बेनके, मठाधीश अशोक शर्मा, धनंजय भाई देसाई, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री, उपाध्यक्ष सतीश निलजकर …
Read More »नानाशंकर शेठ यांचे १५६ वी पुण्यतिथी उत्साहात
बेळगाव (प्रतिनिधी) : श्री सुवर्णलक्ष्मी को ऑप क्रेडिट सोसायटी आणि दैवज्ञ ब्राह्मण शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नामदार नानाशंकर शेठ यांची १५६ वी पुण्यतिथी सोसायटीच्या सभागृहात पार पडली.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दैवज्ञ ब्राम्हण संघ अध्यक्ष राजू बेकवाडकर उपस्थित होते. व्यासपीठावर श्री सुवर्णलक्ष्मीचे संस्थापक मोहन कारेकर, अध्यक्ष विठ्ठल शिरोडकर, उपाध्यक्ष विजय …
Read More »जिव्हाळा फौंडेशनच्यावतीने डेंग्यू चिकणगुणिया प्रतिबंधक लसीकरण
बेळगाव (वार्ता) : पाईपलाईन रोड विजयनगर येथील मारुती मंदिरात जिव्हाळा फौंडेशनच्यावतीने डेंग्यू आणि चिकणगुणिया प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले.सुरूवातीला मारुती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष डी. बी. पाटील आणि इतर ट्रस्टीनी जिव्हाळा फौंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुरेखा पोटे आणि इतर सदस्यांचे पुष्पहार आणि श्रीफळ देऊन स्वागत केले.डॉ. सुरेखा पोटे यांनी लसीकरण मोहिमेचा उद्देश सांगितला …
Read More »जिल्हा प्रशासनाच्यावतीने सार्वजनिक गणेशोत्सवाची नियमावली जारी
बेळगावात यावर्षीही सार्व. गणेशोत्सव श्रीमुर्ती मंदिरातच बेळगाव (वार्ता) : यंदा गणेशोत्सव 10 सप्टेंबर पासून सुरुवात होत आहे. दरम्यान बेळगावच्या सार्वजनिक गणेशोत्सव संदर्भात जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी सायंकाळी उशीरा नियमावली जारी केली आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या संदर्भात जारी करण्यात आलेल्या नियमावलीमध्ये, गेल्या वर्षी प्रमाणेच यावर्षीचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडपा ऐवजी नजीकच्या देवस्थानात श्रीमूर्ती प्रतिष्ठापना …
Read More »कर्नाटक सिंह गंगाधरराव देशपांडे यांचा स्मृतिदिन
बेळगाव : शहापूर येथील सिध्दार्थ बोर्डिंगमध्ये साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना स्वातंत्र्यसैनिक गुरुवर्य परशुराम नंदिहळ्ळी यांनी महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या १९२४ च्या काँग्रेस अधिवेशनातील प्रसंग व गंगाधरराव देशपांडे व महात्मा गांधी यांचे संबंध, त्यांची राष्ट्रीयतेची भावना यावर भाष्य केले.प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य सुरेन्द्र देसाई उपस्थित होते. प्रमुख पाहुणे …
Read More »अन्नपूर्णेश्वरी भक्त मंडळाकडून पूरग्रस्तांसाठी मदत
बेळगाव : आज अन्नपूर्णेश्वरी नगर वडगाव येथील अन्नपूर्णेश्वरी भक्त मंडळ वडगाव यांच्यातर्फे चिपळूण व बेळगाव परिसरातील पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तू, धान्य आणि 500 लिटर पाण्याचे पाणी अश्या प्रकारची मदत पोहोचविली आहे. तसेच यापुढेही कोणतीही मदत लागली तर आपण मदत करण्यास तयार आहोत असे मंडळाच्या सभासदांनी सांगितले. या मदतकार्यात कल्पवृक्ष हॉटेलचे मालक …
Read More »पंतप्रधानांना पत्रे पाठवण्याच्या उपक्रमास मराठी पत्रकार संघाचा पाठिंबा
खानापूर तालुका युवा समितीतर्फे निवेदन सादरबेळगाव (वार्ता) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे ९ ऑगस्ट क्रांती दिनी दीर्घकाळ अनिर्णित राहिलेला सीमाप्रश्न केंद्र सरकारने त्वरित सोडवावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सीमाभागातून अकरा हजार पत्रे पाठवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या उपक्रमाला बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाने पाठिंबा दिला, तसेच …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta